व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

शलमोनाचे उदाहरण कोणत्या अर्थाने आपल्यासाठी एक इशारेवजा उदाहरण आहे?

देवाने शलमोन राजाला आशीर्वादित केले व त्याचा उपयोग केला. पण, त्याच्या शासन काळादरम्यान तो देवाच्या सल्ल्यापासून भरकटला. त्याने फारोच्या मूर्तिपूजक मुलीशी लग्न केले, अनेक पत्नी केल्या आणि त्या मूर्तिपूजक स्त्रियांच्या प्रभावात येऊन तो हळूहळू खोट्या उपासनेकडे वळला. आपल्यामध्ये हळूहळू चुकीच्या मनोवृत्ती निर्माण होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. (अनु. ७:१-४; १७:१७; १ राजे ११:४-८)—१२/१५, पृष्ठे १०-१२.

पहिल्या शतकापासून पुढे पृथ्वीवर नेहमीच काही खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती असले असतील असा निष्कर्ष आपण का काढू शकतो?

येशूने दिलेल्या गहू आणि निदणाच्या दाखल्यात सांगितलेले “चांगले बी” राज्याच्या पुत्रांस सूचित करते. (मत्त. १३:२४-३०, ३८) कापणीपर्यंत निदण गव्हासोबत वाढणार होते. म्हणून, गहू वर्गामध्ये नेमके कोण होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नसलो, तरी असे काही लोक नेहमीच हयात होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकतो.—१/१५, पृष्ठ ७.

ईर्ष्येच्या प्रवृत्तीवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो?

ईर्ष्येच्या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी गुणकारी उपाय: प्रीती आणि बंधुभाव विकसित करण्यास झटा, देवाच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या लोकांची संगत धरा, चांगुलपणाने वागण्याचा प्रयत्न करा, आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा. (रोम. १२:१५)—२/१५, पृष्ठे १६-१७.

सल्ला देताना आपण कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजे?

खरी परिस्थिती ओळखा. सल्ला देण्याचा उतावळेपणा करू नका. नम्रपणे देवाच्या वचनातील सल्ला लागू करा. शक्य असल्यास तुमच्या ईश्‍वरशासित ग्रंथालयाचा उपयोग करा. इतरांसाठी निर्णय घेण्याचे टाळा.—३/१५, पृष्ठे ७-९.