तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• ‘मीच तुझा वाटा आहे’ असे देवाने लेव्यांना म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
इस्राएल राष्ट्रातील इतर सर्व वंशांना जमिनीचा वाटा मिळाला होता; पण, खुद्द यहोवा लेव्यांचा “वाटा” होता. (गण. १८:२०) लेव्यांना जमिनीचे वतन मिळणार नव्हते, पण त्यांना सेवेचा खास विशेषाधिकार मिळाला होता. असे असले, तरी यहोवाने त्यांच्या मूलभूत भौतिक गरजा भागवल्या. आज ज्यांना राज्याशी संबंधित कार्यांत अधिकाधिक सहभाग घेण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे ते याची खातरी बाळगू शकतात की यहोवा नक्कीच त्यांच्या गरजा भागवेल.—९/१५, पृष्ठे ७-८, १३.
• करमणुकीचा एखादा प्रकार हितकारक आहे की नाही हे ठरवण्यास कोणती गोष्ट एका ख्रिस्ती व्यक्तीला मदत करू शकते?
एखादी करमणूक हितकारक व यहोवाच्या दृष्टीने स्वीकार्य आहे की नाही हे ठरवताना आपण स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: त्यात काय गोवले आहे? मी केव्हा करमणूक करावी? माझे साथीदार कोण आहेत?—१०/१५, पृष्ठे ९-१२.
• नीतिसूत्रे ७:६-२३ मधील वृत्तान्त आपल्याला पोर्नोग्राफी टाळण्यास कसा मदत करू शकतो?
त्या वृत्तान्तात एका तरुणाविषयी सांगितले आहे. हा तरुण, अशा एक ठिकाणी गेला जेथे एक अनैतिक स्त्री राहत असल्याचे अनेकांना माहीत होते. त्या स्त्रीने त्याला भुरळ घातली. आज, ज्या इंटरनेट साईटवर अश्लील चित्रे असतात अशा साईट पाहण्याचे आपण टाळले पाहिजे. तसेच, अशी चित्रे असलेल्या इंटरनेट साईटवर गेल्यानंतर नव्हे, तर त्या साईटवर जाण्याचा आपल्याला मोह होतो त्याच क्षणी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे.—११/१५, पृष्ठे ९-१०.