औदार्याने द्या
औदार्याने द्या
दान देण्याच्या बाबतीत प्रेषित पौलाने असे लिहिले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे.” त्याने पुढे म्हटले: “दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:७) शुद्ध उपासनेकरता दान देण्यास यहोवा कोणालाही जबरदस्ती करत नाही. तर, आपल्या सेवकांनी स्वेच्छेने व आनंदाने दान देऊन आपला भक्तिभाव दाखवावा अशी त्याची इच्छा आहे. आजवरचा इतिहास दाखवून देतो की त्याच्या उपासकांनी नेहमीच उत्साहाने दान दिले आहे. याची तीन उदाहरणे पाहा.
यहोवाने इजिप्तमधून इस्राएल लोकांची सुटका केल्यानंतर, त्याने त्यांना निवासमंडप उभारण्यास सांगितले. यासाठी बऱ्याच साधनसामग्रीची आवश्यकता असल्यामुळे इस्राएल लोकांना दान देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनी कसा प्रतिसाद दिला? “ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली” त्यांनी सोने, रुपे, दागदागिने आणि इतर सामग्री दान केली. लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दान दिले की आता दान देण्याचे थांबवावे अशी विनंती त्यांना करावी लागली.—निर्ग. ३५:५, २१; ३६:६, ७.
याच्या अनेक शतकांनंतर जेव्हा मंदिर बांधण्याची वेळ १ इति. २९:३-९; २ इति. ५:१.
आली, तेव्हा पुन्हा एकदा शुद्ध उपासनेला साहाय्य करण्याची संधी देवाच्या लोकांना मिळाली. मंदिराच्या बांधकामासाठी दावीद राजाने स्वतः मोठ्या प्रमाणावर दान दिले आणि इतरांनाही त्याने असे करण्याचे प्रोत्साहन दिले. लोकांनी मोठ्या उत्सुकतेने दान दिले. त्यांनी दान केलेल्या सोन्या व रुप्याची एकूण किंमत आजच्या काळात ४,८०० अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे! स्वेच्छेने यहोवाला दान दिल्यामुळे लोकांना खरोखर अत्यानंद झाला.—येशू ख्रिस्ताच्या पहिल्या शतकातील शिष्यांनीही असाच औदार्याचा आत्मा दाखवला. सा.यु. ३३ मध्ये पेंन्टेकॉस्टच्या दिवशी जवळजवळ ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला. यांपैकी अनेक जण जेरूसलेममध्ये इतर देशांतून आले होते. त्यांनी स्वीकारलेल्या नवीन विश्वासाबद्दल अधिक शिकून घेण्यासाठी त्यांना काही काळ तेथेच राहणे गरजेचे होते. म्हणूनच, त्यांच्या तात्पुरत्या गरजा भागवण्यासाठी ख्रिश्चनांनी निधी गोळा केला. गरजू लोकांची मदत करण्यासाठी बांधवांनी आपली मालमत्ता विकली आणि मिळालेला पैसा प्रेषितांना सुपूर्द केला. बांधवांनी दाखवलेला हा विश्वास आणि प्रेम पाहून यहोवाचे मन नक्कीच आनंदित झाले असेल!—प्रे. कृत्ये २:४१-४७.
आजही, खरे ख्रिस्ती शुद्ध उपासनेकरता आपला वेळ, शक्ती आणि पैसा औदार्याने देतात. तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी असे करू शकता याची माहिती सोबतच्या चौकटीत दिली आहे.
[१८, १९ पानांवरील चौकट]
दान देण्यासाठी काही जण निवडत असलेले मार्ग
जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान
“जगभरात होणाऱ्या कार्यासाठी” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.
दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील सरळ शाखा कार्यालयाला पाठवले जाऊ शकते. (खाली उल्लेख केलेल्या विशिष्ट प्रकारच्या ऐच्छिक देणग्या देखील तुमच्या देशातील कार्याची देखरेख करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवल्या जाऊ शकतात.) चेक असतील तर ते “वॉच टावर”ला * देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तुसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्यक आहे.
सशर्त-दान योजना *
काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या देशात कार्य करणाऱ्या स्थानिक शाखा कार्यालयाशी कृपया संपर्क साधावा.
धर्मादाय योजना *
पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:
विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.
स्टॉक्स आणि बाँड्स: स्टॉक्स आणि बाँड्स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात किंवा कायदेशीर मृत्यूपत्राद्वारे वॉच टावर संस्थेच्या नावावर केले जाऊ शकतात.
जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.
दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता वॉच टावर संस्थेच्या नावावर केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.
इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर * संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.
“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड * हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक तयार करण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत.
अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
Jehovah’s Witnesses,
Post Box ६४४०,
Yelahanka,
Bangalore ५६० ०६४,
Karnataka.
Telephone: (०८०) २८४६८०७२
[तळटीपा]
^ परि. 11 भारतात हे चेक “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय असावेत
^ परि. 12 भारताला हे लागू होत नाही
^ परि. 14 सूचना: कराच्या बाबत असलेले नियम विविध देशांत वेगवेगळे असतील. कराच्या नियमांविषयी व योजनेविषयी मत घेण्यासाठी कृपया तुमच्या अकाऊंटंटशी किंवा वकिलाशी संपर्क साधावा. शेवटचा निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशी देखील संपर्क साधावा.
^ परि. 21 भारतात “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया” हे नाव वापरावे
^ परि. 22 भारतात उपलब्ध नाही