व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशूने आपल्या श्रोत्यांना असे सांगितले: “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’” आज मानव “पूर्ण” किंवा परिपूर्ण कसे होऊ शकतात?—मत्त. ५:४८.

या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बायबलमध्ये “पूर्ण” आणि “पूर्णता” हे शब्द कशा प्रकारे वापरण्यात आले आहेत हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे. बायबलमध्ये ज्या गोष्टींचे वर्णन “पूर्ण” किंवा परिपूर्ण असे करण्यात आले आहे त्या सर्वच गोष्टी पूर्णार्थाने परिपूर्ण आहेत असे नाही. अर्थात, यहोवा पूर्णार्थाने परिपूर्ण आहे. मनुष्य किंवा वस्तू सापेक्ष अर्थाने पूर्ण किंवा परिपूर्ण असू शकतात. “पूर्ण” असे भाषांतर केलेल्या हिब्रू आणि ग्रीक शब्दांचा अर्थ, सहसा दर्जा किंवा प्रमाण ठरवणाऱ्‍या एखाद्या अधिकृत व्यक्‍तीच्या स्तरांनुसार “संपूर्ण,” “परिपक्व,” किंवा “निर्दोष” असा होतो. रोजच्या वापरात, हा शब्द सर्वसामान्यपणे सापेक्ष अर्थाने वापरला जातो.

आदाम आणि हव्वा यांना नैतिक, आध्यात्मिक आणि शारीरिक रीत्या परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या निर्माणकर्त्याने ठरवलेल्या स्तरानुसार ते परिपूर्ण होते. पण, त्यांनी देवाची अवज्ञा केली. अशा प्रकारे, देवाच्या या स्तरानुसार न वागल्यामुळे त्यांनी स्वतःची व त्यांच्या वंशजांची परिपूर्णता गमावली. अशा रीतीने, आदामाद्वारे संपूर्ण मानवजातीत पाप, अपरिपूर्णता आणि मृत्यू पसरला.—रोम. ५:१२.

पण, डोंगरावरील प्रवचनात येशूने स्पष्ट केल्याप्रमाणे, अपरिपूर्ण लोकदेखील सापेक्ष अर्थाने परिपूर्ण असू शकतात. त्या प्रवचनात येशूने परिपूर्ण प्रेम काय आहे याचे स्तर ठरवून दिले. अशा प्रकारचे प्रेम देव मानवजातीबद्दल दाखवतो. येशूने म्हटले: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्त. ५:४४, ४५) अशा प्रकारचे प्रेम दाखवण्याद्वारे, येशूचे शिष्य देवाच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करत असतात.

आज, जगभरातील यहोवाचे साक्षीदार इतरांना प्रेम दाखवण्याच्या बाबतीत या उच्च स्तराचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. ते विविध पार्श्‍वभूमींच्या, जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना बायबलमधील सत्याचे अचूक ज्ञान घेण्यास स्वेच्छेने मदत करतात. साक्षीदार सध्या, जगभरातील २३६ देशांत, बायबल सत्यांबद्दल जाणून घेण्याची आवड असलेल्या ७०,००,००० पेक्षा जास्त लोकांसोबत बायबलचा अभ्यास करत आहेत.

येशूने आपल्या श्रोत्यांना असे विचारले: “जे तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारहि तसेच करितात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयहि तसेच करितात ना?” (मत्त. ५:४६, ४७) खरे ख्रिस्ती, विशिष्ट शैक्षणिक किंवा वांशिक पार्श्‍वभूमीच्या लोकांना श्रेष्ठ समजत नाहीत; किंवा आपल्या प्रेमाच्या बदल्यात आपल्याला प्रेम दाखवू शकतात अशांनाच ते प्रेम दाखवत नाहीत. त्याऐवजी, ते गरीब व आजारी असलेल्यांना, तसेच लहानमोठ्या सर्वांनाच मदत करतात. अशा मार्गांनी प्रेम दाखवण्याद्वारे, खरे ख्रिस्ती यहोवाच्या प्रेमाचे अनुकरण करू शकतात आणि सापेक्ष अर्थाने परिपूर्ण होऊ शकतात.

आदामाने गमावलेली परिपूर्णता आपण पुन्हा कधी प्राप्त करू शकू का? होय. येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास प्रदर्शित केल्याने, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान ‘देवाचा पुत्र सैतानाची कृत्ये नष्ट करेल’ तेव्हा आज्ञाधारक मानवजात पूर्णार्थाने परिपूर्ण स्थितीला पोहचेल.—१ योहा. ३:८.