व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• मशीहाचे मरणे आवश्‍यक का होते?

येशूच्या मृत्यूवरून हे सिद्ध झाले, की अगदी टोकाच्या परीक्षेतसुद्धा एक परिपूर्ण मनुष्य शेवटपर्यंत देवाला एकनिष्ठ राहू शकतो. शिवाय येशूने आपल्या मृत्यूद्वारे, आदामाच्या संततीला वारशाने मिळालेल्या पापाची भरपाई केली व सार्वकालिक जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा केला.—१२/१५, पृष्ठे २२-२३.

• मुलांशी अर्थपूर्ण संवाद कसा साधला जाऊ शकतो?

मुलांशी सुसंवाद करण्यासाठी त्यांच्याशी फक्‍त बोलणेच पुरेसे नाही. तर त्यांना प्रश्‍न विचारणे व त्यांनी दिलेली उत्तरे लक्षपूर्वक ऐकणे या गोष्टीही त्यात समाविष्ट आहेत. अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी जेवणाची वेळ सगळ्यात चांगली असल्याचे अनेक कुटुंबांनी अनुभवले आहे.—१/१५, पृष्ठे १८-१९.

• कोणत्या परिस्थितींत पुन्हा बाप्तिस्मा घेण्याचा विचार करता येईल?

बाप्तिस्म्याच्या वेळी एक व्यक्‍ती गुप्तपणे अशा प्रकारचे जीवन जगत असेल किंवा असे एखादे काम करत असेल जे बायबल तत्त्वांच्या विरोधात होते. जर तिचा उचितपणे बाप्तिस्मा झालेला असता तर अशा प्रकारच्या आचरणामुळे तिला मंडळीतून बहिष्कृत केले गेले असते. अशा परिस्थितीत पुन्हा बाप्तिस्मा घेण्याचा विचार करता येईल.—२/१५, पृष्ठ २२.

• येशूने दिलेल्या गहू व निदणाच्या दृष्टान्तात चांगले बी पेरणे कशास सूचित करते?

मनुष्याच्या पुत्राने म्हणजे येशूने पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान पेरणी करण्यासाठी शेतजमीन तयार केली. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून, ख्रिश्‍चनांना अर्थात राज्याच्या पुत्रांना देवाचे पुत्र होण्यासाठी अभिषिक्‍त करण्यात आले तेव्हा चांगले बी पेरण्यास सुरुवात झाली.—३/१५, पृष्ठ २०.

• येशूने दिलेल्या दृष्टान्तातील लाक्षणिक गहू कशा प्रकारे यहोवाच्या कोठारात आणला जात आहे? (मत्त. १३:३०)

याची पूर्णता, दीर्घ पल्ल्याची असून युगाच्या समाप्तीच्या काळादरम्यान होते. लाक्षणिक गहू अर्थात राज्याचे अभिषिक्‍त पुत्र पुनःस्थापित ख्रिस्ती मंडळीचे भाग बनतात तेव्हा किंवा त्यांना आपले स्वर्गीय प्रतिफळ मिळते तेव्हा, त्यांना यहोवाच्या कोठारात गोळा गेले जाते.—३/१५, पृष्ठ २२.

• ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत कोणत्या पुस्तकांचा समावेश करावा हे कोणी ठरवले?

हे कोणत्याही चर्चमंडळाने किंवा धर्मगुरूने ठरवले नाही. तर कोणती शास्त्रवचने खरोखरच ईश्‍वरप्रेरित आहेत हे देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना समजले. आपण असे म्हणू शकतो, कारण सुरुवातीच्या दशकांत ख्रिस्ती मंडळीला निरनिराळी कृपादाने मिळाली होती. आणि पवित्र आत्म्याच्या या दानांमुळेच काही ख्रिश्‍चन, देवाची प्रेरित वचने आणि लोकांची वचने यांतला भेद ओळखू शकले. (१ करिंथ. १२:४, १०)—४/१, पृष्ठ २८.