यहोवा—प्राचीन काळातील “मुक्तिदाता”
यहोवा—प्राचीन काळातील “मुक्तिदाता”
“हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस.”—स्तो. ७०:५.
१, २. (क) देवाचे उपासक त्याला मदतीची याचना केव्हा करतात? (ख) कोणता प्रश्न विचार करण्याजोगा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कोठे सापडते?
सुटीला गेलेले असताना, एका जोडप्याला त्यांची २३ वर्षांची विवाहित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची बातमी मिळते. काहीतरी घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ते लगेच घरी जायला निघतात. वाटेत ते क्षणोक्षणी यहोवाला कळकळीची प्रार्थना करतात. २० वर्षांच्या एका साक्षीदार तरुणाला डॉक्टर सांगतात, की त्याला एक दुर्धर आजार झाला आहे. या आजारामुळे काही काळातच तो पूर्णपणे पांगळा होईल. तो लागलीच यहोवाला प्रार्थना करतो. एक एकटी माता नोकरीच्या शोधात आहे. तिला १२ वर्षांची एक मुलगी आहे. तिच्याजवळ त्या दोघींच्या जेवणापुरतेही पैसे नाहीत. ती काकुळतीने यहोवाला प्रार्थना करते. या उदाहरणांवरून दिसून येते, की यहोवाच्या उपासकांवर कठीण परीक्षा किंवा बिकट प्रसंग येतात तेव्हा ते आपोआपच त्याच्याकडे मदतीची याचना करतात. तुम्हीही कधी अशा एखाद्या कठीण प्रसंगी अगतिकपणे यहोवाला मदतीसाठी हाक मारली आहे का?
२ या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, तो असा की, आपण मदतीसाठी केलेल्या प्रार्थनांचे उत्तर यहोवा देईल अशी आपण खरेच अपेक्षा करू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ७० व्या स्तोत्रात सापडते व हे उत्तर आपल्या विश्वासाला नक्कीच पुष्टी देणारे ठरेल. हे हृदयस्पर्शी स्तोत्र यहोवाचा विश्वासू सेवक दावीद याने लिहिले होते. दाविदाने स्वतः जीवनात अनेक कठीण परीक्षांना व खडतर आव्हानांना तोंड दिले होते. यहोवाच्या प्रेरणेने स्तोत्रकर्त्या दाविदाने असे म्हटले: “हे देवा, . . . माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस.” (स्तो. ७०:५) या ७० व्या स्तोत्राचे परीक्षण केल्यास आपल्याला कळेल, की आपणही कठीण प्रसंगी यहोवाचा धावा का करू शकतो आणि तो आपला “मुक्तिदाता” होईल असा पूर्ण भरवसा का बाळगू शकतो.
“माझा मुक्तिदाता तू आहेस”
३. (क) सत्तराव्या स्तोत्रात कोणती तातडीची विनंती आहे? (ख) दावीद ७० व्या स्तोत्रात कोणता भरवसा व्यक्त करतो?
३ सत्तराव्या स्तोत्राच्या सुरुवातीला व शेवटी दावीद देवाला तातडीने आपली मदत करण्याची विनंती करतो. (स्तोत्र ७०:१-५ वाचा.) माझी सुटका करण्याची “त्वरा कर,” असे दावीद यहोवाला विनवतो. मधल्या वचनांत, दावीद पाच विनंत्या करतो. यांपैकी प्रत्येक विनंतीत तो अमुक-अमुक ‘होवो’ अशी इच्छा व्यक्त करतो. पहिल्या तीन विनंत्या दाविदाच्या जिवावर उठलेल्या त्याच्या शत्रूंविषयी आहेत. यहोवाने या दुष्ट वैऱ्यांना लज्जित व फजीत करावे अशी दावीद प्रार्थना करतो. पुढील दोन विनंत्या देवाच्या लोकांच्या संदर्भात आहेत, ज्या आपल्याला ४ थ्या वचनात वाचायला मिळतात. यात दावीद यहोवाचा शोध घेणारे आनंद करोत व त्याची स्तुती करोत अशी प्रार्थना करतो. स्तोत्राच्या शेवटी दावीद यहोवाला म्हणतो: “माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस.” येथे एक गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. दावीद आणखी एक विनंती करत असल्यासारखा, “यहोवा माझा साहाय्यकर्ता व मुक्तिदाता होवो” असे म्हणत नाही. तर, “तू आहेस” असे म्हणून दावीद यहोवावर असणारा आपला भरवसा व्यक्त करतो. यहोवा आपल्याला अवश्य मदत करेल याची दाविदाला खात्री आहे.
४, ५. दाविदाबद्दल ७० व्या स्तोत्रातून आपल्याला काय शिकायला मिळते आणि आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?
४ दाविदाबद्दल ७० व्या स्तोत्रातून काय दिसून येते? दाविदाच्या शत्रूंना कसेही करून त्याला जिवे मारायचे होते. अशा परिस्थितीत, दाविदाने स्वतःच्या बळावर या समस्येला तोंड देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, यहोवा या शत्रूंचा त्याला योग्य वाटेल त्या वेळी व त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने नायनाट करेल असा भरवसा दाविदाने बाळगला. (१ शमु. २६:१०) यहोवाचा शोध घेणाऱ्यांना तो साहाय्य करतो व त्यांची सुटका करतो हा विश्वास त्याने कधीही सोडला नाही. (इब्री ११:६) दाविदाला खात्री होती, की यहोवाचे खरे उपासक आनंदी होऊन इतरांनाही त्याच्याबद्दल सांगण्याद्वारे त्याचा महिमा करू शकतात. कारण त्यांच्याजवळ असे करण्याची अनेक कारणे आहेत.—स्तो. ५:११; ३५:२७.
५ दाविदाप्रमाणेच आपणही पूर्ण भरवसा बाळगू शकतो की यहोवा आपला साहाय्यकर्ता व “मुक्तिदाता” आहे. म्हणूनच, जेव्हा आपल्यासमोर कठीण प्रसंग येतात किंवा आपल्याला मदतीची अत्यंत गरज असते तेव्हा यहोवाने आपल्याला तातडीने मदत करावी अशी त्याला प्रार्थना करणे योग्य आहे. (स्तो. ७१:१२) पण, आपल्या प्रार्थनांचे यहोवा कशा प्रकारे उत्तर देतो? यावर चर्चा करण्याअगोदर, यहोवा कोणत्या तीन मार्गांनी दाविदाचा मुक्तिदाता बनला, किंवा निकडीच्या काळात त्याला साहाय्य केले याविषयी आपण पाहू या.
यहोवाने विरोधकांपासून सुटका केली
६. यहोवा नीतिमान लोकांना संकटातून सोडवतो हे दाविदाला कसे समजले?
६ यहोवा आपल्याला साहाय्य करेल याविषयी नीतिमान जन खात्री बाळगू शकतात, हे त्याकाळी उपलब्ध असलेल्या प्रेरित अहवालांवरून दाविदाला माहीत होते. नोहाच्या काळात जेव्हा यहोवाने जलप्रलयात दुष्ट जगाचा नाश केला तेव्हा त्याने नोहा व त्याच्या देवभीरू कुटुंबाचा बचाव केला होता. (उत्प. ७:२३) सदोम व अमोरा या शहरांच्या दुष्ट रहिवाशांवर जेव्हा यहोवाने अग्नी व गंधकाचा वर्षाव केला, तेव्हा त्याने नीतिमान लोट व त्याच्या दोन मुलींना आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जाण्यास मदत केली होती. (उत्प. १९:१२-२६) तसेच, गर्विष्ठ फारो व त्याच्या सैन्याचा यहोवाने तांबड्या समुद्रात नाश केला तेव्हा त्याने आपल्या लोकांना सुरक्षित ठेवले व भयंकर नाशापासून वाचवले. (निर्ग. १४:१९-२८) म्हणूनच, दुसऱ्या एका स्तोत्रात दाविदाने यहोवाला “संकटांतून मुक्त करणारा देव” म्हणून त्याची स्तुती केली.—स्तो. ६८:२०.
७-९. (क) यहोवा आपल्याला सोडवू शकतो अशी खात्री दावीद का बाळगू शकत होता? (ख) दाविदाने आपल्या सुटकेचे श्रेय कोणाला दिले?
७ पण यहोवा आपल्याला संकटांतून सोडवू शकतो यावर केवळ या अहवालांमुळेच दाविदाला भरवसा होता असे नाही. तर यहोवाचे ‘सनातन बाहू’ त्याची सेवा करणाऱ्यांना सोडवण्यास समर्थ आहेत हे त्याने स्वतः अनुभवले होते. (अनु. ३३:२७) यहोवाने अनेकदा दाविदाला त्याच्या ‘बलाढ्य वैऱ्यांच्या’ तावडीतून सोडवले होते. (स्तो. १८:१७-१९, ४८) याचे एक उदाहरण पाहू या.
८ युद्धात दाविदाने केलेल्या पराक्रमाबद्दल जेव्हा इस्राएली स्त्रिया त्याचे गुणगान करू लागल्या, तेव्हा शौल राजा मत्सराने इतका पेटून उठला की त्याने भाला फेकून दाविदाला ठार मारण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. (१ शमु. १८:६-९) पण दोन्ही वेळेस दावीद त्याच्या हल्ल्यांतून सुखरूप बचावला. दावीद हा एक कुशल, चपळ व अनुभवी योद्धा असल्यामुळेच हे शक्य झाले का? नाही. बायबलमधील अहवालात सांगितल्यानुसार, “परमेश्वर त्याच्याबरोबर असे.” (१ शमुवेल १८:११-१४ वाचा.) नंतर जेव्हा पलिष्टी लोकांच्या हातून दाविदाला जिवे मारण्याचा शौलाचा कट फसला तेव्हा “शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे.”—१ शमु. १८:१७-२८.
९ दाविदाने आपल्या सुटकेचे श्रेय कोणाला दिले? १८ व्या स्तो. १८:२) यहोवा आपल्या लोकांना सोडवण्यास समर्थ आहे हे जाणून आपला विश्वास वाढत नाही का?—स्तो. ३५:१०.
स्तोत्राच्या उपरीलेखनात असे सांगितले आहे की, ‘परमेश्वराने दाविदाला शौलाच्या हातून सोडविले त्या दिवशी तो ही वचने गीतरूपाने परमेश्वरापुढे बोलला.’ दाविदाने एका गीतातून आपल्या भावना व्यक्त करून म्हटले: “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो.” (यहोवाने आजारपणात संभाळ केला
१०, ११. स्तोत्र ४१ यात उल्लेख केलेले आजारपण दाविदाला केव्हा आले असावे, हे आपण कशावरून ठरवू शकतो?
१० दावीद राजा एकदा खूप आजारी पडला होता. याविषयी स्तोत्र ४१ यात उल्लेख आढळतो. यामुळे काही काळ तो अंथरुणाला खिळला होता. तो इतका आजारी होता की “तो आता उठणार नाही,” असे त्याच्या काही शत्रूंना वाटू लागले. (७ व ८ वचन) दावीद केव्हा इतका आजारी पडला होता? या स्तोत्रात उल्लेख केलेल्या परिस्थितीवरून असे वाटते की दाविदाचा पुत्र अबशालोम याने राजासन बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे घडले असावे. हा दाविदाकरता अतिशय यातनादायी काळ होता.—२ शमु. १५:६, १३, १४.
११ उदाहरणार्थ, आपल्या पंक्तीस बसणाऱ्या एका भरवशाच्या मित्राने आपला विश्वासघात केल्याचा दावीद उल्लेख करतो. (९ वे वचन) यावरून आपल्याला दाविदाच्या जीवनातील एक घटना आठवते. अबशालोमाने बंड पुकारले तेव्हा दाविदाचा भरवशाचा सल्लागार अहीथोफेल फितूर झाला व त्याने राजाविरुद्ध बंड करण्यास अबशालोमाशी संगनमत केले. (२ शमु. १५:३१; १६:१५) राजा दावीद आधीच आजाराने जर्जर झाला होता. त्याला अंथरुणावरून उठण्याचीही ताकद नव्हती. शिवाय, त्याचे मेलेले तोंड पाहण्यास व आपल्या कुटील योजना पूर्ण करण्यास उतावीळ असलेले द्रोही सतत त्याच्या भोवती होते. अशावेळी त्याची काय अवस्था झाली असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.—५ वे वचन.
१२, १३. (क) दाविदाने कशाविषयी भरवसा व्यक्त केला? (ख) देवाने दाविदाला कशा प्रकारे बळ दिले असावे?
१२ दाविदाचा आपल्या ‘मुक्तिदात्यावरील’ भरवसा कधीही डळमळला नाही. आजारी असलेल्या यहोवाच्या विश्वासू सेवकाबद्दल दाविदाने असे म्हटले: “संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील. तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला संभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलितोस.” (स्तो. ४१:१, ३) या ठिकाणीही, “परमेश्वर त्याला संभाळील” असे म्हणून दाविदाने त्याच्याविषयी जो भरवसा व्यक्त केला त्याकडे लक्ष द्या. यहोवा आपल्याला सोडवील याची दाविदाला खात्री होती. पण कसे?
१३ यहोवाने काहीतरी चमत्कार करून आपले आजारपण दूर करावे अशी दाविदाने अपेक्षा केली नाही. त्याऐवजी, यहोवा आपल्याला “सांभाळील” म्हणजेच, अंथरुणाला खिळलेले असताना तो आपल्याला साहाय्य व बळ देईल याची दाविदाला खात्री होती. दाविदाला यहोवाच्या साहाय्याची नक्कीच गरज होती. आजारपण व त्यामुळे आलेल्या दुर्बलतेसोबतच, त्याच्याभोवती अनेक शत्रू होते जे त्याच्याविषयी वाईट बोलत होते. (५ व ६ वे वचन) यहोवाने कदाचित दाविदाला सांत्वनदायक गोष्टींची आठवण करून देण्याद्वारे त्याला बळ दिले असावे. दाविदाने म्हटले: “मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखितोस.” (१२ वे वचन) अशा दुर्बल अवस्थेतही आणि त्याचे शत्रू त्याच्याविषयी वाईट गोष्टी बोलत असूनही, यहोवाच्या दृष्टीत मात्र तो सात्विक होता या विचारानेही दाविदाला बळ मिळाले असेल. दावीद त्याच्या आजारातून पूर्णपणे बरा झाला. आजारी असलेल्यांना यहोवा सांभाळतो हे जाणून आपल्याला दिलासा मिळत नाही का?—२ करिंथ. १:३.
यहोवाने गरजा पुरवल्या
१४, १५. दावीद व त्याच्या माणसांवर उपासमारीची वेळ केव्हा आली आणि त्यांना कोणती मदत मिळाली?
१४ दावीद इस्राएलाचा राजा बनला तेव्हा तो चांगल्यातले चांगले भोजन खात-पीत असे व कित्येकांना आपल्या महालात भोजन करण्यास आमंत्रित करत असे. (२ शमु. ९:१०) पण, भूक व तहान काय असते हे देखील दाविदाला माहीत होते. त्याचा पुत्र अबशालोम याने बंड पुकारून त्याचे सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दावीद आपल्या काही विश्वासू साथीदारांसोबत जेरूसलेम शहराबाहेर निघून गेला. त्यांनी यार्देन नदीच्या पूर्वेकडे गिलादाच्या प्रांतात पलायन केले. (२ शमु. १७:२२, २४) परागंदा होऊन जगणे भाग पडल्यामुळे दावीद व त्याची माणसे अन्न, पाणी व विश्रांतीशिवाय इकडे-तिकडे भटकू लागली. त्या निर्मनुष्य अरण्यात त्यांना अन्न-पाणी कोठून मिळणार होते?
१५ शेवटी, दावीद व त्याची माणसे महनाईम या शहरात येऊन पोचली. तेथे त्यांची शोबी, माखीर, व बर्जिल्ल्य २ शमुवेल १७:२७-२९ वाचा.) या तीन जणांनी दाखवलेली असाधारण निष्ठा व उदारता यांमुळे दाविदाचे मन नक्कीच कृतज्ञतेने भरून आले असेल. त्यांनी केलेले उपकार दावीद कधीही विसरणे शक्य होते का?
या तीन धाडसी पुरुषांशी गाठ पडली. हे तीन पुरुष दाविदाला मदत करण्यास पुढे आले. दाविदाला मदत करणे अत्यंत धोकेदायक होते, कारण अबशालोमास राज्यपद बळकावण्यात यश आल्यास तो दाविदाला मदत करणाऱ्या कोणालाही जिवंत सोडणार नव्हता. तरीसुद्धा, देवाने नियुक्त केलेल्या राजाला मदत करण्यासाठी हे तीन पुरुष आपला जीव धोक्यात घालण्यासही तयार होते. दावीद व त्याच्या माणसांची दयनीय अवस्था पाहून या तीन एकनिष्ठ प्रजाजनांनी त्यांना खाटा, भांडीकुंडी, गहू, जव पीठ, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाची पनीर इत्यादी सामुग्री आणून दिली. (१६. दावीद व त्याच्या माणसांच्या गरजा पुरवणारा मुळात कोण होता?
१६ पण, दावीद व त्याच्या माणसांच्या गरजा पुरवणारा मुळात कोण होता? दाविदाला खात्री होती की यहोवा आपल्या लोकांची काळजी वाहतो. एखाद्या गरजू सहउपासकाला मदत करण्यास पुढे यायला, यहोवा आपल्या इतर सेवकांना नक्कीच प्रवृत्त करू शकतो. गिलाद प्रांतात जे घडले त्याविषयी विचार करताना, त्या तीन माणसांनी दाखवलेला दयाळुपणा हा खरे तर यहोवाच्या प्रेमळ काळजीचाच पुरावा आहे हे दाविदाने नक्कीच ओळखले असेल. आपल्या जीवनाच्या अखेरच्या दिवसांत दाविदाने असे लिहिले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तो. ३७:२५) यहोवा आपल्या सेवकांच्या गरजा पुरवतो हे जाणून आपल्याला सांत्वन मिळत नाही का?—नीति. १०:३.
‘लोकांस कसे सोडवावे हे प्रभूला कळते’
१७. यहोवाने कोणती गोष्ट खरी असल्याचे पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे?
१७ प्राचीन काळात दाविदाप्रमाणेच यहोवा आपल्या इतर अनेक उपासकांचा मुक्तिदाता ठरला. “भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे हे प्रभूला कळते,” असे प्रेषित पेत्राने म्हटले आहे. त्याचे हे शब्द किती खरे आहेत हे दाविदाच्या काळापासून आजपर्यंत देवाने पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. (२ पेत्र २:९) याची आणखी दोन उदाहरणे पाहू या.
१८. हिज्कीयाच्या काळात यहोवाने कशा प्रकारे आपल्या लोकांना संकटातून सोडवले?
१८ सा.यु.पू. आठव्या शतकात, शक्तिशाली अश्शूर सैन्याने यहुदावर हल्ला केल्यामुळे जेरूसलेम शहराला धोका निर्माण झाला, तेव्हा हिज्कीया राजाने अशी प्रार्थना केली: “परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.” (यश. ३७:२०) हिज्कीयाला सर्वात जास्त काळजी होती, ती देवाच्या नावाची व त्याच्या प्रतिष्ठेची. त्याच्या कळकळीच्या प्रार्थनेचे यहोवाने उत्तर दिले. एकाच रात्रीत, एका देवदूताने १,८५,००० अश्शूरी सैनिकांना जिवे मारले व अशा रीतीने यहोवाच्या विश्वासू सेवकांना संकटातून सोडवले.—यश. ३७:३२, ३६.
१९. कोणत्या इशाऱ्याकडे लक्ष दिल्यामुळे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचा संकटातून बचाव झाला?
१९ येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी यहुदियातील आपल्या शिष्यांना एक भविष्यसूचक इशारा दिला. (लूक २१:२०-२२ वाचा.) यानंतर कित्येक दशके उलटली. मग, सा.यु. ६६ साली काही यहुद्यांनी पुकारलेल्या बंडामुळे प्रवृत्त होऊन रोमी सैन्याने जेरूसलेमवर चढाई केली. सेनापती सेस्टियस गॅलस याच्या नेतृत्त्वाखाली रोमी सैन्याने मंदिराच्या वेशीचा काही भाग पाडला; पण मग अचानक त्यांनी माघार घेतली. येशूने भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे नाशापासून बचावण्याची हीच संधी आहे हे ओळखून विश्वासू ख्रिस्ती डोंगरांकडे पळून गेले. सा.यु. ७० साली रोमी सैन्य परत आले. या वेळेस, त्यांनी माघार घेतली नाही, तर जेरूसलेम शहरास नेस्तनाबूत केले. ज्या ख्रिश्चनांनी येशूच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले होते, त्यांचा या भयानक संकटातून बचाव झाला.—लूक १९:४१-४४.
२०. यहोवा आपला “मुक्तिदाता” आहे याबद्दल आपण खात्री का बाळगू शकतो?
२० यहोवा आपल्या लोकांना साहाय्य करतो याविषयीच्या पुराव्यांवर लक्ष दिल्यामुळे आपल्या विश्वासाला नक्कीच पुष्टी मिळते. गतकाळात त्याने जे काही केले त्यामुळे आपल्याला भरवसा ठेवण्यास आधार मिळतो. सध्या किंवा भविष्यात आपल्याला कोणत्याही आव्हानांना तोंड द्यावे लागले, तरीसुद्धा यहोवा आपला “मुक्तिदाता” आहे याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो. पण, यहोवा कशा प्रकारे आपली सुटका करेल? आणि या लेखाच्या सुरुवातीला ज्यांचा उल्लेख करण्यात आला होता, त्यांचे पुढे काय झाले? याविषयी आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.
तुम्हाला आठवते का?
• सत्तरावे स्तोत्र आपल्याला कोणता भरवसा बाळगण्यास मदत करते?
• दाविदाला त्याच्या आजारपणात यहोवाने कशा प्रकारे सांभाळले?
• यहोवा आपल्या लोकांचा त्यांच्या विरोधकांपासून बचाव करण्यास समर्थ आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[६ पानांवरील चित्र]
यहोवाने हिज्कीयाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले