व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती

टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती

टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती

तुम्ही वाचत आहात ते मासिक, टेहळणी बुरूज याच्या अभ्यास आवृत्तीचा पहिला अंक आहे. या मासिकाच्या या नवीन स्वरूपाच्या काही वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण आम्ही देऊ इच्छितो.

यहोवाच्या साक्षीदारांसाठी व प्रगती करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आवृत्ती छापली जाईल. ही आवृत्ती महिन्यातून एकदा निघेल आणि यात चार किंवा पाच अभ्यास लेख असतील. या अभ्यास लेखांची चर्चा केव्हा करायची त्याचा आराखडा मासिकाच्या पहिल्या पानावर छापलेला असेल. टेहळणी बुरूज याच्या सार्वजनिक आवृत्तीत असते त्याप्रमाणे अभ्यास आवृत्तीच्या प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठावर वेगवेगळी चित्रे नसतील, कारण ही आवृत्ती क्षेत्र सेवेत लोकांना देण्यासाठी नाही.

या मासिकाच्या पृष्ठ २ वर तुम्हाला प्रत्येक अभ्यास लेखाच्या किंवा अभ्यास शृंखलांच्या उद्देशाचा थोडक्यात सारांश आणि अभ्यास लेखांव्यतिरिक्‍त असलेल्या लेखांची यादी वाचायला मिळेल. टेहळणी बुरूज अभ्यास संचालकांना हे सदर अतिशय उपयुक्‍त वाटेल. मंडळीच्या सभांमध्ये या लेखांच्या होणाऱ्‍या चर्चेसाठी अर्थपूर्ण तयारी करण्यास हे सदर त्यांना साहाय्य करेल.

या मासिकातील अभ्यास लेखांत, पहिल्या पेक्षा कमी परिच्छेद असतील, हे तुम्हाला दिसून येईल. यामुळे, टेहळणी बुरूज अभ्यासाच्या वेळी मुख्य शास्त्रवचनांवर विचारविमर्श करण्यासाठी अधिक वेळ देता येईल. दर आठवड्याच्या अभ्यास लेखातील सर्व उद्धृत शास्त्रवचने बायबलमधून उघडून पाहण्याचे आम्ही आपल्याला प्रोत्साहन देऊ इच्छितो. काही उल्लेखित शास्त्रवचनांपुढे “वाचा” असे लिहिले असेल तर टेहळणी बुरूज अभ्यासाच्या वेळी ती वाचावीत आणि त्यांवर चर्चा करावी. वेळ असेल तर इतरही शास्त्रवचने वाचली जाऊ शकतात. काही लेखांमध्ये तुम्हाला शास्त्रवचनांपुढे “पडताळून पाहा” असे लिहिलेले आढळेल. ही शास्त्रवचने परिच्छेदातील मुख्य मुद्द्‌यांना थेटपणे सिद्ध करत नसल्यामुळे, मंडळीच्या सभांमध्ये ती सहसा वाचली जाणार नाहीत. तरीपण, ज्या शास्त्रवचनांपुढे “पडताळून पाहा” असे लिहिलेले असते, त्या शास्त्रवचनांमध्ये अधिक रोचक माहिती असते किंवा ज्या मुद्द्‌यांची चर्चा होत आहे त्यांना ही शास्त्रवचने अप्रत्यक्षपणे सिद्ध करतात. टेहळणी बुरूज अभ्यास लेखाची तुम्ही जेव्हा व्यक्‍तिगत तयारी करता तेव्हा तुम्ही ही वचने वाचावीत, असे आम्ही तुम्हाला उत्तेजन देत आहोत. कदाचित तुम्ही टिपणी देताना त्यांचा उल्लेख करू शकता.

इथूनपुढे टेहळणी बुरूज मध्ये वार्षिक अहवाल येणार नाही. सन २००८ पासून तो आमची राज्य सेवा यात पुरवणीच्या रूपात आणि इयरबुकमध्ये येईल. परंतु, आधी उल्लेख केल्याप्रमाणे, अभ्यास आवृत्तीत अभ्यास लेखांव्यतिरिक्‍त इतर लेखही असतील. यांपैकी बहुतेक लेखांची मंडळीच्या सभांमध्ये चर्चा होणार नाही. तरीपण आम्ही तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो, की तुम्ही हे लेख लक्षपूर्वक वाचावेत. कारण, त्यांतही ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ मिळणारे आध्यात्मिक अन्‍न आहे.—मत्त. २४:४५-४७.

शेवटी, टेहळणी बुरूज याची अभ्यास आवृत्ती आणि सार्वजनिक आवृत्ती ही दोन वेगवेगळी मासिके नाहीत. दोन्ही टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचे प्रकाशक आहेत. दोन्ही मासिकांच्या पृष्ठ २ वर सारखाच मजकूर असलेला एक परिच्छेद आहे ज्यात टेहळणी बुरूज मासिकाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दोन्हींचा, वार्षिक बाऊंड व्हॉल्यूममध्ये समावेश केला जाईल. आणि दोन्हीतील माहिती, “तुम्हाला आठवते का?” सदरात मिळेल. हे सदर अभ्यास आवृत्तीत प्रकाशित केले जाईल.

सन १८७९ पासून टेहळणी बुरूज, युद्ध काळात, आर्थिक हालअपेष्टांत आणि छळात विश्‍वासूपणे देवाच्या राज्याच्या सत्यांची घोषणा करीत आहे. यहोवाच्या आशीर्वादाने ते असेच या नवीन रूपात करीत राहो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि टेहळणी बुरूज याच्या नवीन अभ्यास आवृत्तीचा तुम्ही वाचक म्हणून चांगला उपयोग करत असताना यहोवा तुमच्यावर त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव करो, अशी देखील आम्ही प्रार्थना करतो.