व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली

त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली

त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली

इ.स. ४९ चे वर्ष. पेत्र, याकोब आणि योहान—“जे आधारस्तंभ मानलेले होते”—यांनी प्रेषित पौलावर व त्याचा सहकारी बर्णबा याच्यावर एक कामगिरी सोपवली. राष्ट्रांत प्रचार कार्य करत असताना त्यांनी गरीब ख्रिश्‍चनांना लक्षात ठेवायचे होते. (गलती. २:९, १०) त्यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी त्यांनी कशी पूर्ण केली?

पौलाने या गोष्टीला किती महत्त्व दिले हे त्याच्या पत्रांवरून दिसते. उदाहरणार्थ, करिंथ येथील ख्रिश्‍चनांना त्याने लिहिले: “आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत. मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचविण्याकरिता मी पाठवीन.”—१ करिंथ. १६:१-३.

करिंथकरांना देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात पौलाने वर्गण्यांचा मूळ उद्देश काय होता याविषयी पुन्हा एकदा सांगितले. त्यांचा उद्देश हा होता की “प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी” आणि अशा रीतीने “समानता व्हावी.”—२ करिंथ. ८:१२-१५.

इ.स. ५६ च्या सुमारास पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले तेव्हा वर्गण्या गोळा करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते. त्याने म्हटले: “सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करीत करीत यरुशलेमेस जातो; कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते.” (रोम. १५:२५, २६) याच्या काही काळानंतर, पौलाने त्याच्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी पूर्ण केली. कारण जेरूसलेमला परतल्यावर व तेथे त्याची अटक झाल्यानंतर त्याने रोमन सुभेदार फेलिक्स याला म्हटले: “मी . . . आपल्या लोकांना दानधर्म करावयास व यज्ञार्पणे वाहावयास आलो.”—प्रे. कृत्ये २४:१७.

पौलाने मासेदोनियातील ख्रिश्‍चनांविषयी जे म्हटले त्यावरून पहिल्या शतकातील बंधुभगिनींनी दाखवलेली मनोवृत्ती स्पष्टपणे दिसते. पौलाने म्हटले: “त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की . . . आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.” प्रेषित पौलाने करिंथकरांना त्यांच्या उदाहरणाचे पालन करण्यास आर्जवले. त्याने म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” मंडळ्यांना असा उदार आत्मा दाखवण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले? असे करण्यामागचा हेतू केवळ पवित्र जनांच्या गरजा पुरवणे इतकाच नव्हे, तर देवाचे अधिकाधिक आभार प्रदर्शन करणे हादेखील होता. (२ करिंथ. ८:४; ९:७, १२) आपण जे दान देतो त्यामागेसुद्धा असेच हेतू असले पाहिजेत. अशी उत्तम व निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवल्याने यहोवा आपल्याला नक्कीच आशीर्वादित करेल, आणि त्याचा आशीर्वाद खरोखर समृद्ध करतो.—नीति. १०:२२.

[९ पानांवरील चौकट]

जगभरात चाललेल्या कार्यासाठी काही जण कशा प्रकारे दान देतात

प्रेषित पौलाच्या दिवसांप्रमाणे, आजही बरेच जण ठराविक रक्कम बाजूला ठेवतात आणि “जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असे लिहिलेल्या मंडळीच्या दानपेटीत ती टाकतात. (१ करिंथ. १६:२) दर महिन्याला मंडळ्या हे दान संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. तसेच, तुमच्या देशात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या कायदेशीर निगमाला तुम्ही थेट आपले दान पाठवू शकता. * तुम्ही कोणकोणत्या प्रकारे थेट अनुदान पाठवू शकता ते पुढे सांगितले आहे:

देणग्या

• पैसे, दागदागिने किंवा इतर मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता देणगी म्हणून दिली जाऊ शकते.

• पैसे किंवा मालमत्ता ही देणगी आहे हे सूचित करणारे एक पत्र सोबत पाठवा.

सशर्त-दान योजना

• दात्याला गरज पडल्यास पैसे परत केले जातील या अटीवर पैशांचे दान दिले जाऊ शकते.

• ही सशर्त देणगी आहे हे सूचित करणारे एक पत्र सोबत पाठवा.

धर्मादाय योजना *

पैशांची देणगी आणि मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता दान म्हणून देण्याव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता दान देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते खाली दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही मार्गाने किंवा मार्गांनी दान देण्याची इच्छा असली, तरीसुद्धा प्रथम तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या देशात कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची खातरी करून घ्यावी. प्रत्येक देशातील कायदे आणि कराच्या बाबत असलेले नियम वेगवेगळे असल्यामुळे दान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग निवडण्याअगोदर करांविषयी व कायदेशीर बाबींविषयी योग्य सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.

विमा: यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार ट्रस्ट स्थापन करून किंवा मग मृत्यूनंतर ते यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला देय केले जाऊ शकते.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासंबंधी करार केला जाऊ शकतो.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर केली जाते. या व्यवस्थेत, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करू शकता किंवा या निगमाला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. या व्यवस्थेअंतर्गत करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. * एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, या बाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. तुमच्या देशातील करासंबंधीचे किंवा इतर कायदे वेगळे असल्यामुळे या माहितीपत्रकातील सूचना तुमच्या परिस्थितीला कदाचित पूर्णपणे लागू होणार नाहीत. तेव्हा, हे माहितीपत्रक वाचल्यानंतर स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांशी चर्चा करा. दान देण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केल्यामुळे अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणाऱ्‍या कर सवलतीदेखील वाढवता आल्या आहेत. तुमच्या देशात हे माहितीपत्रक उपलब्ध असल्यास स्थानिक मंडळीच्या सचिवाला विनंती करून त्याची एक प्रत मागवली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

[तळटीपा]

^ परि. 9 भारतात हे “जेहोवाज विट्‌नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

^ परि. 16 अंतिम निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

^ परि. 24 भारतात “धर्मादाय योजना हस्तपत्रिका” नावाचे दस्तऐवज लवकरच आसामी, इंग्रजी, कन्‍नड, कोंकणी, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो व हिंदी या भाषांतून उपलब्ध करून दिली जाईल.

CHARITABLE PLANNING OFFICE

Jehovah’s Witnesses of India

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४

Karnataka.

Telephone: (०८०) २८४६८०७२