व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी धैर्याने देवाचे वचन घोषित केले!

त्यांनी धैर्याने देवाचे वचन घोषित केले!

त्यांनी धैर्याने देवाचे वचन घोषित केले!

खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विरोध केला जातो तेव्हा ते धैर्याने व निडरतेने त्याचा सामना करतात. आपल्या अनेक प्रकाशनांतून, उदाहरणार्थ “बेअरिंग थरो विट्‌नेस” अबाऊट गॉड्‌स किंग्डम आणि जेहोवाज विट्‌नेसेस्‌—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंग्डम यांसारख्या प्रकाशनांतून ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. आजच्या काळातही, विरोधाला तोंड देताना आपण पहिल्या शतकातील आपल्या सहविश्‍वासू बांधवांप्रमाणेच, यहोवाचा आत्मा मिळावा आणि त्याचे वचन धैर्याने घोषित करण्यासाठी साहाय्य मिळावे म्हणून त्याला प्रार्थना करतो.—प्रे. कृत्ये ४:२३-३१.

पहिल्या महायुद्धादरम्यान आपले प्रचार कार्य कशा प्रकारे केले जात होते याविषयी एका बांधवाने लिहिले: “देवाचे सेवक मोठ्या उत्साहानं द फिनिश्‍ड मिस्ट्री असे शीर्षक असलेल्या स्टडीज इन द स्क्रिप्चर्स याच्या सातव्या खंडाचं वाटप करण्यात व्यस्त होते. या पुस्तकाचं अभूतपूर्व प्रमाणात वितरण होत होतं. १९१८ साली राज्य वार्ता क्र. १ प्रकाशित करण्यात आली. यानंतर, द फिनिश्‍ड मिस्ट्री या पुस्तकाच्या वितरणाची मोहीम अधिकाऱ्‍यांनी का दडपून टाकली याचा खुलासा करण्यासाठी राज्य वार्ता क्र. २ प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर राज्य वार्ता क्र. ३ आली. विश्‍वासू अभिषिक्‍त वर्गानं ही प्रकाशनं मोठ्या प्रमाणात वितरित केली. राज्य वार्ता लोकांसमोर आणण्यासाठी खरोखर दृढ विश्‍वासाची व धैर्याची गरज होती.”

आज नव्या राज्य प्रचारकांना साक्षकार्य कसे करायचे याचे सहसा प्रशिक्षण दिले जाते. पण पूर्वी असे नव्हते. १९२२ साली पहिल्यांदा क्षेत्र सेवेत गेलेल्या अमेरिकेतील एका पोलिश बांधवाने आपल्या अनुभवाविषयी असे लिहिले: “मी एकटाच एका डॉक्टरच्या कार्यालयासमोर उभा होतो. साहित्य कसं सादर करायचं याची मला जराही कल्पना नव्हती. माझं इंग्रजीही खूप कच्चं होतं. असो, मी दार वाजवलं. एका नर्सनं दार उघडलं. मी तो अनुभव कधीही विसरणार नाही. माझ्या छातीत धडधडत होतं, मी खूप घाबरलो होतो. बॅगेतून मी पुस्तकं काढायला गेलो, तेव्हा सगळी पुस्तकं त्या नर्सच्या पायाजवळ पडली. मी काय बोललो हेही मला आठवत नाही, पण तिनं माझ्याकडून एक प्रकाशन स्वीकारलं. मी तिथून निघालो तेव्हा मला आधीसारखी भीती वाटत नव्हती. यहोवानं मला आशीर्वाद दिलाय असं मला जाणवलं. त्या दिवशी व्यापारी क्षेत्रातील त्या रस्त्यावर काम करताना मी बऱ्‍याच पुस्तिका लोकांना दिल्या.”

एक बहीण सांगते, “१९३३ च्या सुमारास बरेच बांधव राज्याचा संदेश घोषित करण्यासाठी लाऊडस्पीकर बसवलेल्या मोटारींचा (साऊंड कार) उपयोग करायचे.” एकदा ही बहीण एका जोडप्यासोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या डोंगराळ भागात प्रचार कार्य करत होती. त्या अनुभवाविषयी ती सांगते, “बांधवानं साऊंड कार डोंगरावर उंच ठिकाणी नेली. आम्ही दोघी खाली गावातच थांबलो. त्यांनी संदेशाची रेकॉर्ड सुरू केली तेव्हा तो आवाज स्वर्गातूनच येतोय की काय असं वाटलं. गावातल्या लोकांनी बांधवाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना ते सापडले नाहीत. रेकॉर्ड संपल्यानंतर आम्ही लोकांच्या भेटी घेऊन त्यांना साक्ष दिली. साऊंड कार्सचा उपयोग करून प्रचार कार्य करण्याची मला आणखी दोन प्रसंगी संधी मिळाली. खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना आमचा संदेश ऐकण्याची मुळीच इच्छा नसायची. पण त्यांचा नाइलाज व्हायचा, कारण लाऊडस्पीकरचा आवाज त्यांच्या घरांतही अगदी स्पष्टपणे ऐकू यायचा. यहोवा योग्य वेळी अगदी योग्य पद्धतीचा वापर करतो, याचा आम्हाला नेहमीच अनुभव आला आहे. त्या पद्धतीनं प्रचार करण्यासाठी आम्हाला सगळं धैर्य एकवटावं लागलं पण त्या त्या वेळी त्या विशिष्ट पद्धतीचा उद्देश साध्य झाला आणि यहोवाच्या नावाचा गौरव झाला.”

एकोणीसशे तीसच्या दशकात आणि एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या सुरुवातीला साक्षकार्यात ग्रामोफोन आणि बायबल आधारित भाषणांच्या रेकॉर्डिंग्सचा उपयोग केला जायचा. एक बहीण तेव्हाचा अनुभव सांगते: “एकदा एक तरुण बहीण ग्रामोफोन घेऊन घरोघरचं कार्य करत होती. एका घराच्या दाराजवळ तिनं रेकॉर्ड सुरू केली तेव्हा घरमालक इतका चिडला की त्यानं ग्रामोफोनलाच लाथ मारली आणि ग्रामोफोन पायऱ्‍यांवरून खाली पडला. पण एकही रेकॉर्ड तुटली नाही. जवळच उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये तीन माणसं दुपारचं जेवण करत होती. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पाहिला आणि बहिणीनं आपल्याला रेकॉर्ड ऐकवावी अशी तिला विनंती केली. त्यांनी तिच्याकडून साहित्यही घेतलं. या चांगल्या अनुभवामुळं बहीण आधी झालेला अपमान विसरली.” अशा कठीण प्रसंगांना तोंड द्यायला खरोखरच धैर्याची गरज होती.

तीच बहीण पुढे म्हणते: “१९४० साली, रस्त्यावर उभं राहून नियतकालिकं वाटण्याची पद्धत सुरू करण्यात आली तो काळ मला आठवतो. यापूर्वी पदयात्रा (इन्फर्मेशन मार्च) काढून साक्ष दिली जायची. ‘धर्म पाश आहे, थोतांड आहे’ आणि ‘देवाची आणि ख्रिस्त राजाची सेवा करा’ अशा घोषणा लिहिलेले फलक घेऊन बंधुभगिनी एका ओळीनं रस्त्याच्या कडेनं चालत जायचे. त्याच वेळी, येणाऱ्‍या जाणाऱ्‍या लोकांना विनामूल्य हस्तपत्रिकाही दिल्या जायच्या. अशा प्रकारच्या कार्यांत सहभागी होण्यासाठी नक्कीच धैर्याची गरज होती, पण यामुळं यहोवाच्या नावाविषयी व त्याच्या सेवकांविषयी लोकांना माहिती देण्याचा उद्देश साध्य झाला.”

दुसरी एक बहीण म्हणते, “लहानशा गावांमध्ये रस्त्यावर उभं राहून नियतकालिकं वाटणं फार कठीण होतं. साक्षीदारांच्या कार्याचा भयंकर विरोध केला जात होता, तेव्हाचा हा काळ होता. . . . रस्त्याच्या कोपऱ्‍यावर नियतकालिकं घेऊन उभं राहणं आणि सुचवलेले नारे मोठ्यानं घोषित करणं सोपं नव्हतं, यासाठी धाडस लागायचं. पण तरीसुद्धा आम्ही क्वचितच कधी शनिवारचं साक्षकार्य बुडवलं असेल. काही वेळा लोक आमच्याशी प्रेमानं बोलायचे. पण इतर वेळी विरोध करणारे लोक जमा होऊ लागायचे आणि कधीकधी तर जमावाकडून मारहाण होण्याआधी आम्हाला तिथून निघावं लागायचं.”

दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यात आला, पण ते धैर्याने आपले सेवाकार्य करत राहिले. १ डिसेंबर, १९४० ते १२ जानेवारी, १९४१ या काळात झालेल्या ४३ दिवसांच्या एका मोहिमेत, अमेरिकेतील जवळजवळ ५०,००० प्रचारकांनी सुमारे ८० लाख पुस्तिका वितरित केल्या. या मोहिमेला “धैर्य” साक्षीकाळ असे खास नावही देण्यात आले होते.

देवाच्या संघटनेतील बऱ्‍याच वयस्कांना गतकाळातील अशी अनेक आव्हाने अगदी स्पष्टपणे आठवतात जी पेलण्याकरता त्यांना धैर्य एकवटावे लागले. काहींना, “शत्रूच्या वेशीपर्यंत धैर्याने लढा!” हे ब्रीदवाक्य आठवते. कित्येक वर्षांपर्यंत देवाच्या लोकांची निर्भय मनोवृत्ती या ब्रीदवाक्यातून व्यक्‍त करण्यात आली. सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण समाप्तीस येण्याआधी देवाकडील संदेश घोषित करण्यासाठी आणखी कोणत्या पद्धतींचा वापर केला जाईल हे येणारा काळच सांगेल. पण, यहोवाच्या साहाय्याने आपण त्याचे वचन पूर्ण विश्‍वासाने व धैर्याने घोषित करत राहू या.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

राज्य प्रचाराचे कार्य करण्यासाठी पूर्वीपासूनच धैर्याची गरज होती