यिर्मयाचे अनुकरण करा
१२५ वा गिलियड पदवीदान समारंभ
यिर्मयाचे अनुकरण करा
“हा गिलियड वर्ग एक मैलाचा दगड ठरेल,” असे नियमन मंडळाचे सदस्य जेफ्री जॅक्सन यांनी म्हटले. सप्टेंबर १३, २००८ रोजी झालेल्या १२५ व्या गिलियड वॉचटावर बायबल प्रशालेच्या पदवीदान समारंभाला उपस्थित असलेल्या ६,१५६ श्रोत्यांना उद्देशून त्यांनी हे उद्गार काढले. या वर्गातील ५६ पदवीधरांना मिळून गिलियड प्रशालेने आजपर्यंत ८,००० हून अधिक मिशनऱ्यांना “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पाठवले आहे.—प्रे. कृत्ये १:८.
पदवीदान कार्यक्रमाचे अध्यक्ष, बंधू जॅक्सन यांनी विचारले, “विश्वसनीयता तुमच्या सेवेची गुणवत्ता कशी वाढवेल?” आपली विश्वसनीयता वाढवणाऱ्या पुढील चार गोष्टी त्यांनी सांगितल्या: योग्य मनोवृत्ती राखणे, उत्तम उदाहरण मांडणे, सर्व शिकवणी बायबलच्या आधारावर देणे आणि यहोवाचे नाव जाहीर करण्यावर आपले लक्ष केंद्रित करणे.
“तुम्हाला सर्व काही समजेल असे नाही,” या विषयावर शिक्षण समितीत काम करणाऱ्या डेविड शेफर यांनी चर्चा केली. यहोवाला शरण गेल्यास व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचे’ मार्गदर्शन नम्रपणे स्वीकारल्यास मिशनरी कार्य करत असताना समोर येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची हे त्यांना ‘समजेल’ असे आश्वासन त्यांनी गिलियड विद्यार्थ्यांना दिले.—नीति. २८:५; मत्त. २४:४५.
यानंतर, “कोणत्याही गोष्टीस तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त होऊ देऊ नका” या विषयावर नियमन मंडळाचे सदस्य जॉन इ. बार यांनी भाषण दिले. एका प्रेमळ पित्याप्रमाणे त्यांनी दिलेला सल्ला ऐकल्यावर, पदवीधरांच्या व त्यांच्या पालकांच्या मनात मिशनरी कार्याबद्दल असलेल्या सर्व चिंता नाहीशा झाल्या. “देवाच्या प्रीतीत राहणे किती सुरक्षित व सुखावह असू शकते,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मिशनऱ्यांनी स्वतःहून देवाच्या प्रीतीपासून विभक्त होण्याचे ठरवल्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही.
“सर्वोत्कृष्ट वस्त्र परिधान करा,” असे उत्तेजन ईश्वरशासित प्रशाला विभागाचे सॅम रॉबरसन यांनी सर्वांना दिले. येशूच्या सबंध जीवनक्रमाचा अभ्यास केल्याने व त्याचा आपल्या जीवनात अवलंब केल्याने पदवीधरांना ‘प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करणे’ शक्य होईल. (रोम. १३:१४) पुढे, एखादी व्यक्ती सन्माननीय कशी होऊ शकते ही गोष्ट, ईश्वरशासित प्रशाला विभागाचे पर्यवेक्षक, विल्यम सॅम्युलसन यांनी अधिक स्पष्ट केली. आपण मनुष्याच्या नव्हे तर देवाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय ठरतो हे त्यांनी दाखवून दिले.
मायकल बर्नेट या प्रशिक्षकाने, विद्यार्थ्यांना क्षेत्र सेवेत आलेल्या अनुभवांचे कथन करण्यास सांगितले. पॅटरसन, न्यूयॉर्क येथील गिलियड प्रशालेस उपस्थित असलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना अनेकदा उरकलेल्या क्षेत्रात कार्य करण्यास नेमले होते. परंतु अशा क्षेत्रातही त्यांना आस्था दाखवणारे लोक भेटले. यावेळी शाखा समितीच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशालेस उपस्थित असलेल्या तीन बांधवांच्या मुलाखती जेरल्ड ग्रीजल यांनी घेतल्या. त्यांच्या मुलाखती ऐकून, विदेशी कार्य नेमणुकीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी गिलियड पदवीधरांच्या मनाची तयारी झाली.
नियमन मंडळाचे सदस्य व ४२ व्या गिलियड प्रशालेचे पदवीधर डेविड स्प्लेन यांनी “यिर्मयाचे अनुकरण करा” या विषयावर भाषण दिले. सुरुवातीला आपल्या कार्य नेमणुकीबद्दल यिर्म. १:७, ८) त्याचप्रमाणे नवीन मिशनऱ्यांनाही यहोवा बलिष्ठ करील. बंधू स्प्लेन यांनी पुढे म्हटले, “तुमचे एखाद्याबरोबर पटत नसेल तर त्या व्यक्तीचे तुम्हाला मनापासून आवडणारे दहा गुण लिहून काढा. जर तुम्हाला ते जमले नाही तर याचा अर्थ, त्या व्यक्तीला तुम्ही मुळात चागंले ओळखलेच नाही असा होतो.”
यिर्मया अतिशय भयभीत झाला होता परंतु यहोवाने त्याला बलिष्ठ केले. (यिर्मयामध्ये स्वार्थ-त्यागाची भावना होती. यहोवाने यिर्मयावर सोपवलेले कार्य सोडून द्यावे असे त्याला वाटले तेव्हा त्याने प्रार्थना केली आणि यहोवा आपल्या पाठीशी असल्याची त्याला जाणीव झाली. (यिर्म. २०:११) “त्याचप्रमाणे तुम्हीही निराश होता तेव्हा यहोवाला प्रार्थना करा. आणि यहोवा कशा प्रकारे तुमची मदत करतो हे जाणून तुम्ही थक्क व्हाल” असे बंधू स्प्लेन यांनी म्हटले.
पदवीदान समारंभाच्या शेवटी, गिलियड पदवीधर कोणकोणत्या मार्गांनी आपली विश्वसनीयता वाढवू शकतात याची पुन्हा एकदा अध्यक्षांनी श्रोत्यांना आठवण करून दिली. आपण मिशनऱ्यांवर विश्वास ठेवू शकतो असे लोकांना वाटेल तेव्हा त्यांचा संदेश अधिक प्रभावशाली ठरेल.—यश. ४३:८-१२.
[२२ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ६
नेमलेले देश: २१
एकूण विद्यार्थी: ५६
सरासरी वय: ३२.९
सत्यात सरासरी वर्षे: १७.४
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३
[२३ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १२५ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत ओळींना पुढून मागे अशा रीतीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.
(१) हॉजसन, ए.; वॉल, ए.; बीरेन्स, के.; हॉर्टलॉनो, एम.; न्यूमन, एल.; डी कॉसो, ए. (२) जेन्केन्स, जे.; जॉरझेमस्की, टी.; मेंडेस, एन.; कोरोनॉ, व्ही.; कॉनॉलिटा, एल. (३) फ्रायर, एच.; सावीज, एम.; टिडवेल, के.; एरिकसन, एन.; डिक, ई.; मॅकबेथ, आर. (४) पेरेझ, एल.; प्यूझ, एल.; स्कीडमोर, ए.; यंग, बी.; मॅकब्राईड, एन.; रॉनडॉन, पी.; गुडमन, ई. (५) बीरेन्स, एम.; फर्गसन, जे.; पिरसन, एन.; चॅपमन, एल.; वॉर्डल, जे.; कॉनॉलिटा, एम. (६) पेरेझ, पी.; डी कॉसो, डी.; यंग, टी.; रॉनडॉन, डी.; गुडमन, जी.; जेन्केन्स, एम.; डिक, जी. (७) कोरोनॉ, एम.; वॉल, आर.; प्यूझ, एस.; मेंडेस, एफ.; जॉरझेमस्की, एस.; सावीज, टी. (८) न्यूमन, सी.; फर्गसन, डी.; स्कीडमोर, डी.; एरिकसन, टी.; मॅकब्राईड, जे.; पिरसन, एम.; चॅपमन, एम. (९) हॉजसन, के.; वॉर्डल, ए.; मॅकबेथ, ए.; टिडवेल, टी.; फ्रायर, जे.; हॉर्टलॉनो, जे.