व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जरा आमचा फोटो काढता का?”

“जरा आमचा फोटो काढता का?”

“जरा आमचा फोटो काढता का?”

एका प्रांतीय अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवसाच्या कार्यक्रमानंतर मेक्सिको बेथेल कुटुंबाचा होस्वे नावाचा एक सदस्य केरेतारो शहरात फिरायला गेला होता. त्याच वेळी, कोलम्बियातून पर्यटन करायला आलेल्या हॉव्येर आणि मारू नावाच्या एका विवाहित जोडप्याने होस्वेला त्यांचा फोटो काढायला सांगितले. होस्वेने व त्याच्या मित्रांनी सभ्य पेहराव केला होता आणि अधिवेशनाचे बॅजेस लावले होते. त्यामुळे, ते एखाद्या पदवीदान समारंभाला किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जाऊन आले होते का असे त्या जोडप्याने त्यांना विचारले. त्यावर होस्वेने त्यांना सांगितले, की ते यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनासाठी आले होते आणि त्याने त्यांना रविवारच्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आपल्याजवळ सभ्य पेहराव नाही त्यामुळे आपण तेथे जाऊ शकणार नाही असे त्या जोडप्याला वाटले. तरीसुद्धा, होस्वेने त्यांना आपला नाव-पत्ता आणि तो ज्या शाखा कार्यालयात सेवा करत होता तेथील फोन नंबर दिला.

त्याच्या चार महिन्यांनंतर हॉव्येरने होस्वेशी संपर्क साधला तेव्हा होस्वेला आश्‍चर्य वाटले. ते जोडपे अधिवेशनाला उपस्थित राहिले होते आणि आता ते मेक्सिको सिटीत राहत असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना भेटावे अशी त्यांची इच्छा होती. लवकरच हॉव्येर आणि मारू यांच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला, आणि ते लगेच सभांना उपस्थित राहू लागले. त्याच्या दहा महिन्यांनंतर ते प्रचारक बनले. त्यानंतर ते कॅनडातील टराँटोमध्ये राहायला गेले असले, तरी तेथे त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि बाप्तिस्मा घेतला.

नंतर, होस्वेला हॉव्येरकडून एक पत्र मिळाले. त्यात त्याने, सत्य स्वीकारण्यास त्याला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली होती हे सांगितले. “अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधी मी व माझ्या पत्नीनं आमच्या आध्यात्मिक गरजेविषयी चर्चा केली होती. तुम्ही किती सभ्य पेहराव केला होता हे पाहिल्यावर, तुम्ही एका अतिशय खास सभेवरून आला असाल असा आम्ही विचार केला. आम्ही अधिवेशनात गेलो तेव्हा आम्हाला बसण्यासाठी प्रेमळपणे जागा देण्यात आली आणि आमच्या शेजारी बसलेल्यांनी आम्हाला बायबल उघडून त्यात पाहण्यास मदत केली. तिथं उपस्थित असलेल्यांचं आचरण खूप चांगलं होतं. हे सर्व पाहून आमच्यावर चांगला प्रभाव पडला. आम्ही पर्यटक म्हणून त्या शहरात आलो होतो आणि तशाच पेहरावात अधिवेशनाला उपस्थित राहिलो होतो, पण त्याबद्दल कोणाला काहीही वाटलं नाही.”

होस्वेच्या बाबतीत शलमोन राजाचे शब्द किती खरे ठरले! शलमोनाने लिहिले: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उप. ११:६) तुम्हीदेखील, पुढे येणाऱ्‍या एखाद्या अधिवेशनाबद्दल किंवा जाहीर भाषणाबद्दल सांगण्यासाठी संधी शोधण्याद्वारे सत्याचे बी पेरू शकता का? हॉव्येर आणि मारू यांच्याप्रमाणेच, जे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी भुकेले व तान्हेले आहेत अशांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी यहोवा तुमचादेखील उपयोग करू शकतो.—यश. ५५:१.

[३२ पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: आलेहांद्रो वोगेलिन, मारू पिनेडा, आलेहांद्रो पिनेडा, हॉव्येर पिनेडा आणि होस्वे रॅमीरेझ, मेक्सिको शाखा कार्यालयात