व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणताना देवाने कोणत्या देवदूताला त्यांच्यापुढे पाठवले? (निर्ग. २३:२०, २१)

देवाने इस्राएल लोकांपुढे पाठवलेल्या देवदूताच्या ‘ठायी [यहोवाचे] नाव’ होते. त्याअर्थी, तो देवदूत देवाचा ज्येष्ठ पुत्र होता असे आपण रास्तपणे म्हणू शकतो, जो पुढे येशू बनला.—९/१५, पृष्ठ २१.

• खऱ्‍या उपासनेसंबंधी, कोणती काही कारणे यहोवाला मान्य नाहीत?

‘हे खूप कठीण आहे. मला इच्छाच नाही. माझ्याजवळ वेळच नाही. ते करण्यास मी पात्र नाही. कोणीतरी माझं मन दुखावलंय.’ देवाच्या आज्ञांचे पालन न करण्यासाठी दिलेली ही उचित कारणे नाहीत.—१०/१५, पृष्ठे १२-१५.

• कोणत्या काही मार्गांनी तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवू शकता?

पूर्वतयारी करा. नियमितपणे उपस्थित राहा. वेळेवर या. आवश्‍यक साहित्य घेऊन या. विकर्षणे टाळा. सहभाग घ्या. संक्षिप्त उत्तरे द्या. दिलेल्या नेमणुका पूर्ण करा. सहभाग घेणाऱ्‍यांची प्रशंसा करा. एकमेकांशी सहवास करा.—१०/१५, पृष्ठ २२.

• अहरोन साथीदारांच्या दबावाला बळी पडला यावरून आपण काय शिकू शकतो?

मोशेच्या अनुपस्थितीत इस्राएल लोकांनी अहरोनाला त्यांच्यासाठी एक देव बनवण्याची गळ घातली. अहरोन त्यांच्या दबावाला बळी पडला व त्याने त्यांच्या म्हणण्यानुसार केले. यावरून दिसून येते, की साथीदारांचा दबाव केवळ मुलांवर येऊ शकतो असे नाही, तर योग्य ते करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या मोठ्यांवरसुद्धा तो येऊ शकतो. म्हणून, वाईट गोष्टी करण्याचा दबाव साथीदार आपल्यावर आणतात तेव्हा आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे.—११/१५, पृष्ठ ८.