व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

शमशोनाचे बळ त्याच्या केसांत होते का?

शमशोनाला त्याचे बळ केवळ त्याच्या केसांमुळे मिळाले नव्हते. त्याचे केस, तो नाजीर असल्यामुळे यहोवासोबत त्याचा जो नातेसंबंध होता त्या नातेसंबंधाचे प्रतीक होते. दलीलाने त्याचे केस कापवून घेतले तेव्हा त्याच्या या नातेसंबंधावर प्रभाव पडला.—४/१५, पृष्ठ ९.

आपल्या खरोखरच्या हृदयाच्या तुलनेत आपल्या लाक्षणिक हृदयावर कोणत्या तीन गोष्टींचा चांगला परिणाम होऊ शकतो?

(१) पोषण. ज्या प्रकारे आपल्या खऱ्‍या हृदयाला आरोग्यदायक अन्‍नाची गरज असते, त्याच प्रकारे आपल्या लाक्षणिक हृदयाला पोषक आध्यात्मिक अन्‍नाची गरज आहे. (२) व्यायाम. सेवाकार्यात आवेशाने भाग घेतल्याने आपल्या आध्यात्मिक हृदयाला निरोगी ठेवणे शक्य होईल. (३) वातावरण. ज्यांना आपली काळजी आहे त्या आपल्या विश्‍वासू बंधुभगिनींसोबत सहवास करण्याद्वारे आपण आपला ताण कमी करू शकतो.—४/१५, पृष्ठ १६.

अंत्यविधीचे भाषण देताना वक्त्याने स्तोत्र ११६:१५ मधील शब्द मरण पावलेल्या व्यक्‍तीवर का लागू करू नये?

त्या वचनात म्हटले आहे: “परमेश्‍वराच्या दृष्टीने त्याच्या भक्‍तांचे मरण अमोल आहे.” याचा अर्थ, यहोवाच्या नजरेत त्याचे सर्व एकनिष्ठ सेवक इतके मौल्यवान आहेत की तो कधीही त्यांचा नाश होऊ देणार नाही. तो कधीही या पृथ्वीवरून त्याच्या एकनिष्ठ सेवकांना एक समूह या नात्याने पूर्णपणे नाश होऊ देणार नाही.—५/१५, पृष्ठ २२.

कॉलपोर्टर्स कोण होते?

ज्यांना आज पायनियर म्हणून ओळखले जाते, त्यांना १९३१ च्या आधी “कॉलपोर्टर्स” म्हणून ओळखले जायचे.—५/१५, पृष्ठ ३१.

“या सर्व राज्यांचे” असे दानीएल २:४४ मध्ये जो उल्लेख आहे त्यात कोणत्या राज्यांचा समावेश होतो?

ही राज्ये, दानीएलाने वर्णन केलेल्या पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांनी चित्रित होणारी राज्ये किंवा सरकारे आहेत.—६/१५, पृष्ठ १७.

अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता, बायबलमध्ये सांगितलेल्या भविष्यवाणीतील सातवी जागतिक महासत्ता केव्हा बनली?

पहिल्या महायुद्धादरम्यान जेव्हा ब्रिटन आणि अमेरिका यांनी एकजुटीने महत्त्वपूर्ण रीतीने कार्य केले तेव्हा ही संयुक्‍त महासत्ता उदयास आली.—६/१५, पृष्ठ १९.

हर्मगिदोनाच्या थोड्याच काळाआधी कोणत्या घटना घडतील?

राष्ट्रांद्वारे “शांती व सुरक्षितपणा आहे” अशी लक्षवेधक घोषणा केली जाईल. (१ थेस्सलनी. ५:३, पं.र.भा.) सरकारांकडून खोट्या धर्माचा नाश केला जाईल. (प्रकटी. १७:१५-१८) खऱ्‍या उपासकांवर हल्ला केला जाईल. यानंतर अंत येईल.—७/१, पृष्ठ ९.

यहोवाने अब्राहामाला त्याच्या प्रिय पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले?

देवाने अब्राहामाला इसहाकाचे बलिदान देऊ दिले नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही घटना केवळ एक नमुना होती. या घटनेद्वारे देवाने दाखवले की कशा प्रकारे तो स्वतः मोठी किंमत मोजून आपल्या पुत्राचे, येशूचे बलिदान देईल.—७/१, पृष्ठ २०.