व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खोऱ्‍यातील देवाचे नाव पाहा

खोऱ्‍यातील देवाचे नाव पाहा

खोऱ्‍यातील देवाचे नाव पाहा

सेंट मोरिट्‌झ. काहीसे ओळखीचे वाटते का हे नाव? वाटत असावे, कारण स्वित्झर्लंडच्या एंगडाइन खोऱ्‍यातील सुटी घालवण्याचे ते एक जगप्रसिद्ध स्थळ आहे. हे खोरे, इटलीच्या सीमेलगत, स्वित्झर्लंडच्या दक्षिणपूर्व कडेला बर्फाच्छादित आल्प्‌स पर्वतांमध्ये आहे. पण, लोकांना वर्षानुवर्षे या नयनरम्य खोऱ्‍याकडे आकर्षित करणारे सेंट मोरिट्‌झ हे एकमेव स्थळ आहे. याच खोऱ्‍यात स्विस राष्ट्रीय उद्यानदेखील आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले तसेच असंख्य जातीची फुलझाडे व प्राणीजीवन यांनी समृद्ध असलेले हे स्थळ आपला महान सृष्टिकर्ता यहोवा याची स्तुती करते. (स्तो. १४८:७-१०) पण त्यासोबतच, १७ व्या शतकाच्या मध्यात प्रचलित असलेल्या एका परंपरेचे अवशेषदेखील यहोवाची स्तुती करतात.

या खोऱ्‍यातील अनेक घरांवर असलेली विशिष्ट माहिती कदाचित तुमचे लक्ष वेधून घेईल. तेथील घरांच्या दर्शनी भागावर, जसे की मुख्य दारावर, सर्रासपणे देवाचे नाव कोरलेले पाहायला मिळते. तेथे पूर्वीच्या शतकांत, घरांच्या भिंती लेखांनी सुशोभित करण्याची परंपरा होती. भिंतींच्या पृष्ठभागांवर रंगीत लेख लिहिले जायचे. तर काही वेळा लेख भिंतींच्या गिलाव्यावर रेखाटले जायचे किंवा दगडात कोरले जायचे. या ठिकाणी, बेवर गावातील एका घराचे चित्र तुम्ही पाहू शकता. त्या कोरीव लेखाचे भाषांतर असे आहे: “सन १७१५. यहोवाच आरंभ व यहोवाच शेवट आहे. देवाला सर्व शक्य आहे, अशक्य काहीच नाही.” होय, या जुन्या लेखामध्ये देवाचे वैयक्‍तिक नाव दोन वेळा आढळते.

माडुलाईन या गावात, याहून जुना कोरीव लेख तुम्ही पाहू शकता. तो लेख म्हणतो: “स्तोत्र १२७. यहोवा जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्‍याचे श्रम व्यर्थ आहेत. लूक्युस रूमेडियस. सन १६५४.”

देवाचे नाव या खोऱ्‍यात इतक्या सर्रासपणे का पाहायला मिळते बरे? धर्मसुधारणेच्या काळात, बायबल हे रोमान्श भाषेत प्रकाशित करण्यात आले होते. रोमान्श ही एंगडाइन खोऱ्‍यात बोलली जाणारी भाषा असून ती लॅटीन भाषेवर आधारलेली आहे. खरेतर, बायबल हे रोमान्श भाषेत भाषांतरित केलेले सगळ्यात पहिले पुस्तक होते. तेथील लोकांनी देवाच्या वचनात जे वाचले त्यावरून त्यांनी आपल्या घरांवर केवळ स्वतःचेच नाव नव्हे, तर त्याबरोबर बायबलच्या ज्या वचनांत देवाचे वैयक्‍तिक नाव आढळते ती वचनेसुद्धा कोरली.

होय, आज अनेक शतकांनंतरसुद्धा तेथील घरांवर लिहिलेले लेख यहोवाच्या नावाची घोषणा व स्तुती करत आहेत. त्या खोऱ्‍याला भेट देणाऱ्‍या तसेच तेथे राहणाऱ्‍या सर्व लोकांना बेवरमध्ये देवाचे नाव धारण करणाऱ्‍या आणखी एका इमारतीला—यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाला भेट देण्याद्वारे त्या अद्‌भुत देवाबद्दल अर्थात यहोवाबद्दल जाणून घेण्याचे आमंत्रण दिले जाते.

[७ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Stähli Rolf A/age fotostock