व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास ही पुस्तिका मला मदत करते”

“लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास ही पुस्तिका मला मदत करते”

“लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास ही पुस्तिका मला मदत करते”

दक्षिण ब्राझीलमधील पोर्तु आलेग्री या शहरात काही काळाआधी, सामाजिक विषयांवर एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेला जगभरातील १३५ देशांमधून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पोर्तु आलेग्री मंडळीतील साक्षीदारांच्या एका गटाने पुढाकार घेऊन जगभरातून आलेल्या या अनेक प्रतिनिधींना परिषदेच्या मध्यांतराच्या वेळेत बायबलमधील राज्याचा संदेश सांगितला. पण साक्षीदारांनी त्यांच्याशी संवाद कसा साधला?

एलिझाबेथ नावाची एक पायनियर सांगते, “सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा आम्ही उपयोग केला. प्रतिनिधींपैकी बऱ्‍याच जणांनी राज्याच्या सुवार्तेचा संदेश कधीच ऐकला नव्हता, पण त्यांनी आमच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला. बोलिव्हिया, चीन, फ्रान्स, भारत, इस्राएल, आणि नायजेरिया या देशांतून आलेल्या लोकांशी आम्ही बोललो. काही प्रतिनिधींना आम्ही त्यांच्या भाषेतील बायबल साहित्य दिलं आणि त्यांनी ते आनंदानं स्वीकारलं.”

मेक्सिकोतील रॉल नावाच्या एका पायनियरलासुद्धा या पुस्तिकेचा उपयोग केल्यामुळे चांगले परिणाम मिळाले. काही काळाआधी तो ८० वर्षांच्या एका अरबी माणसाशी बोलला ज्याच्या पत्नीचा अलीकडेच मृत्यू झाला होता. त्या माणसाने या पुस्तिकेतून अरबी भाषेत राज्याचा संदेश वाचला तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. का? देव लवकरच मृत्यू नाहीसा करेल हे प्रकटीकरण २१:३, ४ मधील अभिवचन त्याने आपल्या स्वतःच्या भाषेत वाचले तेव्हा ते त्याच्या अंतःकरणाला भिडले. आणखी एका प्रसंगी, अनौपचारिक प्रचार कार्य करत असताना, रॉलला पोर्तुगीज भाषा बोलणारा एक माणूस भेटला. त्याच्याही प्रिय मुलाचा मृत्यू झाला होता. रॉलने त्याला त्या पुस्तिकेतील पोर्तुगीज भाषेतील संदेश वाचायला सांगितला. संदेश वाचल्यानंतर त्या माणसाने बायबलबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्‍त केली व तो बायबल अभ्यास करण्यास तयार झाला.

रॉलने सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेद्वारे अरमेनियन, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, कोरियन, मिक्सी, पर्शियन, रशियन, आणि झापटेक भाषा बोलणाऱ्‍या लोकांना साक्ष दिली. तो म्हणतो: “सेवा कार्यात या पुस्तिकेचा उपयोग करणं किती महत्त्वाचं आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे. मला लोकांची भाषा येत नसली, तरी लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास ही पुस्तिका मला मदत करते.”

आज अधिकाधिक लोक प्रवास करतात व परदेशात राहायला जातात. त्यामुळे निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांच्या संपर्कात येण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतात. अशांना राज्याची सुवार्ता सांगण्याकरता आपण सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा उपयोग करू शकतो. तुम्ही ही पुस्तिका नेहमी आपल्यासोबत ठेवता का?

[३२ पानांवरील चित्रे]

ही पुस्तिका रॉलला लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास मदत करते