व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या जगात “परदेशवासी” म्हणून राहणे

या जगात “परदेशवासी” म्हणून राहणे

या जगात “परदेशवासी” म्हणून राहणे

“जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहा त्या तुम्हास मी विनंती करतो की, . . . दैहिक वासनांपासून दूर राहा.” —१ पेत्र २:११.

तुमचे उत्तर काय असेल?

अभिषिक्‍त जनांना परदेशवासी का म्हणता येईल?

“दुसरी मेंढरे” कोणत्या अर्थाने परदेशवासी आहेत?

भविष्याच्या संदर्भात तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?

१, २. “निवडलेले” असे म्हणताना पेत्र कोणाविषयी बोलत होता, आणि त्याने त्यांना “परदेशवासी” का म्हटले?

 येशू स्वर्गात परतल्यानंतर सुमारे ३० वर्षांनी प्रेषित पेत्राने, “पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्‍यांत पांगलेल्या यहुदी लोकांतील . . . निवडलेले जे परदेशवासी आहेत” त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. (१ पेत्र १:१, २) “निवडलेले” असे म्हणताना साहजिकच पेत्र अशा ख्रिश्‍चनांबद्दल बोलत होता, ज्यांना त्याच्याप्रमाणेच पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले होते; आणि ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता त्यांना “जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी . . . पुन्हा जन्म” देण्यात आला होता. (१ पेत्र १:३, ४ वाचा.) पण त्यानंतरही पेत्राने त्या निवडलेल्यांना “प्रवासी व परदेशवासी” का म्हटले बरे? (१ पेत्र २:११) शिवाय, आज इतर साक्षीदारांच्या तुलनेत अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रमाण दर ६५० साक्षीदारांमागे केवळ १ इतके आहे; मग, पेत्राच्या या शब्दांचा आज आपल्याकरता काय अर्थ होतो?

पहिल्या शतकातील अभिषिक्‍त जनांना “परदेशवासी” म्हणणे योग्यच होते. आज जिवंत असलेल्या अभिषिक्‍त शेषजनांप्रमाणेच, पहिल्या शतकातील अभिषिक्‍त जनांचे पृथ्वीवरील वास्तव्य हे कायमचे नव्हते. प्रेषित पौल, जो स्वतः अभिषिक्‍तांच्या लहान कळपातील एक सदस्य होता, त्याने याविषयी अशा प्रकारे स्पष्ट केले: “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो.” (लूक १२:३२; फिलिप्पै. ३:२०) अभिषिक्‍त जनांचे नागरिकत्व “स्वर्गात” असल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो तेव्हा ते पृथ्वीवरून स्वर्गात जातात, जेथे त्यांना कितीतरी पटीने श्रेष्ठ असे अमर जीवन प्राप्त होते. (फिलिप्पैकर १:२१-२३ वाचा.) अशा रीतीने, सैतानाच्या नियंत्रणाखालील जगात राहत असताना अभिषिक्‍त जनांना अगदी शाब्दिक अर्थाने “परदेशवासी” म्हणणे रास्तच आहे.

३. दुसऱ्‍या मेंढरांबद्दल कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

पण दुसऱ्‍या मेंढरांबद्दल काय म्हणता येईल? (योहा. १०:१६) बायबलनुसार, त्यांना या पृथ्वीचे कायमचे रहिवासी बनण्याची खात्रीशीर आशा नाही का? हो, नक्कीच आहे. ही पृथ्वी त्यांचे कायमचे निवासस्थान बनेल! तरीसुद्धा, सध्याच्या काळात एका अर्थाने त्यांनासुद्धा परदेशवासी म्हटले जाऊ शकते. कोणत्या अर्थाने?

“सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे”

४. जगातील पुढारी कोणती परिस्थिती बदलू शकत नाहीत?

जोपर्यंत सैतानाच्या दुष्ट जगाला अस्तित्वात राहू दिले जाईल तोपर्यंत सर्वांनाच, ख्रिश्‍चनांनासुद्धा, सैतानाने यहोवाविरुद्ध केलेल्या बंडाचे दुष्परिणाम सहन करावे लागतील. रोमकर ८:२२ यात आपण असे वाचतो: “आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” आणि जगातील पुढारी, वैज्ञानिक व समाजसेवक यांचे कितीही प्रामाणिक हेतू असले, तरीसुद्धा ही परिस्थिती ते बदलू शकत नाहीत.

५. लाखो लोकांनी १९१४ पासून कोणते पाऊल उचलले आहे आणि का?

म्हणूनच, १९१४ पासून लाखो लोकांनी देवाने निवडलेला व सिंहासनावर विराजमान झालेला राजा, ख्रिस्त येशू याची प्रजा बनण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला आहे. त्यांना सैतानाच्या जगातील व्यवस्थेचा भाग बनण्याची मुळीच इच्छा नाही. ते सैतानाच्या जगाचे समर्थन करण्यास नकार देतात. उलटपक्षी, देवाच्या राज्याचे समर्थन करण्याकरता व या राज्याच्या वाढीकरता ते आपल्या जीवनाचा व साधनसंपत्तीचा उपयोग करतात.—रोम. १४:७, ८.

६. यहोवाच्या साक्षीदारांना कोणत्या अर्थाने प्रवासी म्हटले जाऊ शकते?

यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा जास्त देशांत राहणारे व कायद्यांचे प्रामाणिकपणे पालन करणारे नागरिक आहेत हे खरे आहे. पण, कोणत्याही देशात राहत असले, तरी ते प्रवाशांप्रमाणे तेथे राहतात. सध्याच्या काळातील राजकीय व सामाजिक वादांत ते कोणाचीही बाजू घेत नाहीत. आतापासूनच ते स्वतःला देवाच्या नव्या जगाचे नागरिक मानतात. या अपरिपूर्ण जगात परदेशवासी म्हणून राहण्याचा त्यांचा काळ वेगाने संपुष्टात येत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद होतो.

७. देवाचे सेवक कशा प्रकारे कायमचे रहिवासी बनतील, आणि कोठे?

लवकरच ख्रिस्त आपल्या अधिकाराचा वापर करून सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल. ख्रिस्ताचे परिपूर्ण सरकार पृथ्वीवरून पाप व दुःख यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. यहोवाच्या सार्वभौम आधिपत्याचे सर्व विरोधी, मग ते दृश्‍य असोत वा अदृश्‍य, त्यांना समूळ नष्ट केले जाईल. अशा रीतीने, देवाचे विश्‍वासू सेवक पृथ्वीवरील नंदनवनाचे कायमचे रहिवासी बनू शकतील. (प्रकटीकरण २१:१-५ वाचा.) त्या वेळी, सृष्टी पूर्णपणे “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” प्राप्त होईल.—रोम. ८:२१.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांकडून केल्या जाणाऱ्‍या अपेक्षा

८, ९. “दैहिक वासनांपासून दूर राहा” असे म्हणताना पेत्राचा काय अर्थ होता हे स्पष्ट करा.

ख्रिश्‍चनांकडून कोणती अपेक्षा केली जाते, याबद्दल पेत्राने अशा प्रकारे खुलासा केला: “प्रियजनहो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहा त्या तुम्हास मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणाऱ्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.” (१ पेत्र २:११) हा सल्ला सुरुवातीला जरी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना देण्यात आला असला, तरीसुद्धा येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांकरताही तो तितकाच महत्त्वाचा आहे.

काही इच्छा मुळात गैर नसतात. किंबहुना, त्या निर्माणकर्त्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार पूर्ण केल्या जातात, तेव्हा त्या जीवनातील आनंद द्विगुणित करतात. उदाहरणार्थ, चांगले खाणे, पिणे, करमणूक करणे, तसेच निकोप मैत्रीचा आनंद लुटणे या सगळ्या अगदी सर्वसामान्य इच्छा आहेत. शिवाय, आपल्या विवाह जोडीदारासोबत लैंगिक सुखाचा अनुभव घेणे हीदेखील एक आवश्‍यक व योग्य इच्छा आहे. (१ करिंथ. ७:३-५) पण, पेत्राने अगदी योग्यपणे केवळ “जिवात्म्याबरोबर लढणाऱ्‍या दैहिक वासनांपासून” दूर राहण्याची ताकीद दिली. पेत्राला नेमके काय म्हणायचे होते हे एका बायबल भाषांतरात आणखी उघडपणे सांगितले आहे. तेथे दैहिक वासना याचे भाषांतर “पापपूर्ण वासना” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) असे करण्यात आले आहे. यावरून अगदी स्पष्टच आहे, की अशी कोणतीही मानवी इच्छा जी यहोवाने प्रकट केलेल्या उद्देशाच्या विरोधात आहे आणि जी देवासोबतचा एखाद्याचा नातेसंबंध बिघडवू शकते ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास, एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

१०. ख्रिश्‍चनांना आपल्या जगात सामावून घेण्यासाठी सैतान कोणत्या काही पद्धतींचा वापर करतो?

१० सैतानाचा उद्देश, सध्याच्या जगात स्वतःला “परदेशवासी” समजण्याचा खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा निर्धार कमकुवत करणे हा आहे. भौतिकवादाचा मोह, अनैतिकतेचे प्रलोभन, प्रसिद्धीचे आकर्षण, स्वार्थी मनोवृत्तीचा प्रभाव आणि राष्ट्रप्रेमाची मोहिनी—हे सारे सैतानाचे पाश आहेत आणि त्यांचे खरे स्वरूप ओळखणे गरजेचे आहे. या सर्व नकारात्मक दैहिक इच्छांपासून आपण दूर राहतो तेव्हा आपण हे दाखवून देतो की सैतानाच्या दुष्ट जगाचा भाग होण्याची आपली इच्छा नाही. तसेच, आपण हेही दाखवून देतो की या जगात आपण केवळ तात्पुरत्या काळासाठी राहत आहोत. खरेतर आपल्याला देवाच्या नीतिमान नव्या जगाची आस आहे आणि त्या जगात कायमचे रहिवासी बनण्यासाठीच आपण झटत आहोत.

चांगले आचरण

११, १२. परदेशी लोकांकडे काही वेळा कशा दृष्टिकोनाने पाहिले जाते आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय म्हणता येईल?

११ “परदेशवासी” या नात्याने ख्रिश्‍चनांकडून काय अपेक्षित आहे याबद्दल पुढे स्पष्टीकरण देताना १२ व्या वचनात पेत्र असे म्हणतो: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” स्वतःचा मायदेश नसलेल्या देशात राहणाऱ्‍या परदेशी रहिवाशांची बरेचदा टीका केली जाते. केवळ ते चारचौघांसारखे नसल्यामुळे कधीकधी त्यांना अपराधी गणले जाते. त्यांचे बोलणे, वागणे, पेहराव, कदाचित त्यांचे दिसणेदेखील इतरांपेक्षा काहीसे वेगळे असू शकते. पण जेव्हा ते चांगली कामे करतात, म्हणजेच जेव्हा त्यांचे आचरण चांगले असते तेव्हा ते वेगळे असल्यामुळे त्यांच्याबद्दल ज्या नकारात्मक टिप्पण्या केल्या जातात त्या निराधार असल्याचे सिद्ध होते.

१२ त्याच प्रकारे, खरे ख्रिस्ती इतर लोकांपेक्षा बऱ्‍याच बाबतींत वेगळे आहेत, उदाहरणार्थ त्यांचे संभाषणाचे विषय किंवा मनोरंजन. त्यांचा पेहराव आणि केशभूषा समाजातील बहुतेक लोकांपेक्षा त्यांना वेगळे दाखवून देते. हा वेगळेपणा पाहून त्यांच्याबद्दल योग्य माहिती नसलेले लोक कधीकधी त्यांच्यावर अपराधी असल्याचा आरोप लावतात. पण, इतर लोक त्यांच्या जीवनशैलीबद्दल त्यांची प्रशंसा करतात.

१३, १४. “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते” ते कसे? उदाहरणांसह स्पष्ट करा.

१३ चांगल्या आचरणामुळे बिनबुडाचे आरोप खोटे ठरवले जाऊ शकतात. येशू हा असा एकमेव मनुष्य होता जो देवाला परिपूर्ण रीत्या विश्‍वासू राहिला; पण त्याच्यावरही खोटे आरोप लावण्यात आले. काही लोकांनी त्याला “खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र” म्हटले. पण देवाच्या सेवेतील त्याच्या सुज्ञ आचरणामुळे त्याला अपराधी ठरवू पाहणाऱ्‍यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले. येशूने म्हटले, “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्त. ११:१९) आजही ही गोष्ट खरी असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, जर्मनीतील सेल्टर्स येथे असलेल्या बेथेल गृहात कार्य करणाऱ्‍या बंधुभगिनींची जीवनशैली त्या परिसरातील काही लोकांना विचित्र वाटते. पण त्या ठिकाणच्या महापौरांनी या स्वयंसेवकांचे असे म्हणून समर्थन केले: “तेथे सेवा करणाऱ्‍या साक्षीदारांची राहणी वेगळी असेल, पण ते इतर लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणत नाहीत.”

१४ अलीकडेच रशियातील मॉस्को शहरात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या संदर्भातही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अनेक गैरकृत्यांबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. पण, जून २०१० मध्ये फ्रांसमधील स्ट्रासबुर्ग येथे असलेल्या मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने असा निवाडा दिला: “अर्जदारांना स्वतःचा धर्म पाळण्याचा व स्वधर्मियांसोबत सहवास करण्याचा जो हक्क आहे, त्यात [मॉस्कोने] केलेला हस्तक्षेप न्याय्य नसल्याचे या न्यायालयाला आढळले आहे.” कुटुंबांत फुटी पाडणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा वैद्यकीय उपचार नाकारणे यांसारख्या अपराधांसाठी “अर्जदारांचा समाज जबाबदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी रशियातील न्यायालयांनी ‘पुरेशी व समाधानकारक’ कारणे सादर केली नाहीत.” याबाबतीत “रशियन कायदा अतिशय ताठर आणि अर्जदारांवर ठोठावलेला दंड प्रमाणाबाहेर कठोर होता. रशियातील न्यायालयांनी कोणताही रास्त उद्देश मनात बाळगून असे केले असले, तरीसुद्धा अर्जदारांना देण्यात आलेली शिक्षा त्यामानाने अगदीच अवाजवी होती.”

योग्य अधीनता

१५. जगभरातील खरे ख्रिस्ती बायबलमधील कोणत्या तत्त्वाचे पालन करतात?

१५ मॉस्कोतील, किंबहुना जगभरातील यहोवाचे साक्षीदार, ख्रिश्‍चनांसाठी पेत्राने सांगितलेली आणखी एक अपेक्षा पूर्ण करतात. पेत्राने लिहिले: “प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे . . . त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.” (१ पेत्र २:१३, १४) खरे ख्रिस्ती या दुष्ट जगाचे भाग नसले, तरी पौलाने त्यांना मार्गदर्शन केल्यानुसार ते यहोवाचा सर्वोच्च अधिकार ओळखून सरकारी अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहतात.—रोमकर १३:१, ५-७ वाचा.

१६, १७. (क) आपण सरकारांच्या विरोधात नाही हे कशावरून दिसून येते? (ख) काही राजकीय पुढाऱ्‍यांनी काय कबूल केले आहे?

१६ यहोवाचे साक्षीदार सध्याच्या जगात स्वतःला “परदेशवासी” मानून वागतात त्याअर्थी ते समाजव्यवस्थेविरुद्ध मूक निषेध व्यक्‍त करत आहेत असे म्हणता येणार नाही. तसेच, इतरांच्या राजकीय किंवा सामाजिक मतांचा ते विरोध करत नाहीत किंवा त्यांत हस्तक्षेप करत नाहीत. यहोवाचे साक्षीदार इतर धार्मिक गटांप्रमाणे राजकारणात सहभाग घेत नाहीत. तसेच, ते कधीही प्रशासनावर विशिष्ट कायदे बनवण्याचा दबाव आणत नाहीत. समाजातील सुव्यवस्थेत ते अडथळा आणतील किंवा सरकारविरोधी कार्यांत सहभागी होतील हा विचार अगदीच निराधार आहे!

१७ “राजाचा मान राखा” या पेत्राने दिलेल्या सल्ल्यानुसार ख्रिस्ती, सरकारी अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहतात. असे करण्याद्वारे ते या अधिकाऱ्‍यांच्या पदानुरूप त्यांना उचित आदर व सन्मान दाखवतात. (१ पेत्र २:१७) काही वेळा अधिकाऱ्‍यांनीही कबूल केले आहे की यहोवाच्या साक्षीदारांकडून समाजाला कोणताही धोका नाही. उदाहरणार्थ, जर्मन पुढारी स्टेफन राईख, जे पूर्वी ब्रॅन्डनबर्गमध्ये राज्यमंत्री आणि नंतर जर्मन संसदेचे सदस्य होते, त्यांनी म्हटले: “छळ छावण्यांमध्ये व तुरुंगांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची वागणूक आणि त्यांनी दाखवलेले उत्तम गुण कोणत्याही लोकशाही सरकारचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पूर्वीप्रमाणेच आजही फार गरजेचे आहेत. साक्षीदारांनी एसएस अधिकाऱ्‍यांच्या अत्याचाराला ज्या खंबीरतेने तोंड दिले आणि इतर कैद्यांप्रती जी करुणा दाखवली ती उल्लेखनीय होती. आज आपल्या समाजात परदेशीयांना, तसेच वेगळी राजकीय मते किंवा आदर्श असलेल्यांना दिवसेंदिवस जी क्रूर वागणूक दिली जात आहे ती विचारात घेता, हे उत्तम गुण आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाने अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

प्रेम दाखवणे

१८. (क) आपले सर्व बंधुभगिनींवर प्रेम असणे का स्वाभाविक आहे? (ख) साक्षीदार नसलेल्या काही व्यक्‍तींनी कोणती प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे?

१८ प्रेषित पेत्राने असे लिहिले: “बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा.” (१ पेत्र २:१७) यहोवाचे साक्षीदार देवाच्या मनाविरुद्ध वागून त्याला खिन्‍न करण्याचे सुदृढ भय बाळगतात आणि यामुळे त्यांना देवाच्या इच्छेनुसार वागण्याची अधिकच प्रेरणा मिळते. त्यांच्याप्रमाणेच देवाच्या इच्छेनुसार वागू इच्छिणाऱ्‍या बंधुभगिनींच्या एका जगव्याप्त बंधुवर्गाचे सदस्य या नात्याने यहोवाची सेवा करण्यास त्यांना आनंद वाटतो. त्यामुळे साहजिकच ते आपल्या सर्व बंधुभगिनींवर प्रीती करतात. सध्याच्या स्वार्थी जगात अभावाने आढळणारे हे बंधुप्रेम पाहून अनेकदा साक्षीदार नसलेल्या लोकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. उदाहरणार्थ, २००९ मध्ये जर्मनीतील आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला अन्य देशांतून कित्येक साक्षीदार आले होते. या बंधुभगिनींना जर्मनीच्या साक्षीदारांनी दाखवलेले प्रेम व त्यांना केलेले साहाय्य पाहून, अमेरिकेच्या एका प्रवासी कंपनीत पर्यटकांची मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्‍या एका स्त्रीला खूपच नवल वाटले. इतकी वर्षे मार्गदर्शक म्हणून काम करत असताना एकदाही असे काही आपल्या पाहण्यात आले नव्हते असे तिने म्हटले. त्या अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या साक्षीदारांपैकी एकाने नंतर सांगितले: “आपल्याबद्दल हे सारे ती खूपच आश्‍चर्याने व उत्साहाने व्यक्‍त करत होती.” तुम्ही उपस्थित राहिलेल्या एखाद्या अधिवेशनात, साक्षीदारांतील प्रेम पाहून बाहेरच्या व्यक्‍तींनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्‍त केल्याचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का?

१९. आपण कोणता निर्धार केला पाहिजे आणि का?

१९ वरती दिलेल्या सर्व मार्गांनी व इतर अनेक मार्गांनी यहोवाचे साक्षीदार हे दाखवून देतात की सैतानाच्या सध्याच्या जगात ते खरोखरच “परदेशवासी” आहेत. आणि पुढेही तसेच राहण्याचा त्यांनी आनंदाने निर्धार केला आहे. लवकरच देवाच्या नीतिमान नव्या जगातील कायमचे रहिवासी बनण्याची दृढ व खात्रीशीर आशा ते बाळगतात. तुम्हालाही त्या दिवसाची प्रतीक्षा नाही का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

सैतानाच्या जगाला वाचवण्याचा आपला प्रयत्न नाही

[२० पानांवरील चित्र]

आपण देवाच्या नव्या जगाचे समर्थन करतो

[२२ पानांवरील चित्र]

बायबलमधील सत्यामुळे ऐक्य अनुभवणारे एक रशियन कुटुंब