व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गिलियड पदवीधरांना ‘खोदायला सुरुवात करण्याचे’ आवाहन

गिलियड पदवीधरांना ‘खोदायला सुरुवात करण्याचे’ आवाहन

१२३ वा गिलियड पदवीदान समारंभ

गिलियड पदवीधरांना ‘खोदायला सुरुवात करण्याचे’ आवाहन

शनिवार, ८ सप्टेंबर, २००७ रोजी ४१ देशांतून आलेले ६,३५२ जण वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या १२३ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित होते. सकाळी १० वाजता, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲन्टनी मॉरिस यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मॉरिस हे नियमन मंडळाचे सदस्य आहेत. त्यानंतर त्यांनी वक्‍त्‌यांपैकी पहिले व संयुक्‍त संस्थानांच्या शाखा समितीत कार्य करणारे गॅरी ब्रो यांना व्यासपीठावर येण्याचे निवेदन केले.

बंधू ब्रो यांनी विद्यार्थ्यांना आश्‍वासन दिले की आपले शारीरिक स्वरूप कसेही असले तरी जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते त्याच्या लेखी भूषणासारखे म्हणजेच रूपवान आहेत. (यिर्म. १३:११) हे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे त्यांनी गिलियड पदवीधरांना प्रोत्साहन दिले. यानंतर नियमन मंडळाच्या गेरिट लॉश यांनी, यहोवाची सेवा करताना प्रतिफळाची अपेक्षा करणे योग्य आहे या विषयावर भर दिला. (इब्री ११:६) पण त्याची सेवा करण्यामागचा आपला हेतू मात्र, निःस्वार्थ प्रेम हाच असला पाहिजे.

यानंतर ईश्‍वरशासित प्रशाला विभागाचे पर्यवेक्षक विलियम सॅम्युलसन यांनी पदवीधरांना सध्या राज्य करत असलेल्या आपल्या राजाविषयी घोषणा करण्याचे जे सन्माननीय कार्य आपल्यावर सोपवण्यात आले आहे ते करत राहण्याचे प्रोत्साहन दिले. या कार्याला शोभेल असे सन्माननीय वर्तनही टिकवून ठेवण्याचे त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. * ईश्‍वरशासित प्रशाला विभागाचे सहपर्यवेक्षक सॅम रॉबरसन यांनी पदवीधरांना नेहमी इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्यास आर्जवले. असे केल्यास त्यांना ‘बंधुवर्गावर प्रीति करणे’ सोपे जाईल असे ते म्हणाले.—१ पेत्र २:१७.

या विचारप्रवर्तक भाषणांनंतर गिलियड प्रशिक्षक मार्क न्यूमेर यांनी अनेक पदवीधरांच्या मुलाखती घेतल्या आणि गिलियड प्रशिक्षणादरम्यान क्षेत्र सेवेत आलेल्या अनुभवांविषयी त्यांना विचारले. हे अनुभव ऐकल्यानंतर, गिलियड विद्यार्थ्यांना सेवाकार्याबद्दल किती ओढ आहे आणि इतरांना मदत करण्याची त्यांना किती उत्कट इच्छा आहे याची सर्व श्रोत्यांना खात्री पटली. यानंतर पॅटरसन बेथेल कार्यालयाचे केंट फिशर यांनी ज्या देशांमध्ये मिशनऱ्‍यांना पाठवण्यात येणार आहे, त्यांपैकी तीन देशांच्या शाखा समिती सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. या बांधवांनी दिलेल्या माहितीवरून सर्व श्रोत्यांना, तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पदवीधरांच्या आईवडिलांना याची खात्री पटली की नवे मिशनरी आपापल्या नियुक्‍त ठिकाणी जातात तेव्हा त्यांची तेथे चांगली काळजी घेतली जाते. भाषांतर सेवा विभागाचे आयझक मरे यांनी यानंतर बऱ्‍याच वर्षांचा अनुभव पदरी असलेल्या काही मिशनऱ्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे अनुभव ऐकून, पदवीधरांना लवकरच जो आनंद अनुभवायला मिळणार आहे त्याची जणू पूर्वझलक मिळाली.

कार्यक्रमातील मुख्य भाषण नियमन मंडळाचे सदस्य जेफ्री जॅक्सन यांनी दिले. त्यांच्या भाषणाचा विषय होता, “सर्वकाही तुम्ही ऐकले आहे—आता पुढे काय?” बंधू जॅक्सन यांनी दक्षिण प्रशांत महासागरातील बेटांवर २५ वर्षे मिशनरी सेवा केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात डोंगरावरील उपदेशाच्या समारोपाची चर्चा केली. येशूने या उपदेशाच्या शेवटी दोन मनुष्यांबद्दल सांगितले. दोघांपैकी एक सुज्ञ तर एक मूर्ख असतो. दोघेही घर बांधतात. वक्‍त्‌यांनी सांगितले की दोघा मनुष्यांची घरे जवळपासच असली तरी मूर्ख मनुष्य वाळूवर घर बांधतो तर सुज्ञ मनुष्य खडकाळ पाया सापडेपर्यंत जमीन खोदून त्यावर घर बांधतो. जेव्हा जोराचे वादळ येते तेव्हा खडकावर बांधलेले घर तसेच राहते पण वाळूवर बांधलेले घर जमिनदोस्त होते.—मत्त. ७:२४-२७; लूक ६:४८.

येशूने खुलासा केला की मूर्ख मनुष्य हा त्या लोकांसारखा आहे, जे येशूच्या शिकवणी फक्‍त ऐकतात पण त्यापुढे काही करत नाहीत. सुज्ञ मनुष्य मात्र अशा लोकांसारखा आहे की जे येशूचे शब्द फक्‍त ऐकतच नाहीत तर त्यांनुसार वागतात. पदवीधरांना उद्देशून बंधू जॅक्सन म्हणाले, “बायबल अभ्यासातून शिकलेल्या गोष्टींचे जेव्हा तुम्ही आपल्या मिशनरी सेवेत पालन कराल तेव्हा तुम्ही त्या सुज्ञ मनुष्यासारखे व्हाल.” म्हणूनच शेवटी त्यांनी पदवीधरांना आपल्या मिशनरी सेवेच्या ठिकाणी ‘खोदायला सुरुवात करण्याचे’ आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, पदवीधरांना पदव्या व नव्या नेमणुका देण्यात आल्या. बंधू मॉरिस यांनी त्यांना शेवटल्या काही सूचना दिल्या. त्यांनी पदवीधरांना नेहमी येशूचे अनुकरण करण्याचे आणि सामर्थ्याकरता सदोदित यहोवावर विसंबून राहण्याचे प्रोत्साहन दिले. यानंतर पदवीदान समारंभाचा समारोप करण्यात आला.

[तळटीप]

^ ईश्‍वरशासित प्रशाला विभाग, शिक्षण समितीच्या निर्देशनाखाली कार्य करतो. गिलियड प्रशाला, शाखा समिती सदस्यांसाठी असलेली प्रशाला व प्रवासी पर्यवेक्षकांसाठी असलेल्या प्रशालेची देखरेख करण्याचे काम या विभागाकडे आहे.

[३१ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: १०

नेमलेले देश: २४

एकूण विद्यार्थी: ५६

सरासरी वय: ३३.५

सत्यात सरासरी वर्षे: १७.९

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.८

[३२ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १२३ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) एस्पार्सा, ई.; पपाया, एस.; बीलाल, ए.; स्वारेस, एम.; एवर्स, ई.; डिमिचीनो, के. (२) रोझा, एम.; फूजीई, आर.; रेटी, ओ.; लवेटन, जे.; व्हॉन लीम्पुटन, एम. (३) बॉस्कायनो, ए.; बेक, के.; बूदानोव्ह, एच.; ब्राझ, सी.; पेल्ट्‌झ, के.; सीयाव, ए. (४) लवेटन, एस.; सॉन्टिको, एच.; कॉन्टी, एस.; विल्सन, जे.; रायलट, जे.; पीयर्स, एस.; फुजीई, के. (५) रोझा, डी.; बॉस्कायनो, एम.; ऑस्टिन, व्ही.; रोड्येल, पी.; बीलाल, पी.; डिमिचीनो, पी. (६) रेटी, बी.; चिझिक, डी.; क्लार्क, सी.; रीडेल, ए.; एस्पार्सा, एफ.; सीयाव, पी.; व्हॉन लीम्पुटन, टी.; (७) रोड्येल, जे.; एवर्स, जे.; ग्रीन, जे.; चिझिक, जे.; सॉन्टिको, एम.; रायलट, एम. (८) पेल्ट्‌झ, एल.; ऑस्टिन, डी.; रीडेल, टी.; बेक, एम.; पीयर्स, डबल्यु.; कॉन्टी, एस.; ग्रीन, एस. (९) स्वारेस, जे.; क्लार्क, जे.; पपाया, एस.; बूदानोव्ह, एम.; विल्सन, आर.; ब्राझ, आर.