व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही बायबल अभ्यासासाठी खास वेळ ठरवून घेतली आहे का?

तुम्ही बायबल अभ्यासासाठी खास वेळ ठरवून घेतली आहे का?

तुम्ही बायबल अभ्यासासाठी खास वेळ ठरवून घेतली आहे का?

नियमन मंडळाने मागील वर्षी, मंडळीच्या सभांच्या आराखड्यात बदल केल्यामुळे, संपूर्ण कुटुंब मिळून बायबलचा अभ्यास व चर्चा करण्यासाठी जास्त वेळ मिळणे शक्य झाले आहे. तुम्ही एक कुटुंब प्रमुख असल्यास, आपली पत्नी व मुले यांच्यासोबत कुटुंबाच्या गरजांनुरूप, सर्वांच्या फायद्याचा ठरेल असा बायबल अभ्यास नियमितपणे केला जाईल याची खातरी करावी. ज्यांना मुले नाहीत अशा विवाहित जोडप्यांनी या वेळेचा एकत्र मिळून बायबलचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करावा. कुटुंबाची जबाबदारी नसलेल्या अविवाहित बंधुभगिनींना, या वेळेचा वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्यासाठी चांगला उपयोग करता येईल.

आठवड्यातली एक संध्याकाळ खास कौटुंबिक उपासनेसाठी राखून ठेवण्याच्या या व्यवस्थेबद्दल अनेकांनी आभार व्यक्‍त केले आहेत. उदाहरणार्थ, केवन नावाच्या एका वडिलांनी असे लिहिले: “आम्हा मंडळीतल्या सदस्यांच्या भावना व्यक्‍त करण्यासाठी ‘आभारी आहोत’ हे शब्द अपुरे पडतात. नियमन मंडळाच्या स्पष्ट सूचनेप्रमाणे ही खास संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत अभ्यास करण्यासाठी कशी उपयोगात आणता येईल याविषयी वडील या नात्याने आम्ही चर्चा केली आहे.”

ज्योडी, जिचे पती मंडळीत वडील म्हणून सेवा करतात तिने लिहिले: “आम्हाला १५, ११ आणि २ वर्षांच्या तीन मुली आहेत. नुकतीच आम्ही एका संकेत भाषिक मंडळीत जाण्यास सुरुवात केली आहे. मंडळीच्या सर्व सभांची तयारी करण्यासाठी खूप वेळ व मेहनत लागते. पण आता या बदलामुळे, कौटुंबिक उपासनेकडे लक्ष देता यावे म्हणून आम्हाला एक जास्तीची संध्याकाळ मिळाली आहे!”

नियमित पायनियर सेवा करणाऱ्‍या जॉन आणि जोॲन या विवाहित जोडप्याने असे लिहिले: “कौटुंबिक अभ्यासासाठी मंडळीच्या अनेक कार्यांतून वेळ काढावा लागत असल्यामुळे आमचा कौटुंबिक बायबल अभ्यास पूर्वी नियमित नव्हता. पण, ही नवी व्यवस्था म्हणजे यहोवाकडून मिळालेले एक वरदानच आहे. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे या वेळेचा उपयोग केला, तर या व्यवस्थेमुळे नक्कीच यहोवाच्या सेवेतील आपला उत्साह वाढेल.”

विशीत असलेल्या टोनी नावाच्या एका अविवाहित बांधवाने, मंगळवारची संध्याकाळ आपल्या वैयक्‍तिक अभ्यासासाठी राखून ठेवली आहे. मंडळीच्या सभांची तयारी तो सप्ताहाच्या इतर दिवशी करतो. पण, “मंगळवारची मी उत्सुकतेने वाट पाहत असतो!” असे टोनी म्हणतो. का? “कारण, ही संध्याकाळ मी यहोवाच्या सहवासात घालवतो.” टोनी पुढे सांगतो: “यहोवासोबत माझं नातं ज्यामुळे घट्ट होऊ शकेल अशा विषयांवर मी जवळजवळ दोन तास अभ्यास करतो. पुरेसा वेळ असल्यामुळे, बायबलची वचनं नुसतीच वरवर न वाचता त्यांवर निवांत विचार करण्याची संधी मला मिळते.” यामुळे काय परिणाम झाला आहे? “यहोवाचं मार्गदर्शन माझ्या मनावर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम करत आहे असं मला जाणवतं.” याचे एक उदाहरण तो सांगतो: “अलीकडेच इन्साईट पुस्तकात मी दावीद व योनाथान यांच्या मैत्रीबद्दल वाचलं. योनाथानाच्या निःस्वार्थ वृत्तीवरून मला बरंच शिकायला मिळालं. खरा मित्र काय असतो हे मला जवळून पाहायला मिळालं. पुढेही माझ्या मंगळवारच्या अभ्यासातून असेच अनेक उपयोगी धडे शिकायला मिळतील अशी आशा मी बाळगतो!”

बायबलचा अर्थपूर्ण अभ्यास करण्यासाठी आणि कौटुंबिक उपासनेसाठी उपलब्ध झालेल्या या अतिरिक्‍त वेळाचा चांगला उपयोग केल्यामुळे यहोवाच्या सर्वच सेवकांना खूप फायदा होईल यात शंका नाही.