ख्रिस्ती कुटुंबे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात!
ख्रिस्ती कुटुंबे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात!
‘ख्रिस्ताने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.’—१ पेत्र २:२१.
१. (क) निर्मितीच्या कार्यात देवाच्या पुत्राने कोणती भूमिका निभावली? (ख) मानवजातीबद्दल येशूच्या काय भावना आहेत?
देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली तेव्हा त्याचा एकुलता एक पुत्र एका ‘कुशल कारागिराप्रमाणे’ त्याच्यासोबत होता. यानंतर, यहोवाने पृथ्वीवर असंख्य जातींच्या पशूपक्ष्यांची व वनस्पतींची रचना व निर्मिती केली. तसेच, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य निर्माण करून देवाने पृथ्वीवर त्याला राहण्यासाठी एक नंदनवन बनवले. हे सर्व करत असताना, देवाच्या पुत्राने आपल्या पित्यासोबत मिळून कार्य केले. येशू या नावाने पुढे ओळखल्या गेलेल्या देवाच्या या पुत्राला मानवजातीबद्दल मनस्वी प्रेम होते. तो ‘मनुष्यजातीच्या ठायी आनंद पावे’ असे बायबल त्याच्याविषयी सांगते.—नीति. ८:२७-३१; उत्प. १:२६, २७.
२. (क) अपरिपूर्ण मानवजातीला मदत करण्यासाठी यहोवाने काय केले? (ख) जीवनाच्या कोणत्या पैलूविषयी बायबल मार्गदर्शन पुरवते?
२ पहिल्या मानवी जोडप्याने पाप केल्यानंतर, मानवजातीला पापापासून मुक्त करणे हा यहोवाच्या उद्देशाचा एक महत्त्वाचा भाग बनला. हे साध्य करण्यासाठी यहोवाने ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची तरतूद केली. (रोम. ५:८) याशिवाय, उपजतच अपरिपूर्ण असूनही मनुष्याला जीवनात यशस्वी होता यावे म्हणून यहोवाने त्याच्या मार्गदर्शनाकरता आपले वचन बायबल दिले. (स्तो. ११९:१०५) मानवांना आपले कौटुंबिक जीवन सुदृढ व आनंदी बनवण्यास मदत करील असा उपयुक्त सल्ला यहोवाने बायबलमध्ये पुरवला आहे. विवाहाच्या संदर्भात उत्पत्तिचे पुस्तक म्हणते, की “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.”—उत्प. २:२४.
३. (क) विवाहाबद्दल येशूने काय शिकवले? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
३ विवाहाचे बंधन हे कायमचे बंधन असावे असा यहोवाचा मूळ हेतू होता. पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना येशूनेही या गोष्टीवर भर दिला. शिवाय, त्याने लोकांना काही उपयुक्त मत्त. ५:२७-३७; ७:१२) येशूच्या शिकवणी आणि पृथ्वीवर असताना त्याने मांडलेला आदर्श पती, पत्नी, आईवडील व मुले या सर्वांनाच सुखी, समृद्ध जीवन जगण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो याची चर्चा या लेखात केली जाईल.
तत्त्वे देखील सांगितली. या तत्त्वांचे पालन केल्यास त्यांना वैवाहिक व कौटुंबिक जीवनाला घातक ठरू शकणारे आचार-विचार टाळण्यास मदत मिळणार होती. (ख्रिस्ती पती आपल्या पत्नीला मान देतो
४. येशूची भूमिका व एका ख्रिस्ती पतीची भूमिका यात कोणते साम्य आहे?
४ येशू ज्याप्रमाणे मंडळीचे मस्तक आहे त्याप्रमाणेच कुटुंबाचा प्रमुख म्हणून देवाने पतीला नियुक्त केले आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२३, २५) खरोखर, ख्रिस्ती पुरुषांकरता येशू एक आदर्श आहे. तो आपल्या अनुयायांशी ज्या प्रकारे वागला त्याच प्रकारे ख्रिस्ती पतींनी आपल्या पत्नींशी वागले पाहिजे. येशूने त्याला देवाकडून देण्यात आलेल्या अधिकाराचा कशा प्रकारे वापर केला याविषयी आता आपण पाहू या.
५. येशू त्याच्या शिष्यांशी कशा प्रकारे वागला?
५ येशू “मनाचा सौम्य व लीन” होता. (मत्त. ११:२९) पण वेळ पडल्यास निर्णायक पाऊल उचलण्यासही तो कचरत नसे. स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून त्याने कधीही अंग चोरले नाही. (मार्क ६:३४; योहा. २:१४-१७) त्याने आपल्या शिष्यांना प्रेमळपणे, आणि प्रसंगी वारंवार सल्ला दिला. (मत्त. २०:२१-२८; मार्क ९:३३-३७; लूक २२:२४-२७) पण, त्याने कधीही त्यांना हिणवले नाही किंवा त्यांच्याशी तो घालून पाडून बोलला नाही. येशूचे आपल्यावर प्रेम नाही किंवा त्याच्या शिकवणींनुसार वागणे आपल्याला कधीच जमणार नाही असे त्याने त्यांना कधीही वाटू दिले नाही. उलट, त्याने त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. (लूक १०:१७-२१) येशूच्या या प्रेमळ व दयाळू वागणुकीमुळे त्याने आपल्या शिष्यांचा आदर मिळवला!
६. (क) येशू आपल्या शिष्यांसोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून एक पती काय शिकू शकतो? (ख) पेत्राने पतींना कोणते प्रोत्साहन दिले?
६ येशूच्या उदाहरणावरून पतींना हे शिकायला मिळते की कुटुंबाचे मस्तक असण्याचा अर्थ त्यांनी जुलूम करावा असा होत नाही. उलट, त्यांनी आपल्या पत्नीला मान दिला पाहिजे व तिच्यावर निःस्वार्थ प्रेम केले पाहिजे. प्रेषित पेत्राने पतींना आपआपल्या पत्नीला ‘मान देण्याद्वारे’ येशूच्या प्रेमळ उदाहरणाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले. (१ पेत्र ३:७ वाचा.) तर मग, देवाने दिलेली मस्तकपदाची जबाबदारी पार पाडत असताना एक पती आपल्या पत्नीला कशा प्रकारे मान देऊ शकतो?
७. एक पती कशा प्रकारे आपल्या पत्नीला मान देऊ शकतो? उदाहरण द्या.
७ कुटुंबासाठी कोणताही निर्णय घेताना आपल्या पत्नीचे मत व भावना विचारात घेण्याद्वारे पती तिला मान देऊ शकतो. घर किंवा नोकरी बदलण्यासारखे मोठे निर्णय असोत किंवा सुटीत कोठे जायचे, वाढत्या महागाईत कोठे काटकसर करता येईल यांसारखे लहानसहान निर्णय असोत; असे सर्व निर्णय घेताना पतीने आपल्या पत्नीचे मत विचारात घेतले पाहिजे. यामुळे त्याला कुटुंबाच्या फायद्याकरता समंजसपणे व विचारशीलपणे निर्णय घेता येईल आणि पत्नीलाही नीति. १५:२२) आपल्या पत्नीला मान देणारा ख्रिस्ती पती तिचे प्रेम व आदर तर कमावतोच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे तो यहोवाचे मन आनंदित करतो.—इफिस. ५:२८, २९.
त्याच्या निर्णयाला सहकार्य करणे सोपे जाईल. (ख्रिस्ती पत्नी आपल्या पतीचा मनापासून आदर करते
८. हव्वेचे उदाहरण अनुकरणीय का नाही?
८ अधीनता दाखवण्याच्या बाबतीत ख्रिस्ती पत्नी देखील येशूच्या उत्कृष्ट उदाहरणाचे अनुकरण करू शकते. अधिकाराप्रती येशूचा दृष्टिकोन, पहिल्या स्त्रीने आपल्या पतीच्या अधिकाराप्रती दाखवलेल्या मनोवृत्तीपेक्षा किती वेगळा आहे! हव्वेने येणाऱ्या पिढ्यांमधील पत्नींसाठी चांगले उदाहरण मांडले नाही. यहोवाने आदामाला तिचे मस्तक म्हणून नेमले होते आणि त्याच्याद्वारेच तिला यहोवाच्या आज्ञा व सूचना कळवल्या जात होत्या. पण हव्वेने या व्यवस्थेला मान दिला नाही. आदामाने तिला सांगितलेल्या देवाच्या आज्ञेचे तिने पालन केले नाही. (उत्प. २:१६, १७; ३:३; १ करिंथ. ११:३) हे खरे आहे की सैतानाने तिला भुलवल्यामुळे तिने पाप केले. पण तरीसुद्धा, देवाच्या आज्ञेविरुद्ध वागण्यास सांगणाऱ्या त्या अनोळखी आवाजाचे ऐकावे किंवा नाही याविषयी तिने आपल्या पतीचा सल्ला घ्यायला हवा होता. उलट, तिने स्वतःच आपल्या पतीला काय करायचे ते सांगितले आणि असे करण्याद्वारे ती आपली मर्यादा सोडून वागली.—उत्प. ३:५, ६; १ तीम. २:१४.
९. अधीनता दाखवण्याबद्दल येशूने कोणते उदाहरण मांडले?
९ दुसरीकडे पाहता, आपल्या मस्तकाच्या अधीन राहण्याच्या बाबतीत येशूने सर्वात उत्तम आदर्श मांडला. त्याच्या मनोवृत्तीवरून आणि त्याच्या एकंदरीत जीवनक्रमावरून स्पष्टपणे दिसून येते, की “देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.” याउलट, “त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे . . . दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पै. २:५-७) आज येशू राजा म्हणून राज्य करत आहे. तरीसुद्धा, त्याची मनोवृत्ती बदललेली नाही. आजही तो सर्व बाबतीत नम्रपणे आपल्या पित्याच्या आज्ञेत राहतो आणि त्याच्या अधिकाराला मान देतो.—मत्त. २०:२३; योहा. ५:३०; १ करिंथ. १५:२८.
१०. पत्नी आपल्या पतीच्या अधिकाराचे कशा प्रकारे समर्थन करू शकते?
१० ख्रिस्ती पत्नीने आपल्या पतीच्या अधिकाराचे समर्थन करण्याद्वारे येशूचे अनुकरण केले पाहिजे. (१ पेत्र २:२१; ३:१, २ वाचा.) दैनंदिन जीवनात तिला असे करण्याचे अनेक अवसर मिळतात. एक उदाहरण पाहू या. समजा, मुलाला एखादी गोष्ट करण्यासाठी आईवडिलांची परवानगी हवी आहे. तो आईजवळ येऊन परवानगी मागतो. जर त्याबाबतीत आईवडिलांनी आधी चर्चा केलेली नसेल, तर आईने आपल्या मुलाला विचारले पाहिजे, की “तू याविषयी बाबांना विचारलं आहेस का?” जर मुलाने वडिलांना विचारले नसेल, तर कोणताही निर्णय घेण्याअगोदर तिने आपल्या पतीशी या बाबतीत चर्चा केली पाहिजे. तसेच, ख्रिस्ती पत्नीने कधीही आपल्या मुलांच्या देखत आपल्या पतीच्या विरोधात बोलू नये किंवा त्याचे म्हणणे चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करू नये. पतीची एखादी गोष्ट तिला पटत नसेल तर याविषयी तिने एकांतात त्याच्याशी बोलावे.—इफिस. ६:४.
आईवडिलांसाठी येशूचे उदाहरण
११. येशूचे उदाहरण आईवडिलांसाठी अनुकरणीय का आहे?
११ येशूला बायको-मुले नव्हती, तरीसुद्धा ख्रिस्ती आईवडिलांसाठी तो एक उत्कृष्ट आदर्श आहे. असे का म्हणता लूक ८:१) शिष्यांबद्दल येशूची जी मनोवृत्ती होती आणि त्यांच्याशी तो ज्या प्रकारे वागला त्यातून त्यांनी एकमेकांशी कसे वागावे हे त्याने त्यांना शिकवले.—योहान १३:१४-१७ वाचा.
येईल? येशूने त्याच्या शब्दांतून व कृतींतून शिष्यांना प्रेमळपणे व धीराने शिकवले. त्यांच्यावर सोपवलेले कार्य त्यांनी कसे पार पाडावे हे त्याने त्यांना दाखवले. (१२, १३. आपल्या मुलांनी देवाला भिऊन वागावे असे वाटत असल्यास आईवडिलांनी काय केले पाहिजे?
१२ मुले सहसा आपल्या आईवडिलांच्या चांगल्यावाईट गुणांचे अनुकरण करतात. म्हणूनच आईवडिलांनी स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘टीव्ही पाहण्यासाठी किंवा करमणुकीसाठी आपण जितका वेळ घालवतो आणि त्याच्या तुलनेत बायबलच्या अभ्यासाला, क्षेत्र सेवाकार्याला जितका वेळ देतो त्यावरून आपण आपल्या मुलांना काय शिकवत आहोत? प्रामाणिकपणे विचार केल्यास, आपल्या कुटुंबात कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जात आहे? दैनंदिन जीवनात आणि कोणतेही निर्णय घेताना खऱ्या उपासनेला सर्वात जास्त महत्त्व देण्याद्वारे आपण आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श ठेवत आहोत का?’ आपल्या मुलांनी देवाला भिऊन वागावे असे जर आईवडिलांना वाटत असेल, तर देवाचे नियम आधी त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणात असणे जरुरीचे आहे.—अनु. ६:६.
१३ आपले आईवडील दररोजच्या जीवनातील लहानमोठ्या सर्व बाबतींत बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात हे पाहून मुलांच्या मनावर नक्कीच चांगला प्रभाव पडेल. किंबहुना, आईवडिलांच्या चांगल्या उदाहरणामुळे, आपल्या मुलांना ते जे काही शिकवतात ते जास्त परिणामकारक ठरेल. पण, आईवडिलांच्या बोलण्यात आणि त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यात तफावत असल्याचे मुलांना दिसल्यास, बायबलची तत्त्वे फारशी महत्त्वाची नाहीत किंवा व्यवहारोपयोगी नाहीत असा निष्कर्ष ते काढतील. आणि असे घडल्यास, देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा त्यांच्यावर दबाव येईल तेव्हा ते त्याला सहजासहजी बळी पडतील.
१४, १५. आईवडिलांनी आपल्या मुलांना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला शिकवले पाहिजे आणि असे करण्याचा एक मार्ग कोणता आहे?
१४ मुलांना लहानाचे मोठे करण्यात केवळ त्यांच्या भौतिक गरजा पुरवणे एवढेच सामील नाही याची ख्रिस्ती आईवडिलांना जाणीव आहे. तर मग, मुलांना केवळ भौतिक दृष्टिकोनाने हितकारक असणाऱ्या ध्येयांचा पाठपुरावा करायला शिकवणे सुज्ञपणाचे ठरेल का? (उप. ७:१२) येशूने आपल्या शिष्यांना आध्यात्मिक ध्येयांना प्राधान्य द्यायला शिकवले होते. (मत्त. ६:३३) म्हणून येशूप्रमाणेच, ख्रिस्ती आईवडिलांनीही आपल्या मुलांच्या मनात आध्यात्मिक ध्येये मिळवण्याची इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१५ अशी इच्छा आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी, त्यांना पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या बंधुभगिनींचा सहवास मिळेल अशा प्रत्येक संधीचा आईवडिलांनी फायदा घ्यावा. पायनियर सेवेत असलेल्या बंधुभगिनींशी किंवा विभागीय पर्यवेक्षक व त्यांची पत्नी यांच्याशी मैत्री करणे तुमच्या मुलांकरता किती प्रेरणादायी ठरेल याचा विचार करा. मिशनरी, बेथेलमध्ये सेवा करणारे तसेच आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रकल्पांत कार्य करणारे बांधव यहोवाच्या सेवेतील आनंदाविषयी सहसा भरभरून बोलतात. त्यांच्याकडे नक्कीच सांगण्यासारखे अनेक प्रोत्साहनदायक अनुभव असतील. त्यांची निःस्वार्थ सेवावृत्ती पाहून तुमच्या मुलांना योग्य निर्णय घेण्यास, प्रशंसनीय ध्येये ठेवण्यास तसेच पूर्ण वेळेच्या सेवेत राहून आपला उदरनिर्वाह करता यावा म्हणून कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवण्यास खूप मदत मिळेल.
मुलांनो—येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे कराल?
१६. येशूने कशा प्रकारे आपल्या पृथ्वीवरील आईवडिलांचा आणि आपल्या स्वर्गातील पित्याचा सन्मान केला?
१६ मुलांनो, तुमच्यासाठीही येशू एक उत्तम आदर्श आहे. तो आपले पालनपोषण करणाऱ्या योसेफ व मरीयेच्या आज्ञेत राहिला. (लूक २:५१ वाचा.) त्याला जाणीव होती, की ते अपरिपूर्ण असले तरी, त्याला लहानाचे मोठे करण्याची जबाबदारी देवाने त्यांच्यावर सोपवली होती. आणि त्याअर्थी त्यांचा सन्मान करण्याचे त्याचे कर्तव्य होते. (अनु. ५:१६; मत्त. १५:४) मोठेपणीही येशू नेहमी आपल्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेनुसार वागला. असे करताना, त्याच्यासमोर अनेक प्रलोभने आली पण त्याने त्यांना यशस्वीपणे तोंड दिले. (मत्त. ४:१-१०) मुलांनो, कधीकधी तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आज्ञेविरुद्ध वागण्याचा मोह होतो का? तर मग, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला साहाय्य करेल?
१७, १८. (क) शाळेत मुलांना कोणत्या प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागतो? (ख) कोणती गोष्ट आठवणीत ठेवल्यास परीक्षांचा सामना करण्यासाठी मुलांना मदत होऊ शकते?
१७ तुमच्या शाळासोबत्यांपैकी बहुतेकांना बायबलमधील नीतिनियमांबद्दल जराही आदर नसेल. कदाचित ते तुम्हाला बायबलच्या विरोधात असलेल्या गोष्टींमध्ये त्यांच्यासोबत सामील होण्याची गळ घालत असतील आणि तुम्ही नकार दिल्यास ते तुमची थट्टा करत असतील. तुम्ही एखाद्या गोष्टीत सामील होण्यास नकार दिल्यामुळे तुमचे शाळासोबती तुमच्याशी कधी अपमानकारक रीतीने बोलतात का? अशा वेळी तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? त्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही चारचौघांसारखेच वागायचे ठरवल्यास तुमच्या आईवडिलांचे व यहोवा देवाचे मन दुखावेल हे तुम्हाला माहीत आहे. शिवाय, तुम्ही आपल्या शाळासोबत्यांचे अनुकरण केल्यास शेवटी काय परिणाम होईल याचा विचार करा. कदाचित तुम्ही आपल्यासमोर काही ध्येये ठेवली असतील. उदाहरणार्थ पायनियर किंवा सेवा सेवक बनण्याचे, जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन किंवा बेथेलमध्ये जाऊन सेवा करण्याचे ध्येय. तुमचे शाळासोबती तुम्हाला ही ध्येये गाठण्यास मदत करू शकतात का?
१८ तुमच्यावर कधीकधी विश्वासाची परीक्षा पाहणारे प्रसंग येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवाल? आपला आदर्श, येशू याची आठवण करा. त्याच्यासमोर प्रलोभने आली तेव्हा तो खंबीर राहिला आणि जे योग्य आहे त्यालाच धरून राहिला. हे आठवणीत ठेवल्यास, एखादी गोष्ट चुकीची आहे व तिच्यात आपण मुळीच सामील होणार नाही हे आपल्या सोबत्यांना सांगण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल. येशूप्रमाणेच, जीवनभर यहोवाची आनंदाने सेवा करण्याच्या व नेहमी त्याच्या आज्ञांनुसार वागण्याच्या ध्येयावर आपले लक्ष केंद्रित ठेवा.—इब्री १२:२.
आनंदी कौटुंबिक जीवनाचे रहस्य
१९. जीवनात खरा आनंद कशामुळे प्राप्त होतो?
१९ यहोवा देवाची व येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की मानवांनी नेहमी आनंदी असावे. अपरिपूर्ण स्थितीतही आपण जीवनात, काही प्रमाणात का होईना आनंदी होऊ शकतो. (यश. ४८:१७, १८; मत्त. ५:३) येशूच्या शिकवणी आपल्याला जीवनात आनंदी होण्यास मदत करू शकतात. पण त्याने आपल्या शिष्यांना केवळ आनंदी कसे होता येईल एवढेच शिकवले नाही. तर, त्याने त्यांना जगण्याचा सर्वात उत्तम मार्ग दाखवला. आणि त्यासोबतच जीवनात प्रत्येक बाबतीत समतोल कसा साधावा हे त्याने त्याच्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने कुटुंबातील सर्वांनाच फायदा होऊ शकतो. तेव्हा पतींनो, पत्नींनो, आईवडिलांनो व मुलांनो येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा! येशूच्या शिकवणींचे पालन करणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करणे हेच एका सुखी व समाधानी कुटुंबाचे रहस्य आहे.
तुमचे उत्तर काय असेल?
• देवाकडून मिळालेल्या अधिकाराचा पतींनी कशा प्रकारे वापर केला पाहिजे?
• पत्नी कशा प्रकारे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकते?
• येशू आपल्या शिष्यांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून आईवडील काय शिकू शकतात?
• येशूच्या उदाहरणावरून मुले काय शिकू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
कुटुंबासंबंधी एखादा निर्णय घेण्याआधी एक प्रेमळ पती काय करेल?
[९ पानांवरील चित्र]
कोणत्या परिस्थितीत पत्नीला आपल्या पतीच्या अधिकाराचे समर्थन करण्याचा अवसर मिळतो?
[१० पानांवरील चित्र]
मुले आईवडिलांच्या चांगल्या सवयींचे अनुकरण करतात