व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक उपासना आणि व्यक्‍तिगत अभ्यासाकरता काही कल्पना

कौटुंबिक उपासना आणि व्यक्‍तिगत अभ्यासाकरता काही कल्पना

कौटुंबिक उपासना आणि व्यक्‍तिगत अभ्यासाकरता काही कल्पना

सन २००९ च्या सुरुवातीपासून जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी त्यांच्या सभांच्या आराखड्यात बदल केला. दर आठवडी होणाऱ्‍या दोन सभा एकत्र करण्यात आल्या, आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या एका अतिरिक्‍त संध्याकाळी प्रत्येकाला आपली कौटुंबिक उपासना किंवा व्यक्‍तिगत अभ्यास करण्याचे उत्तेजन देण्यात आले. या नवीन व्यवस्थेचा तुम्ही फायदा घेत आहात का? तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ होत आहे का?

आपल्या कौटुंबिक उपासनेत कोणत्या साहित्याचा अभ्यास करावा असा काहींना प्रश्‍न पडला आहे. सगळ्या कुटुंबांनी एका विशिष्ट पद्धतीनेच अभ्यास करावा असा नियम बनवण्याचा नियमन मंडळाचा हेतू नाही. सगळ्यांची परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे, या साप्ताहिक व्यवस्थेचा उत्तम उपयोग कसा करता येईल हे प्रत्येक कुटुंबप्रमुखाने किंवा व्यक्‍तीने पडताळून पाहणे योग्य ठरेल.

काही कुटुंबे आपल्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान सभांची तयारी करतात, पण कौटुंबिक उपासना एवढ्यापुरतीच मर्यादित नसावी. काही जण शास्त्रवचनांचे वाचन करतात, त्यावर चर्चा करतात, आणि खासकरून लहान मुलांच्या फायद्यासाठी बायबलमधील माहितीवर नाटकसुद्धा बसवतात. मंडळीच्या सभांमध्ये औपचारिक रीत्या प्रश्‍नोत्तरांद्वारे चर्चा केली जाते त्याप्रमाणे कौटुंबिक उपासनेत करणे नेहमीच जरुरीचे किंवा उचितही नसेल. प्रोत्साहनदायक चर्चेसाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी खेळीमेळीचे वातावरण सहसा अधिक पोषक ठरते. अशा वातावरणामुळे कल्पनाशक्‍तीला चालना मिळते, ज्यामुळे कौटुंबिक उपासनेचा हा प्रसंग सर्वांसाठीच संस्मरणीय व आनंददायक बनू शकतो.

तीन मुलांचे एक वडील असे लिहितात: “आमच्या कौटुंबिक उपासनेत आम्ही जास्तकरून बायबल वाचनावर आधारित काहीतरी करतो. आम्ही प्रत्येक जण आधीच अध्याय वाचून ठेवतो. मुलं काही पैलूंवर संशोधन करतात आणि मग त्यांनी केलेले संशोधन ते उपासनेच्या वेळी सादर करतात. मायकल [७ वर्षांचा] अनेक वेळा एखादं चित्र काढतो किंवा एखादा परिच्छेद लिहून काढतो. डेविड आणि केटलिन [१३ व १५ वर्षांचे] एका निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून बायबलचा एखादा वृत्तान्त लिहितात. उदाहरणार्थ, फारोचा आचारी आणि त्याचा प्यालेबरदार यांच्या स्वप्नांचा योसेफाने जो खुलासा केला होता त्याबद्दल आम्ही वाचत होतो तेव्हा ते दृश्‍य पाहणाऱ्‍या एका कैद्याच्या दृष्टिकोनातून केटलिननं निबंध लिहिला.”—उत्प., अध्याय ४०.

साहजिकच, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. एका व्यक्‍तीला किंवा कुटुंबाला एखादी पद्धत जमत असेल, पण तीच पद्धत दुसऱ्‍या व्यक्‍तीला किंवा कुटुंबाला कदाचित जमणार नाही. तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेदरम्यान किंवा व्यक्‍तिगत अभ्यासादरम्यान वापरू शकता अशा अनेक पद्धती सोबतच्या चौकटीत सुचवल्या आहेत. अर्थात, तुम्ही स्वतःदेखील इतर अनेक पद्धतींचा विचार करू शकता.

[६, ७ पानांवरील चौकट/चित्र]

ज्या कुटुंबात किशोरवयीन मुले आहेत अशांसाठी:

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे हे पुस्तक वाचा आणि चर्चा करा.

• “जर तुम्ही बायबलच्या काळात राहात असता तर काय केले असते?” (टेहळणी बुरूज, १५ मे १९९६, पृष्ठ १४, परिच्छेद १७-१८ पाहा.)

• कोणती छोटी व दीर्घकालीन ध्येये ठेवता येतील याबद्दल बोला.

• वेळोवेळी बायबलवर आधारित व्हीडिओ पाहा व त्यावर चर्चा करा.

टेहळणी बुरूज नियतकालिकातील “आमच्या तरुण मित्रांकरता” हे सदर विचारात घ्या.

मुले नसलेल्या दांपत्यांसाठी:

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील अध्याय १, ३, ११-१६ यांवर चर्चा करा.

• बायबल वाचन करताना विशिष्ट मुद्द्‌यांवर केलेल्या संशोधनाविषयी एकमेकांना सांगा.

• मंडळीच्या बायबल अभ्यासाची किंवा टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करा.

• पती-पत्नी दोघेही आपले सेवाकार्य कसे वाढवू शकतात यावर चर्चा करा.

अविवाहित बंधू व भगिनींसाठी किंवा धार्मिक रीत्या विभाजित असलेल्या कुटुंबांसाठी:

• प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झालेल्या नवीन प्रकाशनांचा अभ्यास करा.

• चालू वर्षाचे व जुने इयरबुक वाचा.

• तुमच्या क्षेत्रात लोक सर्वसाधारण कोणते प्रश्‍न विचारतात त्यावर संशोधन करा.

• क्षेत्र सेवेसाठी सादरीकरणे तयार करा.

ज्या कुटुंबांत लहान मुले आहेत अशांसाठी:

• बायबलमधील दृश्‍यांचे नाट्यरूपांतर करा.

सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकातील पृष्ठे ३० आणि ३१ वरील कोडे सोडवा.

• अधूनमधून काहीतरी कल्पक करा. (सावध राहा! (इंग्रजी), ८ मार्च १९९६, पृष्ठे १६-१९ वरील “स्टडिंग द बायबल—इन द झू!” हा लेख पाहा.)

टेहळणी बुरूज नियतकालिकातील “आपल्या मुलांना शिकवा” या सदरावर चर्चा करा.