व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोठ्या मनाची चिमुकली

मोठ्या मनाची चिमुकली

मोठ्या मनाची चिमुकली

अलीकडेच घडलेली एक गोष्ट. ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या एका नऊ वर्षांच्या लहान मुलीने जमवून ठेवलेल्या आपल्या पैशांचे दोन भाग केले. १८ डॉलर आणि २५ डॉलर. यांपैकी १८ डॉलर तिने आपल्या मंडळीच्या खर्चासाठी राज्य सभागृहाच्या दानपेटीत टाकले. आणि उरलेले २५ डॉलर तिने यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवले. त्यासोबत शाखा कार्यालयाला पाठवलेल्या छोट्याशा पत्रात तिने म्हटले: “जगभरात चाललेल्या कार्यासाठी मी हे अनुदान पाठवत आहे. सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या जगभरातील अनेक बंधुभगिनींना मदत करण्याची माझी इच्छा आहे. यहोवावर माझं खूप खूप प्रेम आहे त्यामुळे मी हे अनुदान देत आहे.”

राज्य प्रचार कार्यात वैयक्‍तिक रीत्या सहभाग घेणे किती महत्त्वपूर्ण आहे हे या लहान मुलीच्या आईवडिलांनी तिला शिकवले. तसेच, आपल्या ‘द्रव्याने परमेश्‍वराचा सन्मान’ करण्याचे महत्त्वही त्यांनी तिच्या बाल मनावर ठसवले. (नीति. ३:९) या चिमुकलीप्रमाणेच, आपणही राज्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यांत उत्साहाने सहभाग घेऊ या. मग, ते कार्य आपल्या मंडळीचे असो अथवा जगभरात चालणारे.