व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांच्या मृत्यूनंतर, मोशे त्यांच्या भावांवर म्हणजे एलाजार आणि इथामार यांच्यावर का रागावला, आणि त्याचा राग कसा शांत झाला?—लेवी. १०:१६-२०.

याजकांचा समर्पण विधी पार पडल्याच्या काही समयानंतर, यहोवाने अहरोनाचे पुत्र नादाब आणि अबीहू यांना मृत्यूदंड दिला, कारण त्यांनी यहोवासमोर अशास्त्र अग्नी नेला होता. (लेवी. १०:१, २) मोशेने अहरोनाच्या जिवंत असलेल्या पुत्रांना आपल्या भावांसाठी शोक न करण्याची आज्ञा दिली. याच्या काही समयानंतर एलाजार आणि इथामार यांच्यावर मोशेचा राग भडकला, कारण त्यांनी पापार्पणाच्या बकऱ्‍याचे मांस खाल्ले नव्हते. (लेवी. ९:३) मोशेचा राग अशा प्रकारे का भडकला होता?

यहोवाने मोशेला दिलेल्या नियमांत सांगितल्याप्रमाणे, पापार्पण करणाऱ्‍या याजकाने पापार्पणाचा काही भाग दर्शनमंडपाच्या अंगणात खायचा होता. असे करण्याचा अर्थ पापार्पण करणाऱ्‍याच्या पापांबद्दल जाब देणे असा होता. पण, या अर्पणाचे काही रक्‍त, पवित्रस्थानात म्हणजे दर्शनमंडपाच्या पहिल्या भागात नेल्यास पापार्पणाचे मांस खायचे नव्हते. त्याऐवजी, ते जाळून टाकायचे होते.—लेवी. ६:२४-२६, ३०.

त्या दिवशी घडलेल्या दुःखद घटनांनंतर, यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन केले जात आहे याची खातरी करण्याची गरज मोशेला जाणवली. पापार्पणाच्या बकऱ्‍याचे मांस जाळून टाकण्यात आले होते हे मोशेला समजले तेव्हा एलाजार व इथामार यांच्यावर त्याचा राग भडकला. पापार्पणाचे रक्‍त यहोवाच्या पवित्रस्थानात नेण्यात आले नव्हते. मग, सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी बकऱ्‍याचे मांस का खाल्ले नाही असे मोशेने त्यांना विचारले.—लेवी. १०:१७, १८.

मोशेने विचारलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर अहरोनाने दिले. कारण, जिवंत असलेल्या याजकांनी बहुधा त्याच्या सांगण्यावरूनच मांस खाल्ले नव्हते. आपल्या दोन पुत्रांना मृत्यूदंड देण्यात आला होता त्यामुळे कोणताही याजक शुद्ध विवेकाने पापार्पणाचे मांस त्या दिवशी खाऊ शकत होता का असा विचार अहरोनाच्या मनात आला असावा. नादाब आणि अबीहूने केलेल्या चुकीबद्दल त्यांच्यापैकी कोणीही प्रत्यक्षपणे जबाबदार नसला, तरी पापार्पणाचे मांस खाल्ल्याने यहोवा संतुष्ट झाला नसता असे कदाचित त्याला वाटले.—लेवी. १०:१९.

अहरोनाने खासकरून असा तर्क केला असावा की याजक या नात्याने आपल्या कुटुंबाचे सदस्य त्या दिवशी पहिल्यांदाच सेवा करत असल्यामुळे, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतही यहोवाला संतुष्ट करण्याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. पण, नादाब आणि अबीहूने यहोवाचे नाव कलंकित केले होते आणि त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता. म्हणून, याजकांच्या ज्या कुटुंबात अशा प्रकारचे पाप दिसून आले होते त्यातील सदस्यांनी पवित्र अर्पणाचे मांस खाऊ नये असा अहरोनाने विचार केला असावा.

मोशेने आपला भाऊ अहरोन याचे उत्तर स्वीकारल्याचे दिसते, कारण वृत्तान्तात पुढे असे म्हटले आहे: “हे ऐकून मोशेचे समाधान झाले.” (लेवी. १०:२०) अहरोनाच्या उत्तरावरून बहुधा यहोवादेखील संतुष्ट झाला असे दिसून येते.