व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• आपण “शुद्ध वाणी” म्हणजेच देव आणि त्याच्या उद्देशांविषयीच्या सत्याबद्दल अस्खलितपणे कसे बोलू शकतो? (सफ. ३:९)

कोणतीही भाषा अस्खलितपणे बोलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, त्याच प्रकारे “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलण्यासाठी आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, अस्खलितपणे बोलणाऱ्‍यांचे अनुकरण केले पाहिजे, बायबलमधल्या पुस्तकांच्या नावांचे आणि काही वचनांचे पाठांतर केले पाहिजे, शिकलेल्या गोष्टींची पुनरुक्‍ती केली पाहिजे, मोठ्याने वाचले पाहिजे, व्याकरणाचा किंवा सत्याच्या नमुन्याचा अभ्यास केला पाहिजे, सतत प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अभ्यासाची निश्‍चित वेळ ठरवली पाहिजे आणि शुद्ध वाणी “बोलण्याच्या” प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे.—८/१५, पृष्ठे २१-२५.

• ‘तीनपदरी दोरीची’ कल्पना विवाहाच्या बाबतीत कशी लागू करता येईल?

“तीनपदरी दोरी” ही एक अलंकारिक संज्ञा आहे. (उप. ४:१२) हे रूपक विवाहास लागू केल्यास, पती व पत्नी या दोरीतील दोन धागे असून, ते एका तिसऱ्‍या धाग्याने एकमेकांशी गुंफलेले आहेत असे म्हणता येईल. हा तिसरा धागा म्हणजे यहोवा देव. वैवाहिक बंधनात यहोवा देवाला स्थान दिल्यामुळे पतीपत्नीला निरनिराळ्या समस्यांना तोंड देणे शक्य होते व वैवाहिक जीवनात आनंदी होता येते.—९/१५, पृष्ठ १६.

इब्री लोकांस ६:२ येथे ‘हात ठेवण्याविषयी’ जो उल्लेख करण्यात आला आहे तो कशास सूचित करतो?

‘हात ठेवण्याविषयीचा’ उल्लेख येथे ख्रिस्ती वडिलांच्या नियुक्‍तीस नव्हे, तर पवित्र आत्म्याची चमत्कारिक कृपादाने देण्यास सूचित करतो. (प्रे. कृत्ये ८:१४-१७; १९:६)— ९/१५, पृष्ठ ३२.

• मंडळीत पुढाकार घेणारे इतरांना कशा प्रकारे आदर दाखवू शकतात?

एक मार्ग म्हणजे वडील जन इतरांना असे काहीही करण्यास सांगणार नाहीत, जे ते स्वतः करू इच्छित नाहीत. आणि दुसरा मार्ग म्हणजे इतरांना कोणतीही विनंती करताना किंवा निर्देशने देताना ते त्याची कारणेही स्पष्ट करतील.—१०/१५, पृष्ठ २२.

• इस्राएली मेंढपाळ आकडीचा ज्या प्रकारे वापर करत, त्यावरून ख्रिस्ती वडील काय शिकू शकतात?

इस्राएलातील मेंढपाळ आपल्या कळपाला वाट दाखवण्यासाठी लांब काठी किंवा आकडी वापरत. मेंढरे मेंढवाड्यात जाताना किंवा त्यातून बाहेर पडताना “काठीखालून” जात आणि मेंढपाळ त्यांना मोजत असे. (लेवी. २७:३२) त्याच प्रकारे, ख्रिस्ती मेंढपाळांनीही आपल्या देखरेखीखाली असलेल्या कळपाला चांगल्या प्रकारे ओळखण्याची व त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.—११/१५, पृष्ठ ९.