व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• मागी लोक येशूला भेटायला केव्हा आले?

एका बायबल आवृत्तीत अशी टिप्पणी करण्यात आली होती: “मेंढपाळांप्रमाणे मागी लोक येशूचा जन्म झाला त्या रात्री त्याला गव्हाणीत भेटायला आले नव्हते. ते काही महिन्यांनंतर आले.” तेव्हा येशू एक ‘बालक’ होता व आपल्या घरात होता.” (मत्त. २:७-११) समजा येशूचा जन्म झाला त्या रात्री जर त्याला सोन्याच्या व इतर अमूल्य भेटवस्तू दिल्या असत्या तर ४० दिवसांनंतर जेव्हा मरीयेने येशूला जेरूसलेमच्या मंदिरात आणले तेव्हा तिने फक्‍त दोन पक्षांचा यज्ञ केला असता का?—१/१, पृष्ठ ३१.

• आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी पुष्कळ जण काय करू शकतात?

‘मी आपल्या परिस्थितीत फेरबदल करून माझ्या जीवनशैलीतील गुंतागुंत कमी करू शकतो का?’ असे आपण स्वतःला विचारू शकतो. एमीने असे केले. ती उच्चभ्रू होती तरीपण समाधानी नव्हती. या जगात करियरच्या मागे लागून, ती विश्‍वासापासून बहकली होती, हे तिला जाणवले. त्यामुळे तिने देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान देण्याचे ठरवले व काही वेळासाठी ती पायनियरींग करू शकली. ती म्हणते: “आज मला जे समाधान अनुभवायला मिळालं आहे ते या जगासाठी राबताना मला कधीही मिळालं नव्हतं.”—१/१५, पृष्ठ १९.

• काही मातांना समाधान कसे मिळू शकते?

बहुसंख्य स्त्रिया घराबाहेर काम करू लागल्या आहेत. काही स्त्रिया घरचा खर्च चालवण्यासाठी नोकरी करतात तर इतर जणी, मनाप्रमाणे खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळावे या इच्छेने किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून नोकरी करतात. बऱ्‍याच स्त्रिया आपापल्या व्यवसायात यशस्वी आणि समाधानी आहेत. ख्रिस्ती मातांची घरी महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः बाळपणात मुलांवर संस्कार करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. काही मातांनी नोकरी सोडून द्यायचे किंवा अर्धवेळेची नोकरी करायचे ठरवले आहे. यामुळे त्यांना बरेच समाधान मिळाले आहे.—२/१, पृष्ठ २८-३१.

मत्तय २४:३४ मध्ये येशूने कोणत्या ‘पिढीविषयी’ सांगितले?

येशूने नकारात्मक अर्थाने “पिढी” या शब्दाचा वापर केला तेव्हा तो त्याच्या काळातल्या दुष्ट लोकांशी किंवा त्यांच्याविषयी बोलत होता. पण, पवित्र आत्म्याने ज्यांचा लवकरच अभिषेक होणार होता त्या आपल्या शिष्यांबरोबर बोलताना त्याने नकारार्थी विशेषणे वापरली नाहीत. मत्तय २४:३२, ३३ मधील गोष्टींच्या आधारावर ते योग्य निष्कर्ष काढू शकणार होते. तेव्हा आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की येशू, पहिल्या शतकातील आणि आधुनिक दिवसांतील आपल्या अभिषिक्‍त अनुयायांविषयी बोलत होता.—२/१५, पृष्ठे २३-४.

याकोब ३:१७ या वचनानुसार आपण कोणते गुण दाखवले पाहिजेत?

शुद्ध असण्याचा असा अर्थ होतो की आपण वाईट गोष्टींना लगेच झिडकारले पाहिजे. (उत्प. ३९:७-९) आपण शांतीप्रिय देखील असले पाहिजे. याचा अर्थ आपण हेकेखोरपणा, भांडखोरपणा किंवा शांतीचा भंग करणारी कृत्ये टाळली पाहिजेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला असा प्रश्‍न विचारावा: ‘मला शांती करणारा म्हणून ओळखले जाते की शांती भंग करणारा म्हणून? माझे वारंवार इतरांशी खटके उडतात का? कोणी काही बोलल्यास मला लगेच वाईट वाटते का, किंवा मी इतरांच्या भावना दुखावतो का? मी इतरांना क्षमा करण्यास तयार असतो का व इतरांनी मी आहे तसा मला स्वीकारले पाहिजे असा अट्टहास करतो का?—३/१५, पृष्ठे २४-५.