व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाचे कार्य

नियमन मंडळाचे कार्य

नियमन मंडळाचे कार्य

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ हे, देवाचे अभिषिक्‍त सेवक असलेल्या समर्पित बांधवांचे मिळून बनले आहे. हे मंडळ, विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाचे प्रतिनिधीत्व करते. आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गावर, आध्यात्मिक अन्‍न देण्याची व संपूर्ण पृथ्वीवरील राज्य प्रचार कार्यावर देखरेख करण्याची तसेच या कार्याला गती देण्याची जबाबदारी आहे.—मत्त. २४:१४, ४५-४७.

नियमन मंडळाच्या सभा दर आठवडी व खासकरून बुधवारी होत असतात. यामुळे मंडळातील बांधवांना ऐक्याने कार्य करता येते. (स्तो. १३३:१) नियमन मंडळातील सदस्य विविध समित्यांमध्येही सेवा करतात. राज्याच्या कार्यावर देखरेख करणाऱ्‍या प्रत्येक समितीचे एक कार्यक्षेत्र आहे. त्याविषयीचे संक्षिप्त वर्णन खाली देण्यात आले आहे.

सूत्रसंचालक समिती: ही समिती, नियमन मंडळाच्या इतर समित्यांचे सूत्रसंचालक व त्यांचे सचिव, यांनी मिळून बनली आहे. सचिवही नियमन मंडळाचा सदस्य असतो. सर्व समित्या सुरळीतपणे व प्रभावीपणे कार्य करत असल्याची खातरी ही समिती करते. तसेच आणीबाणीचे प्रसंग, छळ, आपत्ती व संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांवर प्रभाव पडणाऱ्‍या इतर निकडीच्या बाबी देखील ही समिती हाताळते.

▪ सभासद समिती: या समितीतील बांधवांवर, जगभरातील बेथेल कुटुंबांमध्ये सेवा करणाऱ्‍या सदस्यांच्या व्यक्‍तिगत, आध्यात्मिक हितांची काळजी घेण्याची तसेच त्यांना साहाय्य करण्याची जबाबदारी आहे. बेथेल कुटुंबासाठी नवीन सदस्य निवडण्याची व त्यांना आमंत्रण देण्याची तसेच बेथेल सेवेविषयी असलेले प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी देखील या समितीतील बांधवांवर आहे.

▪ प्रकाशन समिती: ही समिती, बायबल साहित्यांची छपाई, प्रकाशन आणि हे साहित्य जगभर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याच्या कार्यावर देखरेख करते. यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या विविध कॉर्पोरेशनच्या मालकीच्या असलेल्या व ते चालवत असलेल्या छपाईखान्यांवर व मालमत्तेवर ही समिती देखरेख करते. जगभरात चाललेल्या राज्य कार्यासाठी जी देणगी पाठवली जाते त्या देणगीचा चांगल्या रीतीने वापर करण्याची व्यवस्था ही समिती करते.

▪ सेवा समिती: या समितीत कार्य करणारे बांधव, प्रचार कार्य आणि मंडळ्या, पायनियर, वडील व प्रवासी पर्यवेक्षक यांच्यासंबंधाने असलेल्या कार्यांवर देखरेख करतात. आमची राज्य सेवा तयार करण्याच्या कामावर देखरेख करते तसेच गिलियड प्रशाला व सेवा प्रशिक्षण प्रशाला यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रण देते; त्यानंतर पदवीधरांना वेगवेगळ्या ठिकाणी नेमण्याच्या कामावरही ही समिती देखरेख करते.

▪ शिक्षण समिती: ही समिती, संमेलने, अधिवेशने आणि मंडळीच्या सभा यांमध्ये सादर केला जाणारा कार्यक्रम तयार करण्याच्या कामावर देखरेख करते. बेथेल कुटुंबातील सदस्यांसाठी बायबल-आधारित कार्यक्रम तयार करणे, गिलियड प्रशाला, पायनियर सेवा प्रशाला यासारख्या वेगवेगळ्या प्रशाला आणि ऑडिओ व व्हिडिओ कार्यक्रम तयार करण्याचे कामही या समितीजवळ आहे.

▪ लेखन समिती: बंधूभगिनींकरता व जनतेकरता आध्यात्मिक अन्‍न शब्दबद्ध करून त्याचे प्रकाशन आणि वितरण करण्याची या समितीची जबाबदारी आहे. ही समिती, बायबलवरील प्रश्‍नांची उत्तरे देते आणि नाटकाच्या पटकथा व भाषणांच्या रुपरेषा तयार करते. जगभर होणाऱ्‍या भाषांतर कार्यावरही ही समिती देखरेख ठेवते.

प्रेषित पौलाने अभिषिक्‍त जनांच्या मंडळीची तुलना मानवी शरीराशी केली. प्रत्येक सदस्याची महत्त्वाची भूमिका, देवाने दिलेले कार्य करताना त्यांचे एकमेकांवर अवलंबून राहणे, त्यांच्यातील प्रेम व सहकार्य यावर त्याने जोर दिला. (रोम. १२:४, ५; १ करिंथ. १२:१२-३१) मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त, या शरीरातील प्रत्येक सदस्याला, उत्तम सहकार्य, सुसूत्रता आणि आध्यात्मिक पोषण याकरता जे काही लागते ते सर्व तो देतो. (इफिस. ४:१५, १६; कलस्सै. २:१९) अशाप्रकारे, यहोवा आपल्या पवित्र आत्म्याकरवी मार्गदर्शन देत असलेल्या कार्यात नियमन मंडळ पुढाकार घेत आहे.