‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा
‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा
यहोवाच्या उच्चतम कोटीतील पावित्र्याविषयी बायबल असे सांगते, की तो “पवित्र, पवित्र, पवित्र” देव आहे. (यश. ६:३; प्रकटी. ४:८) ‘पावित्र्य’ असे मराठीत भाषांतर केलेल्या हिब्रू व ग्रीक शब्दांचा अर्थ, निर्मळ, धार्मिक शुद्धता व अशुद्धतेपासून अलिप्त, असा होतो. देवाचे पावित्र्य त्याच्या नैतिक परिपूर्णतेस सूचित करते व अशी नैतिक परिपूर्णता तो आवश्यक असल्याचे समजतो.
असे आहे तर, मग पवित्र देव यहोवा, आपल्या उपासकांनीही शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध असावे अशी अपेक्षा करणार नाही का? नक्कीच. या अपेक्षेविषयी त्याने बायबलमध्ये अगदी स्पष्ट सांगितले आहे. १ पेत्र १:१६ मध्ये आपण असे वाचतो: “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” पण अपरिपूर्ण मानव यहोवासारखे पवित्र बनू शकतात का? यहोवासारखे अगदी पूर्णार्थाने नसले तरी, काही अंशी आपण पवित्र बनू शकतो. आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहून आपण यहोवाची उपासना केली आणि त्याच्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडला तर तो आपल्याला पवित्र लेखेल.
पण, नैतिकरीत्या अशुद्ध जगात आपण स्वतःला शुद्ध कसे ठेवू शकतो? कोणकोणत्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत? शुद्ध राहण्याकरता आपल्या बोलण्यात व आचरणात आपल्याला कोणते बदल करावे लागतील? याबाबतीत आणखी शिकण्यासाठी आपण, सा.यु.पू. ५३७ साली बॅबिलोनच्या बंदिवासातून मायदेशी परतलेल्या यहुद्यांकडून देवाने काय अपेक्षा केली ते पाहू या.
“पवित्र मार्ग”
बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांचे पुन्हा आपल्या मायदेशात पुनर्वसन होईल, असे यहोवाने भाकीत केले. पुनर्वसनाच्या भविष्यवाणीत याची हमी देण्यात आली होती: “तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील.” (यश. ३५:८क) या शब्दांवरून आपल्याला समजते, की यहोवाने यहुद्यांना आपल्या मायदेशी परत जाण्याचा फक्त मार्गच मोकळा केला नाही तर तो त्यांचे संरक्षण करेल, असे आश्वासनही त्याने त्यांना दिले.
पृथ्वीवरील त्याच्या आधुनिक दिवसांतील सेवकांसाठी यहोवाने एक “पवित्र मार्ग” खुला केला जो खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलीपासून खूप दूर नेतो. सन १९१९ मध्ये त्याने अभिषिक्त ख्रिश्चनांना खोट्या धर्माच्या आध्यात्मिक बंदिवासातून मुक्त केले. त्यानंतर या ख्रिश्चनांनी हळूहळू खोट्या शिकवणी आचरण्याचे थांबून आपली उपासना शुद्ध केली. यहोवाचे उपासक या नात्याने आज आपण एका शुद्ध व शांत आध्यात्मिक वातावरणात नांदत आहोत. या वातावरणात आपण यहोवाची उपासना करू शकतो, त्याच्याबरोबर तसेच आपल्या बंधूभगिनींबरोबर शांतीसंबंध राखू शकतो.
लूक १२:३२; प्रकटी. ७:९; योहा. १०:१६) या ‘पवित्र मार्गावर’ येण्याची मुभा “आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण” करण्यास तयार असलेल्या सर्वांना आहे.—रोम. १२:१.
अभिषिक्त ख्रिश्चनांच्या ‘लहान कळपाच्या’ सदस्यांनी व ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांनी’ पवित्र असलेल्या मार्गावर चालण्याची निवड केली आहे व ते इतरांनाही या मार्गावर येण्याचे आमंत्रण देत आहेत. (‘त्या मार्गाने अपवित्र जन जाणार नाहीत’
सा.यु.पू. ५३७ साली, मायदेशी परतणाऱ्या यहुद्यांना एक महत्त्वाची अट पूर्ण करायची होती. ‘पवित्र मार्गावर’ चालण्यास पात्र असलेल्यांबद्दल यशया ३५:८ख मध्ये असे म्हटले आहे: ‘त्या मार्गाने अपवित्र जन जाणार नाहीत.’ यहुदी लोक, खऱ्या उपासनेची पुनःर्स्थापना करण्यास जेरुशलेमेस परतत असल्यामुळे, स्वार्थी, पवित्र गोष्टींबद्दल अनादर बाळगणाऱ्या किंवा अशुद्ध गोष्टी आचरणाऱ्यांना तेथे थारा नव्हता. परतलेल्यांना यहोवाच्या उच्च नैतिक दर्जांनुरुप वागायचे होते. आजही जे देवाची संमत्ती मिळवू पाहतात त्यांनी देखील हीच अट पूर्ण करण्याची गरज आहे. त्यांनी ‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटले पाहिजे. (२ करिंथ. ७:१) पण मग आपण कोणत्या अशुद्ध गोष्टी टाळल्या पाहिजेत?
प्रेषित पौलाने असे लिहिले: “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा.” (गलती. ५:१९) जारकर्मामध्ये, विवाहाच्या चाकोरी बाहेर आचरल्या जाणाऱ्या लैंगिक कृत्यांचा समावेश होतो ज्यांत जननेंद्रियांचा उपयोग केला जातो. कामातुरपणा यामध्ये, “लैंगिक स्वैराचार, अश्लीलपणा, निर्लज्ज व कामुक आचरण” यांचा समावेश होतो. जारकर्म आणि कामातुरपणा तर यहोवाच्या पवित्रतेच्या अगदी विरोधात आहेत. त्यामुळे जारकर्मी व कामातूर असलेल्या व्यक्तीला ख्रिस्ती मंडळीचा भाग बनता येत नाही किंवा तिला बहिष्कृत केले जाते. तसेच “सर्वप्रकारची अशुद्धता” आचरणाऱ्या व्यक्तीलाही देवाच्या मंडळीत कसलाही थारा नाही.—इफिस. ४:१९.
“अशुद्धता” या शब्दामध्ये पापाचे अनेक अर्थबोध आहेत. अशुद्धता यासाठी असलेला ग्रीक शब्द, अमंगळ किंवा कोणत्याही प्रकारचा गलिच्छपणा—मग तो आचरणातील असो, बोलण्यातील असो अथवा साक्षीदार नसलेल्यांबरोबरील आपला संबंध असो—याला सूचित करतो. अमंगळपणात किंवा गलिच्छपणात अशुद्ध आचरणाचा बऱ्यापैकी समावेश होतो परंतु त्यासाठी कदाचित न्यायिक कारवाईची गरज लागणार नाही. * मग जे असे अशुद्ध आचरण आचरतात ते पवित्र राहण्यास झटत आहेत का?
समजा एक ख्रिश्चन व्यक्ती चोरून चोरून पोर्नोग्राफी (अश्लील चित्रे, चित्रपट, साहित्य, वगैरे) पाहण्यास सुरू करते. तिच्या मनात जसजशा अशुद्ध भावना येऊ लागतात तसतशी, यहोवासमोर शुद्ध भूमिकेत उभे राहण्याचा तिचा दृढनिश्चय कमजोर होऊ लागतो. ती कदाचित घोर पातक करण्याइतपत गेली नसेल परंतु, ‘जे काही शुद्ध आहे, जे काही श्रवणीय आहे, जो काही सद्गुण आहे व जी काही स्तुतीयोग्य गोष्ट आहे’ यावर मनन करण्याचे तिने सोडून दिले आहे. (फिलिप्पै. ४:८) पोर्नोग्राफी अशुद्ध आहे आणि जी व्यक्ती पोर्नोग्राफी पाहते तिचा देवाबरोबरील संबंध नक्कीच बिघडतो. आपल्यामध्ये तर कोणत्याही प्रकारच्या अशुद्धतेचा उल्लेखही होता कामा नये.—इफिस. ५:३.
दुसरे एक उदाहरण घ्या. समजा एका ख्रिश्चन व्यक्तीला हस्तमैथुनाची अर्थात मुद्दामहून कामवासना चेतवण्याची २ करिंथ. ७:१; कलस्सै. ३:५.
सवय जडली आहे. ही व्यक्ती कदाचित पोर्नोग्राफी पाहत असताना हस्तमैथुन करत असेल अथवा नसेल. “हस्तमैथुन” हा शब्द बायबलमध्ये नसला तरीसुद्धा, ही सवय मन व भावना दूषित करणारी आहे, यात काही शंका आहे का? अशाप्रकारे, आपले मन व आपल्या भावना सतत दूषित होत राहिल्या तर यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडणार नाही का व आपण देवाच्या नजरेत अशुद्ध ठरणार नाही का? प्रेषित पौलाने दिलेला सल्ला आपण गांभीर्याने घेऊ या. त्याने असे म्हटले: “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू” या. आणि ‘पृथ्वीवरील आपले अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—हे जिवे मारा.’—सैतानाचे वर्चस्व असलेल्या या जगात अशुद्ध वर्तनाला केवळ खपवूनच घेतले जात नाही तर त्याला प्रोत्साहनही दिले जाते. अशुद्ध वर्तनाचा मोह टाळणे कदाचित खूप कठीण असेल. पण खऱ्या ख्रिश्चनांनी ‘परराष्ट्रीय लोक ज्या भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे चालू नये.’ (इफिस. ४:१७) चोरून चोरून अथवा राजरोसपणे आपण आचरत असलेले अशुद्ध वर्तन टाळले तरच यहोवा आपल्याला ‘पवित्र मार्गावर’ चालण्याची परवानगी देईल.
“तेथे सिंह असणार नाहीत”
पवित्र देव यहोवा याची कृपा आपण मिळवू इच्छित असू तर आपल्याला आपल्या वर्तनात व बोलण्यात खूप बदल करावे लागतील. यशया ३५:९ मध्ये म्हटले आहे: “तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्त्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही,” हाच तर “पवित्र मार्ग आहे.” आपल्या वर्तनात व बोलण्यात हिंसक व तापट स्वभाव असलेल्या लोकांची तुलना लाक्षणिक अर्थाने हिंस्र पशूंशी करण्यात आली आहे. अशा लोकांना देवाच्या नव्या धार्मिक जगात काहीही थारा नसेल. (यश. ११:६; ६५:२५) त्यामुळे, ज्यांना यहोवा देवाची कृपा हवी आहे त्यांनी असा पशूसमान स्वभाव सोडून पवित्र राहण्यास झटले पाहिजे.
“सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दुर करण्यात येवोत,” असा सल्ला आपल्याला बायबलमध्ये देण्यात आला आहे. (इफिस. ४:३१) कलस्सैकर ३:८ मध्ये आपण असे वाचतो: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.” या दोन्ही वचनात वापरण्यात आलेला “निंदा” हा शब्द मुळात हानीकारक, खालावलेल्या किंवा ईशनिंदक बोलण्याला सूचित करतो.
आज, खोचक व अश्लील बोलणे लोकांच्या तोंडून सर्रासपणे ऐकू येते; एवढेच नव्हे तर घरातील सदस्यही एकमेकांबरोबर अशाप्रकारे बोलतात. नवरा-बायको एकमेकांवर व आपल्या मुलांवर झोंबणारे, क्रूर किंवा कमीपणा दर्शवणारे टीकेचे बोल झाडतात. पण ख्रिस्ती घरांतील सदस्यांमध्ये अशाप्रकारचे आक्रमक बोलणे असता कामा नये.—१ करिंथ. ५:११.
‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटणे—एक आशीर्वाद!
पवित्र देव यहोवा याची सेवा करणे हा आपल्याला मिळालेला किती मोठा सुहक्क आहे! (यहो. २४:१९) यहोवाने आपल्याला ज्या आध्यात्मिक नंदनवनात आणले आहे ते अतिशय मौल्यवान आहे. यहोवाच्या नजरेत पवित्र राहणे हा निश्चित्तच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
पृथ्वीला नंदनवन बनवण्याची देवाने केलेली प्रतिज्ञा लवकरच वास्तवात उतरणार आहे. (यश. ३५:१, २, ५-७) या नंदनवनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना व देवाच्या इच्छेनुसार वागण्यास झटणाऱ्यांना या नंदनवनातील शांतीमय वातावरणात राहण्याचा आशीर्वाद मिळेल. (यश. ६५:१७, २१) तेव्हा आपण आध्यात्मिकरीत्या शुद्ध राहून देवाची उपासना करू या व त्याच्याबरोबर जवळीक साधू या.
[तळटीप]
^ परि. 12 “हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता” आचरणारे व वर ज्याची चर्चा होत आहे ती “अशुद्धता” यात कोणता फरक आहे याबद्दल अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज (इंग्रजी) जुलै १५, २००६, पृष्ठे २९-३१ पाहा.
[२६ पानांवरील चित्र]
‘पवित्र मार्गावर’ चालण्याकरता यहुद्यांना कोणत्या अटी पूर्ण करायच्या होत्या?
[२७ पानांवरील चित्र]
पोर्नोग्राफीमुळे यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडतो
[२८ पानांवरील चित्र]
‘सर्व प्रकारचा . . . गलबला व निंदा ही . . . तुम्हापासून दूर करण्यात येवोत’