व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या जीवनाचा काय उद्देश आहे?

तुमच्या जीवनाचा काय उद्देश आहे?

तुमच्या जीवनाचा काय उद्देश आहे?

के नी, खरेदी-विक्री करणाऱ्‍या एका यशस्वी कंपनीत कामाला होता. त्याच्याजवळ एक महागडी इंपोर्टेड कार होती आणि शहरातल्या रईस भागात त्याचे स्वतःचे एक पेन्टहाऊस होते. तो एक कुशल स्कायडायव्हरही होता. जमिनीपासून हजारो फुटांच्या उंचीवरून खाली उडी घेण्यात असलेली मजा त्याला खूप आवडायची. हे सर्व असूनही तो जीवनात समाधानी होता का? द वॉल स्ट्रीट जर्नलनुसार तो म्हणतो: “मी ४५ वर्षांचा झालो आहे. अजूनही माझ्या जीवन नौकेला किनारा लाभलेला नाहीए. . . . माझ्या जीवनात एक पोकळी आहे.”

एलीन, दिवसरात्र मेहनत करून एक कुशल आईस स्केटर बनली. तिने यशाचे शिखर देखील गाठले. तिला जो नावलौकिक हवा होता तो तिला मिळाला. “पण मी ज्या आनंदाच्या शोधात होते तो आनंद कुठे गेला? मला खूपच एकाकी वाटू लागले. हळूहळू मी म्हातारी होईन. माझ्याजवळ भरपूर पैसा आहे तरीपण, जीवनात हे असंच सर्व असणार असेल तर जीवन अगदीच रिक्‍त होईल,” असे ती दुःखाने म्हणते.

हिडिओने आपले संपूर्ण जीवन चित्रकलेसाठी वेचले. रंगसंगती करण्यात कुशल म्हणून तो नावाजलेला होता.

त्याने कधीच आपल्या चित्राकृती विकून पैसा मिळवला नाही; असे केल्याने आपल्या कौशल्याचा आपण अपमान करतोय, असा त्याचा विचार होता. तो वयाच्या ९८ व्या वर्षी मरण पावला. त्याआधी त्याने त्याची बहुतेक चित्रे एका संग्रहालयाला दान केली. त्याने चित्रकलेसाठी आपले जीवन वाहून घेतले होते. तरीपण तो समाधानी नव्हता. आपली कला आपण कधीच पूर्णत्वास नेऊ शकत नाही, असे त्याला वाटायचे.

काही लोक इतरांना मदत करण्यात आपले आयुष्य घालवतात. हॉलीवूडमधील एका चित्रपट क्षेत्रातील अधिकाऱ्‍याचे उदाहरण घ्या. तो अमेरिकेतील एका मोठ्या फिल्म कंपनीचा उपाध्यक्ष होता. बड्या लोकांबरोबर त्याचे उठणे-बसणे होते. एका आलिशान भागात तो राहायचा. एकदा सुटीसाठी म्हणून तो कंबोडियाला गेला होता. नोम पेनमधील एका कॅफेत बसून जेवत असताना एक मुलगी त्याच्याजवळ भीक मागायला आली. तिला पैसे हवे होते. त्याने तिला एक डॉलर दिला आणि एक पेय प्यायला दिले. मुलगी खूष झाली. पण दुसऱ्‍या दिवशी रात्री ती पुन्हा तेथे भीक मागत होती. तेव्हा त्याला जाणवले, की गरिबांसाठी काहीतरी ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहे.

एक वर्षानंतर, या अधिकाऱ्‍याने आपले जीवनध्येय बदलण्याचे ठरवले. मनोरंजन क्षेत्र सोडून देऊन तो कंबोडियातील गरिबांना मदत करण्यासाठी काम करू लागला. त्याने एका शाळेची स्थापना केली ज्यात मुलांच्या राहण्याची, जेवणाची व शिक्षणाची सोय होती. तरीपण त्याच्या मनात भावनांचे सतत युद्ध चालले आहे. तो जे काही करत आहे त्याचा त्याला आनंद होता, समाधानही मिळत होते परंतु त्याचबरोबर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे तो निराश झाला, त्याला परिस्थितीचा राग येत असे.

वर उल्लेखलेल्या चारही व्यक्‍तींना, आपण जीवनात काय साध्य करू इच्छितोय हे आपल्याला माहीत आहे असे वाटत होते. तरीपण बऱ्‍याच मेहनतीनंतर आपले उद्दिष्ठ गाठल्यावर त्यांच्या जीवनात त्यांना एक पोकळी जाणवली. तुम्ही कशासाठी जगत आहात? कोणत्या गोष्टींना तुम्ही तुमच्या जीवनात प्राधान्य देता? तुम्ही ज्याप्रकारे जीवन व्यतीत करत आहात त्याचा तुम्हाला नंतर पस्तावा होणार नाही, याची तुम्हाला खात्री आहे का? (w०७ ११/१५)