परिपूर्ण नेता, ख्रिस्त याचे अनुकरण करणे
परिपूर्ण नेता, ख्रिस्त याचे अनुकरण करणे
मानवी नेत्यांचे अनुकरण करणाऱ्यांना सहसा निराशेचा सामना करावा लागतो. पण ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांची गोष्ट वेगळी आहे. येशूने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (मत्त. ११:२८, २९) येशूचे नेतृत्व समाधान व आनंद देणारे आहे. येशूला गरीब, दीनदुबळ्या लोकांबद्दल खूप दया वाटते. तो त्यांना आपल्या प्रेमळ जुवाखाली येण्याचे आमंत्रण देतो. येशूचे नेतृत्व स्वीकारण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
प्रेषित पेत्राने लिहिले: ‘ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.’ (१ पेत्र २:२१) येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणे आपल्यासाठी खरोखरच आवश्यक आहे का? समजा, की तुम्ही एका अशा समुहाबरोबर आहात जो सुरुंग पेरलेल्या क्षेत्रातून चालत आहे. तुमच्यातील फक्त एकालाच हे माहीत आहे की ते क्षेत्र सुरक्षितपणे कसे पार करायचे. मग तुम्ही त्याच्याच मागे चालणार नाही का? अगदी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याच्या मागोमाग जाणार नाही का? त्याचप्रमाणे, आपले भवितव्य येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यावर अवलंबून आहे. यात त्याचे ऐकणे, त्याच्या आज्ञा मानणे व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या अधीन राहणे समाविष्ट आहे.
आज्ञा ऐकणे व त्यांचे पालन करणे
डोंगरावरील प्रवचनाच्या शेवटी येशूने म्हटले: “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला. तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.”—मत्त. ७:२४, २५.
आपली वचने ऐकून त्याप्रमाणे वागणाऱ्या मनुष्याला येशूने “सूज्ञ” म्हटले. आपल्याला येशूच्या उदाहरणाची कदर आहे हे आपण त्याच्या आज्ञांचे मनापासून पालन करण्याद्वारे दाखवून देतो का? की येशूच्या आज्ञांपैकी ज्या आपल्याला सोईस्कर वाटतील त्याच आज्ञा मानण्याकडे आपला कल आहे? येशूने म्हटले: “जे त्याला [देवाला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहा. ८:२९) आपण त्याच्या या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करू या.
पहिल्या शतकात, ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन राहण्याबाबत प्रेषितांनी चांगले उदाहरण मांडले. एके प्रसंगी पेत्राने येशूला म्हटले: “पाहा! आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहो.” (मार्क १०:२८) येशूच्या नेतृत्वाच्या अधीन होण्याला, प्रेषितांनी इतके महत्त्वाचे मानले की त्याचे अनुकरण करण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने साऱ्या गोष्टी मागे सोडल्या.—मत्त. ४:१८-२२.
ख्रिस्ताच्या प्रतिनिधींना सहकार्य करा
मृत्यू होण्यापूर्वी येशूने त्याच्या नेतृत्वाच्या अधीन राहण्याचा आणखी एक मार्ग सांगितला. तो म्हणाला: “मी ज्याला पाठवितो त्याचा जो स्वीकार करितो तो माझा स्वीकार करितो.” (योहा. १३:२०) येशूने त्याच्या अभिषिक्त प्रतिनिधींना त्याचे “बंधू” म्हटले. (मत्त. २५:४०) पुनरुत्थान होऊन येशू स्वर्गात गेल्यावर त्याच्या या ‘बंधूंना’ ख्रिस्ताच्या जागी म्हणजेच, “ख्रिस्ताच्या वतीने” वकिली करून इतरांना देवाबरोबर समेट करण्यास विनवण्यासाठी नेमण्यात आले. (२ करिंथ. ५:१८-२०) ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारण्यात या ‘बंधूंच्या’ अधीन राहणेही समाविष्ट आहे.
२ पेत्र ३:१, २) या आध्यात्मिक अन्नाचे नियमित सेवन करण्याद्वारे आपण हे दाखवतो की आपल्याला त्याची कदर आहे. पण, एखादा सल्ला वारंवार दिला जातो तेव्हा आपली काय प्रतिक्रिया असली पाहिजे? उदाहरणार्थ, देवाचे वचन आपल्याला केवळ “प्रभूमध्ये” लग्न करण्याचा सल्ला देते. (१ करिंथ. ७:३९) एका शतकापेक्षाही अधिक काळापासून हा विषय वेळोवेळी टेहळणी बुरूज मध्ये प्रकाशित होत आला आहे. आपल्या आध्यात्मिक कल्याणाबद्दल काळजी असल्यामुळेच ख्रिस्ताचे बंधू या व अशा इतर प्रेरित सल्ल्यांवर लेख प्रकाशित करतात. या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे हादेखील, आपला परिपूर्ण नेता, येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याचा एक मार्ग आहे.
बायबल आधारित प्रकाशनांत येणाऱ्या समयोचित शास्त्रवचनीय सल्ल्यांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो याचे आपण परीक्षण केले पाहिजे. आपण बायबलचा अभ्यास करतो व सभांना उपस्थित राहतो, तेव्हा आपल्याला ख्रिस्ताच्या वचनांची आठवण करून दिली जाते. (“धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे,” असे नीतिसूत्रे ४:१८ सांगते. होय, ख्रिस्ताचे नेतृत्व प्रगतिशील आहे, ते निष्क्रिय नाही. म्हणूनच ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ पुरवत असलेल्या प्रकाशनांत, शास्त्रवचनीय सत्याबद्दल कोणतेही सुधारित स्पष्टीकरण दिले जाते तेव्हा आपण त्याबद्दल सकारात्मक मनोवृत्ती राखली पाहिजे. ख्रिस्ताच्या ‘बंधूंना’ अधीनता दाखवण्याचा हादेखील एक मार्ग आहे.—मत्त. २४:४५.
मंडळीतील नियुक्त वडिलांना सहयोग देण्याद्वारेही आपण ख्रिस्ताच्या ‘बंधूंना’ आपली अधीनता दाखवतो. प्रेषित पौलाने म्हटले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण . . . ते तुमच्या जिवांची राखण करितात.” (इब्री १३:१७) उदाहरणार्थ, प्रत्येक आठवड्यात एक संध्याकाळ कौटुंबिक अभ्यासासाठी राखून ठेवणे किती आवश्यक आहे याबद्दल किंवा क्षेत्रसेवेतील एखाद्या ठराविक पैलूत आपण कशी प्रगती करू शकतो याबद्दल एखादे वडील आपल्याला उत्तेजन देऊ शकतात. प्रवासी पर्यवेक्षक कदाचित आपल्याला ख्रिस्ती जीवनासंबंधी एखाद्या गोष्टीबद्दल उपयुक्त सल्ला देऊ शकतात. अशा प्रकारच्या सल्ल्याचे आनंदाने पालन करण्याद्वारे आपण हे दाखवून देतो की आपला नेता येशू याचे आपण अनुकरण करत आहोत.
आजच्या या जगात प्रभावी नेतृत्वाची कमतरता आढळते. पण ख्रिस्ताच्या प्रेमळ नेतृत्वाच्या अधीन राहणे किती सुखद आहे! तर मग, आपण सारेच आपला नेता येशू याच्या आज्ञा मानू या व ज्यांचा तो आज उपयोग करत आहे त्या प्रतिनिधींना सहयोग देत राहू या.
[२७ पानांवरील चित्रे]
विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध न जोडण्याविषयी दिलेला शास्त्रवचनीय सल्ला तुम्ही स्वीकारता का?