व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

आपण अविचारी संभाषणाची आग कशा प्रकारे विझवू शकतो?

आपण आपल्या हृदयाचे परीक्षण केले पाहिजे. एखाद्या बांधवाची टीका करण्याऐवजी, आपण अशी मनोवृत्ती का दाखवत आहोत याचे परीक्षण का करू नये? आपण त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले आहोत हे दाखवण्यासाठी आपण असे करत आहोत का? शिवाय, टीकात्मक मनोवृत्तीमुळे तणावग्रस्त वातावरण आणखीनच चिघळू शकते.—८/१५, पृष्ठ २१.

देव मानवांना पृथ्वीचा नाश करू देईल का?

देव मानवांना पृथ्वीचा नाश करू देणार नाही. बायबल आपल्याला याचे आश्‍वासन देते, की यहोवाने पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही,” तर त्यावर “लोकवस्ती व्हावी” म्हणून ती घडवली. (यश. ४५:१८) मानवांच्या हाती पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ देण्याऐवजी, देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करेल. (प्रकटी. ११:१८)—७/१, पृष्ठ ४.

यहोवाचा दिवस सुरू होण्याच्या अगदी थोड्याच काळाआधी कोणत्या घटना घडतील?

“शांती आहे, निर्भय आहे!” अशी घोषणा केली जाईल. राष्ट्रे मोठ्या बाबेलवर हल्ला करून तिचा नाश करतील. देवाच्या लोकांवर हल्ला करण्यात येईल. हर्मगिदोनाचे युद्ध होईल. त्यानंतर सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकले जाईल.—९/१५, पृष्ठ ४.

अंत केव्हा येईल हे माहीत नसल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

अंत नेमका केव्हा येईल तो दिवस व ती घटका माहीत नसल्यामुळे आपल्या अंतःकरणात काय आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे आपण देवाचे मन आनंदित करू शकतो. तसेच, आपल्याला जीवनात आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवण्याचे प्रोत्साहन आणि देवावर व त्याच्या वचनावर अधिकाधिक विसंबून राहण्यास साहाय्य मिळते. शिवाय, आपल्याला सध्या ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागते त्यांमुळे आपल्याला अनेक उत्तम ख्रिस्ती गुण विकसित करण्यास मदत मिळते.—९/१५, पृष्ठे २४-२५.

देवाच्या आज्ञेमुळे आपले संरक्षण कसे होते?

देवाचे वचन विवाहबाह्‍य शारीरिक संबंधांचा निषेध करते. (इब्री १३:४) जे विवाहित जोडपे या आज्ञेचे पालन करतात ते आपल्या विवाहात सुरक्षा अनुभवतात आणि मुलांसाठीही चांगले वातावरण निर्माण होते. पण याउलट, विवाहबाह्‍य संबंधांमुळे रोग, घटस्फोट, हिंसा, मानसिक त्रास आणि एकटे पालकत्व अशा असंख्य समस्या उद्‌भवतात. (नीति. ५:१-९)—७/१, पृष्ठ १६.

प्रकटीकरण १:१६, २० या वचनांत उल्लेख करण्यात आलेले येशूच्या उजव्या हातातील “सात तारे” कोणास सूचित करतात?

ते आत्म्याने अभिषिक्‍त वडिलांना आणि पर्यायाने मंडळ्यांतील सर्वच वडिलांना सूचित करतात.—१०/१५, पृष्ठ १४.

आपण दुरात्म्यांच्या तावडीतून कसे मुक्‍त होऊ शकतो?

देवाचा आशीर्वाद मिळवू इच्छिणाऱ्‍या सर्वांना बायबल असे आर्जवते: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याको. ४:७, ८) तुमची इच्छा असल्यास यहोवा देव दुरात्म्यांच्या तावडीतून सुटण्यास तुम्हाला नक्की मदत करेल.—१०/१, पृष्ठ २८.

यशया ५०:४, ५ या वचनांत उल्लेख केलेली नम्र मनोवृत्ती येशूने कशी दाखवली?

त्या वचनांत सांगितले आहे की ज्याच्याजवळ “सुशिक्षितांची जिव्हा” आहे तो “मागे” फिरणार नाही. येशूने नम्र वृत्ती दाखवली आणि त्याचा पिता जे शिकवत होता त्याकडे त्याने पूर्ण लक्ष दिले. तो यहोवाकडून शिकण्यास उत्सुक व तयार होता. पापी मानवांना दया दाखवताना यहोवाने जी नम्रता दाखवली त्याचे येशूने जवळून निरीक्षण केले.—११/१५, पृष्ठ ११.

खऱ्‍या आनंदाचा स्रोत काय आहे?

आपल्याला जे काही हवे ते मिळवल्याने किंवा आरामदायक जीवन जगल्याने खरा आनंद मिळत नाही. येशूने स्वतः असे म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांच्या मदतीसाठी वापरल्याने आणि त्यांना नेहमी उत्तेजन दिल्याने आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळू शकते. (प्रे. कृत्ये २०:३५)—१०/१, पृष्ठ ३२.