व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

‘देव आम्हास जयोत्स्वाने नेतो’ असे प्रेषित पौलाने म्हटले, तेव्हा त्याच्या मनात काय होते?

पौलाने लिहिले: “देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करितो, त्याची स्तुती असो. तारणप्राप्ति होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो; एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो.”—२ करिंथ. २:१४-१६.

येथे प्रेषित पौल, एखाद्या रोमन सेनापतीने आपल्या राज्याच्या शत्रूंवर विजय मिळवल्यावर त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरवणूक काढण्याच्या रोमन प्रथेबद्दल बोलत होता. अशा विजयोत्स्वांच्या वेळी, लोकांसमोर लुटीचे प्रदर्शन केले जायचे व युद्धकैद्यांना सर्वांसमोर आणले जायचे आणि बैलांना अर्पण करण्यासाठी नेले जायचे. त्याच वेळी लोक विजयी सेनापतीचा व त्याच्या सैन्याचा जयजयकार करायचे. मिरवणूक संपल्यावर, बैलांना अर्पण केले जायचे व अनेक युद्धकैद्यांना बहुधा जिवे मारले जायचे.

प्रेषित पौलाने वापरलेले “संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल” हे रूपक काही जणांसाठी जीवनाचे आणि काही जणांसाठी मृत्यूचे सूचक होते. दी इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपीडिया म्हणते की हे रूपक “कदाचित मिरवणुकीच्या मार्गात धूप जाळण्याच्या रोमन प्रथेवरून घेण्यात आलेले आहे. विजेत्यांच्या विजयाला सूचित करणाऱ्‍या गंधावरून, युद्धकैद्यांना कदाचित त्यांच्यावर ओढवणाऱ्‍या मृत्यूची आठवण होत असे.” * (w१०-E ०८/०१)

[तळटीप]

^ पौलाच्या दृष्टान्ताचा आध्यात्मिक रीत्या काय अर्थ होतो याच्या स्पष्टीकरणासाठी, टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर १९९० (इंग्रजी), पृष्ठ २७ पाहा.

[२८ पानांवरील चित्र]

रोमन विजयोत्सवाची मिरवणूक दाखवणाऱ्‍या एका कोरीव चित्राचा एक भाग, इ.स. दुसरे शतक

[२८ पानांवरील चित्र]

ब्रिटिश वस्तूसंग्रहालयाच्या सौजन्याने घेतलेले छायाचित्र