व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“खरोखर हेच देवाचे अति पवित्र व महान नाव आहे”

“खरोखर हेच देवाचे अति पवित्र व महान नाव आहे”

“खरोखर हेच देवाचे अति पवित्र व महान नाव आहे”

सन १४३० मध्ये कूसाचा निकलस याने एका उपदेशात वरील विधान केले. * निकलसला पुष्कळ विषयांत आवड होती जसे की ग्रीक व इब्री भाषेचा अभ्यास, तत्त्वज्ञान, धर्मसिद्धान्त, गणितशास्त्र आणि खगोलशास्त्र. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मशास्त्राची अत्युच्च पदवी मिळवली. १४४८ मध्ये त्याची कार्डिनल म्हणून नेमणूक करण्यात आली.

कूस या शहराला आता बेर्नकास्टल-कूस या नावाने ओळखले जाते. जर्मनीतील बॉन शहराच्या दक्षिणेला १३० किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. येथे सुमारे ५५० वर्षांपूर्वी कूसाच्या निकलसने वयोवृद्धांसाठी एका वृद्धाश्रमाची स्थापना केली होती. याच इमारतीत असलेल्या ग्रंथालयात सध्या कूसाची ३१० पेक्षा जास्त हस्तलिखिते ठेवलेली आहेत. यांमध्ये कुसानुस २२० नावाचा एक हस्तलिखित ग्रंथ आहे, ज्यात १४३० मध्ये कूसाने दिलेला उपदेश वाचायला मिळतो. इन प्रिन्सीपीओ एराट व्येर्बुम (प्रारंभी शब्द होता) या उपदेशात कूसाचा निकलस याने यहोवासाठी इओउवा या लॅटिन उच्चाराचा वापर केला. * सदर ग्रंथातील ५६ व्या पृष्ठावर देवाच्या नावाबद्दल हे विधान केलेले आहे: “हे देवाने स्वतःला दिलेले नाव आहे. हे टेट्रग्रॅमटॉन म्हणजेच चार अक्षरांचे मिळून बनलेले आहे. . . . खरोखर हेच देवाचे अति पवित्र व महान नाव आहे.” इब्री शास्त्रवचनातील मूळ लेखनात देवाचे नाव आढळते या वस्तूस्थितीला निकलसचे हे विधान दुजोरा देते.—निर्ग. ६:३.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासून असलेल्या या हस्तलिखिताला सध्या अस्तित्वात असलेल्या लिखाणांपैकी सर्वात जुने म्हणता येईल, ज्यात देवाच्या चार अक्षरी नावाचे “इओउवा” हे रूप वापरण्यात आले आहे. हा लिखित पुरावा परत एकदा हे सिद्ध करतो, की “जेहोवाह” या देवाच्या नावाशी मिळतीजुळती असणारी रूपे कित्येक शतकांपासून सर्वसामान्यपणे लिखाणांतून वापरण्यात आली आहेत.

[तळटीपा]

^ परि. 2 कूसाचा निकलस यालाच नीकोलाउस क्रीफ्ट्‌स (क्रेप्स), नीकोलाउस कुसानुस आणि नीकोलाउस व्हॉन कूस या नावानेही ओळखले जायचे. कूस हे जर्मनीतील त्याच्या जन्मस्थानाचे नाव होते.

^ परि. 3 हा उपदेश त्रैक्याचे समर्थन करण्यासाठी होता.

[१६ पानांवरील चित्र]

कूसाचे ग्रंथालय