व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क”

“मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क”

“मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क”

मुलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्‍या एका स्वीडिश संस्थेने डिसेंबर ९, २००८ रोजी “मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क” या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर एक परिषद भरवली होती. या प्रसंगी चर्च ऑफ स्वीडन, ख्रिस्ती धर्मजगताचे इतर पंथ, इस्लाम व मानवतावादी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या अनेक वक्त्यांनी आपापली मते मांडली.

परिषदेतील वक्त्यांपैकी एका पाळकांनी असे म्हटले: “मुलांच्या आध्यात्मिकतेत बायबलमधील अहवालांचे जे महत्त्वाचे योगदान आहे, त्यावर कितीही भर दिला तरी तो कमीच आहे.” बायबलमधील उतारे कशा प्रकारे मुलांच्या आध्यात्मिक विकासाला हातभार लावतात?

“बायबलमधील उतारे व अहवाल मुलांना स्वतःहून मनन व चिंतन करण्यासाठी उत्तम साहित्य पुरवतात” असे त्या पाळकांनी म्हटले. उदाहरणादाखल त्यांनी “आदाम व हव्वा, काईन व हाबेल, दावीद व गल्याथ, तसेच येशूचा जन्म, जक्कय नावाचा जकातदार, उधळा पुत्र, चांगला शोमरोनी” यांसारख्या अहवालांचा उल्लेख केला. “यांसारखे अहवाल विश्‍वासघात, क्षमा, प्रायश्‍चित्त, द्वेष, नैतिक ऱ्‍हास, नुकसान भरपाई, निःस्वार्थ बंधुप्रेम यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या विषयांसंबधी [मुलांचे] मार्गदर्शन करतात,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी असे म्हटले: “या अहवालांतून शिकलेल्या धड्यांचा व्यवहारात उपयोग केला जाऊ शकतो, ते कृतीत उतरवून प्रत्यक्ष अनुभवले जाऊ शकतात.”

अर्थात, बायबलचे वाचन करण्यास प्रोत्साहन देणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण, मुलांमध्ये खरोखरच बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर “स्वतःहून मनन व चिंतन” करण्याची व त्या आधारावर अचूक निष्कर्ष काढण्याची क्षमता असते का?

खरे पाहता मुलांनाच काय, तर प्रौढांनासुद्धा बायबलमधील उतारे कोणीतरी समजावून सांगण्याची गरज असते. उदाहरणार्थ, बायबलमध्ये एका अशा मनुष्याबद्दल सांगितले आहे, ज्याला शास्त्रवचनांतून वाचलेल्या माहितीवर “स्वतःहून मनन व चिंतन” केल्यावरही खऱ्‍या अर्थाने आध्यात्मिक लाभ झाला नाही. हा मनुष्य एक कुशी अधिकारी होता. तो यशयाच्या भविष्यवाणीचे वाचन करत होता पण तो जे वाचत होता, त्याचा अर्थ त्याला समजला नाही. भविष्यवाणीचा अर्थ समजून घेण्याची इच्छा असल्यामुळे शिष्य फिलिप्पाने देऊ केलेले स्पष्टीकरण त्याने आनंदाने स्वीकारले. (प्रे. कृत्ये ८:२६-४०) त्या कुशी अधिकाऱ्‍याप्रमाणेच, आपल्यापैकी सर्वांनाच आणि विशेषतः मुलांना बायबलमधील उताऱ्‍यांचा अर्थ कोणीतरी स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे.

बायबल स्पष्टपणे सांगते: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते.” (नीति. २२:१५) होय, मुलांना उपदेशाची व मार्गदर्शनाची गरज आहे आणि बायबलच्या व ख्रिस्ती मंडळीत जे शिकवले जाते त्याच्या आधारावर हे नैतिक व आध्यात्मिक शिक्षण त्यांना देण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. किंबहुना, असे प्रशिक्षण मिळण्याचा मुलांना हक्क आहे. अगदी कोवळ्या वयापासूनच मुलांना आध्यात्मिक विकास करता यावा म्हणून बायबलच्या आधारावर एक पक्का पाया उभारण्यासाठी साहाय्याची गरज असते. हे साहाय्य त्यांना मिळाल्यास त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” होऊन ती आध्यात्मिक दृष्ट्या “प्रौढ” बनतील.—इब्री ५:१४.