प्रेमाच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे तुम्ही अनुकरण करत आहात का?
प्रेमाच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे तुम्ही अनुकरण करत आहात का?
“देव प्रीति आहे.” प्रेषित योहानाचे हे शब्द आपल्याला देवाच्या प्रमुख गुणाची ओळख करून देतात. (१ योहा. ४:८) देवाला मानवजातीवर प्रेम असल्यामुळेच आपण त्याच्याशी जवळीक साधू शकतो व त्याच्याबरोबर एक घनिष्ठ संबंध जोडू शकतो. आणखी कोणकोणत्या मार्गांनी देवाच्या प्रेमाचा आपल्यावर प्रभाव पडतो? “आपण ज्यावर प्रेम करतो त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो,” असे म्हटले जाते. हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे, की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आणि आपल्यावर जे प्रेम करतात त्यांचाही आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे त्यामुळे, आपल्यामध्ये देवासारखे प्रेम दाखवण्याची कुवत आहे. (उत्प. १:२७) म्हणूनच प्रेषित योहानाने असे लिहिले, की आपण देवावर प्रेम करतो कारण “पहिल्याने [देवाने] आपणावर प्रीति केली.”—१ योहा. ४:१९.
प्रेमाचे वर्णन करणारे चार शब्द
प्रेषित पौलाने प्रेमाला, “एक सर्वोत्कृष्ट मार्ग” असे संबोधले. (१ करिंथ. १२:३१) का बरे? पौल कोणत्या प्रकारच्या प्रेमाविषयी बोलत होता? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता आपण, ‘प्रेम’ या शब्दाचे बारकाईने परीक्षण करू या.
प्राचीन ग्रीक भाषेत, प्रेमाचे वर्णन करण्याकरता वेगवेगळ्या रूपांत वापरले जाणारे चार मूळ शब्द होते: स्टॉरजे, ईरॉस, फीलिया आणि अगापे. देव “प्रीति आहे” असे म्हणताना यांपैकी अगापे हा शब्द वापरण्यात आला आहे. * या प्रेमाचे वर्णन करताना, प्राध्यापक विल्यम बार्क्ले न्यू टेस्टमेंट वर्ड्स या पुस्तकात असे म्हणतात: “अगापे या प्रेमाचा संबंध आपल्या मनाशी आहे. आपल्या अंतःकरणात आपोआप निर्माण होणारी ही केवळ एक भावना नाही. तर ते एक तत्त्व आहे ज्यानुसार आपण जाणीवपूर्वक जगण्याचा प्रयत्न करतो. अगापेचा प्रामुख्याने आपल्या इच्छेशी संबंध आहे.” येथे, अगापे हे तत्त्वावर आधारित असलेले किंवा तत्त्वांनी मार्गदर्शित केलेले प्रेम असले तरी ते सहसा उत्कट भावनांसह व्यक्त केले जाते. चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची तत्त्वे असतात. पण, खऱ्या ख्रिश्चनांनी यहोवा देवाने स्वतः बायबलमध्ये घालून दिलेल्या चांगल्या तत्त्वांनुसारच जगले पाहिजे. बायबलमध्ये वापरलेल्या अगापे या शब्दाची तुलना प्रेमाचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इतर शब्दांशी केल्यास आपण कोणत्या प्रकारचे प्रेम व्यक्त केले पाहिजे हे समजण्यास आपल्याला मदत मिळेल.
कौटुंबिक वर्तुळातील प्रेम
एका प्रेमळ, संयुक्त कुटुंबाचा भाग असणे आपल्या सर्वांनाच आवडते. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली आपुलकी २ तीम. ३:१, ३.
सूचित करण्यासाठी सहसा स्टॉरजे या ग्रीक शब्दाचा उपयोग केला जात असे. खरे ख्रिस्ती आपल्या कौटुंबिक सदस्यांवर असलेले प्रेम व्यक्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. परंतु पौलाने असे भाकीत केले, की शेवटल्या दिवसांत लोक, “ममताहीन” होतील.—दुःखाची गोष्ट म्हणजे, आजच्या जगात कौटुंबिक सदस्यांमध्ये जो जिव्हाळा किंवा जी आपुलकी असली पाहिजे ती दिसत नाही. असा जिव्हाळा असता तर इतक्या मातांनी गर्भपात केला नसता, अनेक कुटुंबांनी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना वाऱ्यावर सोडले नसते आणि घटस्फोटाचे प्रमाणही आकाशाला भिडले नसते. या सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे, लोक ममताहीन बनले आहेत.
शिवाय, “हृदय सर्वात कपटी आहे,” असेही बायबलमध्ये सांगितलेले आहे. (यिर्म. १७:९) कौटुंबिक प्रेमाचा संबंध आपल्या हृदयाशी असतो आणि यांत आपल्या भावनांचाही समावेश होतो. पण, लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावे असे सांगताना पौलाने अगापे हा शब्द वापरला. पौलाने पतीच्या या प्रेमाची तुलना ख्रिस्ताने मंडळीबद्दल दाखवलेल्या प्रेमाशी केली. (इफिस. ५:२८, २९) हे प्रेम, कौटुंबिक व्यवस्थेचा जनक यहोवा देव याने घालून दिलेल्या तत्त्वांवर आधारित असलेले प्रेम आहे.
कौटुंबिक सदस्यांबद्दलचे खरे प्रेम आपल्याला वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यास किंवा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करते. मुले नियंत्रणाबाहेर जातील इतकी मोकळीक आईवडील भावनांच्या आहारी जाऊन त्यांना देत नाहीत तर आवश्यकता असते तेव्हा ते प्रेमळ शिस्त लावण्यास प्रवृत्त होतात.—इफिस. ६:१-४.
स्त्री-पुरुषांत असलेली प्रेमभावना आणि बायबल तत्त्वे
वैवाहिक जीवनात एखाद्या स्त्री व पुरुषात असलेले शारीरिक प्रेम ही देवाकडून मिळालेली एक देणगी आहे. (नीति. ५:१५-१७) परंतु अशा प्रेमाला सूचित करणाऱ्या ईरॉस या शब्दाचा, बायबल लिहिण्यास प्रेरणा मिळालेल्या लेखकांनी उपयोग केला नाही. का नाही? काही वर्षांपूर्वी, टेहळणी बुरूज या नियतकालिकात असे म्हटले होते: “प्राचीन ग्रीक लोकांनी जी चूक केली होती तीच चूक आज संपूर्ण जग करत आहे. प्राचीन ग्रीक लोक ईरॉसला देव समजून त्याची उपासना करायचे, त्याच्यासाठी बांधलेल्या वेदीपुढे नमन करायचे व त्याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करायचे. . . . पण इतिहासात दिसते त्याप्रमाणे, या लैंगिक प्रेमाच्या उपासनेमुळे समाज रसातळाला गेला, अनैतिकता फोफावली व कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कदाचित याच कारणामुळे, बायबल लेखकांनी त्या शब्दाचा उपयोग केला नाही.” एखाद्या व्यक्तीशी असलेला आपला नातेसंबंध केवळ शारीरिक आकर्षणावर आधारित असू नये म्हणून आपण आपल्या प्रणय भावनांना बायबलमधील तत्त्वांनी नियंत्रित केले पाहिजे. म्हणून स्वतःला विचारा: ‘माझ्या जोडीदाराबद्दल मला वाटणारे प्रेम केवळ शारीरिक आकर्षणावर आधारित आहे, की ते खरे प्रेम आहे?’
ऐन तारुण्यात म्हणजे जेव्हा लैंगिक भावना तीव्र असतात त्या काळात, बायबल तत्त्वांनुसार वागणारे तरुण नैतिक १ करिंथ. ७:३६; कलस्सै. ३:५) विवाह ही यहोवा देवाकडून एक देणगी आहे, असे आपण मानतो. विवाहित जोडप्यांविषयी येशूने असे म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:६) खरे ख्रिस्ती, एकमेकांबद्दल आकर्षण आहे तोपर्यंतच सोबत राहत नाहीत तर विवाह हे कायमचे बंधन आहे असे ते समजतात. वैवाहिक समस्या उद्भवतात तेव्हा ते पळवाटा शोधत नाहीत तर आपले कौटुंबिक जीवन सुखी बनवण्यास लागणारे ईश्वरी गुण प्रदर्शित करायचा ते मनापासून प्रयत्न करतात. आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना चिरकाल आनंद मिळेल.—इफिस. ५:३३; इब्री १३:४.
रीत्या शुद्ध राहतात. (मित्रांमधील प्रेम
मित्र नसते तर जीवन अगदी नीरस झाले असते. बायबलमधील एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: ‘एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाहि आपणास धरून राहतो.’ (नीति. १८:२४) आपल्या सर्वांना खरे मित्र असावेत, अशी यहोवा देवाची इच्छा आहे. दावीद आणि योनाथान यांच्यात असलेली घनिष्ठ मैत्री ही सर्वांच्या परिचयाची आहे. (१ शमु. १८:१) आणि बायबलमध्ये म्हटले आहे, की येशूचे प्रेषित योहानावर “प्रेम होते.” (योहा. २०:२) ‘मित्रांमध्ये’ असलेल्या या ‘प्रेमासाठी’ ग्रीकमध्ये फीलिया हा शब्द आहे. मंडळीत एखाद्याबरोबर अशी घनिष्ठ मैत्री असण्यात काहीच वावगे नाही. परंतु, २ पेत्र १:७ मध्ये आपल्याला असे उत्तेजन देण्यात आले आहे, की (अगापे) प्रेमात आपण ‘बंधुप्रेमाची’ (फीलाडेलफियाची) भर घातली पाहिजे. (फीलाडेलफिया हा, “मित्र” यासाठी असलेला ग्रीक शब्द फिलोस व “बंधू” यासाठी असलेला अडेलफोस यांचा मिळून बनलेला सामासिक शब्द आहे.) आपली मैत्री कायम टिकवायची आपली इच्छा असेल तर आपण वरील सल्ल्याचे पालन केले पाहिजे. आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझ्या मैत्रीच्या भावना बायबल तत्त्वांवर आधारित आहेत का?’
आपण देवाच्या वचनानुसार वागत असू तर आपल्या मित्रांबरोबरचे आपले सर्व व्यवहार निःपक्ष असतील. आपल्या मित्रांसाठी एक नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम, म्हणजे, मित्रांबरोबर वागताना त्यांना सूट देणे आणि इतरांशी वागताना मात्र कडकपणे वागणे असे आपल्या व्यवहारांतून दिसून येणार नाही. शिवाय, मित्र बनवण्यासाठी आपण लोकांची खुशामतही करणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बायबल तत्त्वांचे पालन केल्यामुळे, आपली ‘नीति बिघडेल अशी कुसंगत’ टाळून चांगले मित्र निवडण्याची समजबुद्धी आपल्याला मिळेल.—१ करिंथ. १५:३३.
प्रेमाचे अनोखे बंधन!
ख्रिश्चनांना एकवटून ठेवणारे बंधन खरोखरच अनोखे आहे. “प्रीतीमध्ये ढोंग नसावे; . . . बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (रोम. १२:९, १०) होय, खऱ्या ख्रिश्चनांमध्ये (अगापे) प्रेम आहे जे ‘ढोंगी’ नाही. हे प्रेम त्यांच्यात उचंबळून येणारी केवळ एक भावना नाही. तर ते बायबलच्या तत्त्वांत खोलवर मुळावलेले प्रेम आहे. परंतु पौल, ‘बंधूप्रेम’ (फीलाडेलफिया) व “खरा स्नेहभाव” (फीलोस्टॉरगोस, अर्थात फीलोस व स्टॉरजे यांचा मिळून बनलेला सामासिक शब्द) यांविषयी देखील बोलतो. ‘बंधूप्रेम’ म्हणजे, “मायाळूपणा, दयाळूपणा, सहानुभूती व मदत करण्याची इच्छा,” असे एका विद्वानाने म्हटले. बंधूप्रेमासोबत अगापे प्रेम दाखवल्यामुळे यहोवाच्या उपासकांमधील मैत्री आणखी घट्ट होते. (१ थेस्सलनी. ४:९, १०) बंधूप्रेमासाठी वापरण्यात आलेला आणखी एक शब्द आहे “खरा स्नेहभाव.” हा शब्द बायबलमध्ये फक्त एकदाच आढळतो व तो, एखाद्या कुटुंबात असलेल्या प्रेमळ जवळिकीस सूचित करतो. *
खरे ख्रिस्ती कौटुंबिक प्रेमाच्या व खऱ्या मित्रांमधील जिव्हाळ्याच्या बंधांमुळे एकजूट आहेत. आणि त्यांची सर्व नाती बायबलमधील तत्त्वांनुसार असलेल्या प्रेमावर आधारित आहेत. ख्रिस्ती मंडळी, एखादे सामाजिक मंडळ किंवा लोकांशी ओळख-पाळख करून घेण्याचे केंद्र नाही. तर ती, एकमेकांशी जवळचा संबंध असलेल्या एका कुटुंबासारखी आहे व या मंडळीतले सर्व जण ऐक्याने यहोवा देवाची उपासना करतात. आपण एकमेकांना एकाच कुटुंबाचे सदस्य समजत असल्यामुळे, आपसात बोलताना बंधू व भगिनी हे संबोधन वापरतो. आपले बंधूभगिनी आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग आहेत. आपल्या मित्रांप्रमाणे आपण त्यांच्यावर प्रेम करतो आणि बायबलच्या तत्त्वांनुसार त्यांच्याशी वागतो. खऱ्या ख्रिस्ती मंडळीत ऐक्य टिकवून ठेवणाऱ्या व तिची ओळख करून देणाऱ्या या प्रेमात आपणही भर घालत राहू या.—योहा. १३:३५.
[तळटीपा]
^ परि. 5 अगापे प्रेमाचा नकारात्मक संदर्भातही उपयोग करण्यात आला आहे.—योहा. ३:१९; १२:४३; २ तीम. ४:१०; १ योहा. २:१५-१७.
^ परि. 18 न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये, इतर ग्रीक शब्दांचेही “खरा स्नेहभाव” असे भाषांतर करण्यात आले आहे. त्यामुळे या भाषांतरात “खरा स्नेहभाव” हा शब्द केवळ रोमकर १२:१० यामध्येच नव्हे तर फिलिप्पैकर १:८ आणि १ थेस्सलनीकाकर २:८ यातही आढळतो.
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
आपले ऐक्य टिकवून ठेवणाऱ्या प्रेमात आपण कशा प्रकारे आणखी भर घालू शकतो?