व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रयत्नांचे सार्थक होईल!

प्रयत्नांचे सार्थक होईल!

प्रयत्नांचे सार्थक होईल!

“प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” जर मुलांचे संगोपन करायचे असेल, तर कौटुंबिक उपासना आणि बायबल अभ्यास खूप आवश्‍यक आहेत. (इफिस. ६:४) पण, तुम्ही एक पालक असाल, तर तुम्हाला माहीतच आहे की सहसा मुलांना लवकरच कंटाळा येऊ शकतो. तर मग, तुम्ही त्यांचे मन एकाग्र कसे ठेवू शकता? काही पालकांनी काय केले आहे ते पाहा.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणारे जॉर्ज म्हणतात: “मुलं लहान होती तेव्हा मी व माझी पत्नी कौटुंबिक बायबल अभ्यास मजेशीर बनवण्याचा प्रयत्न करायचो. कधीकधी बायबल कथांचं माझं पुस्तक यातून गोष्टी वाचताना आम्ही सर्व जण बायबल पात्रांनुसार कपडे घालायचो व त्यांचा अभिनय करायचो. त्यासाठी आम्ही काही वस्तूदेखील बनवायचो, जसं की तलवार, राजदंड, टोपल्या, आणि खूप काही. आम्ही ‘ओळखा पाहू मी कोण’ हा बायबल खेळसुद्धा खेळायचो व बायबलवर आधारित कधी कठीण तर कधी सोपे प्रश्‍न विचारायचो. आम्ही काही प्रोजेक्टसुद्धा करायचो, जसे की नोहाच्या जहाजाचा नमुना तयार करणे किंवा बायबलमधील घटनांचा कालक्रम आखणे. कधीकधी आम्ही बायबल पात्रांचे किंवा कथांचे चित्र काढायचो. सध्या आम्ही एक चित्र बनवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे, जो इफिसकर ६:११-१७ मध्ये वर्णन केलेल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीबद्दल आहे. यातील प्रत्येक भाग कोणत्या गोष्टीला सूचित करतो हे समजावण्याचं काम आमच्यातील प्रत्येक जण करत आहे. अशा निरनिराळ्या पद्धतींमुळे आम्हाला आमचा बायबल अभ्यास मजेशीर बनवण्यास मदत मिळाली आहे.”

अमेरिकेतील मिशिगनमधील, डेबी नावाची एक आई म्हणते: “आमची मुलगी तीन वर्षांची होती तेव्हा मला व माझ्या पतीला तिचं लक्ष वेधून घेण्यास खूप त्रास झाला. मग, एके दिवशी मी बायबल कथांचं माझं पुस्तक यातून इसहाक आणि रिबका यांची गोष्ट मोठ्यानं वाचत असताना मी दोन बाहुल्या उचलल्या आणि ते काय बोलले असतील याचा अभिनय करण्यासाठी त्यांचा उपयोग केला. आता मात्र ती खूप लक्ष देऊन ऐकू लागली. त्यानंतरच्या कित्येक महिन्यांदरम्यान त्या दोन बाहुल्यांनीच बायबलच्या अनेक पात्रांची भूमिका बजावली. आम्ही एखादी कथा वाचल्यानंतर, त्या कथेचा अभिनय करण्यासाठी आमची मुलगी घरभर खेळणी किंवा इतर वस्तू शोधायची. हे जणू लपवून ठेवलेला खजिना शोधून काढण्यासारखंच होतं! किरमिजी दोर असलेलं राहाबचं घर बनवण्यासाठी आम्ही बुटांचं खोकं आणि लाल रिबीन यांचा उपयोग केला. झाडूला एक पाच फूट लांबीचा नकली साप गुंडाळून आम्ही गणना २१:४-९ मध्ये सांगितलेला पितळेचा साप बनवला. या सर्व वस्तू आम्ही कपड्याच्या एका मोठ्या पिशवीत ठेवल्या. आनंदाची गोष्ट म्हणजे आमची मुलगी घरातील बैठक खोलीत बसून नेहमी तिच्या या ‘बायबल कथेच्या पिशवीतून’ वस्तू शोधायची. ती आपल्या परीने बायबल कथांना जे नाट्यरूप देते ते पाहून आम्हाला खूप आनंद होतो!”

मुलांचे संगोपन करणे ही काही सोपी गोष्ट नाही, आणि यहोवाची सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनात रुजवण्यासाठी साप्ताहिक सत्र पुरेसे नाही. पण, कौटुंबिक उपासना आणि बायबल अभ्यास, इतर आध्यात्मिक शिक्षणाचा पाया ठरू शकतो. अशा प्रयत्नांचे नक्कीच सार्थक होईल!