व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडा

सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडा

“सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.”—२ तीम. ४:५.

१. यहोवाला सर्वात पहिला व प्रमुख सुवार्तिक का म्हणता येईल?

 सुवार्तिक म्हणजे इतरांना सुवार्ता सांगणारा. यहोवा देव हा सर्वात पहिला व प्रमुख सुवार्तिक आहे. आपल्या पहिल्या आईवडिलांनी यहोवाविरुद्ध बंड केल्यानंतर त्याने लगेच ही सुवार्ता घोषित केली की सापाचा, म्हणजे दियाबल सैतानाचा नाश केला जाईल. (उत्प. ३:१५) पुढील अनेक शतकांदरम्यान, यहोवाने त्याच्या नावावर लावण्यात आलेला कलंक मिटवला जाण्याविषयी; सैतानाने केलेले नुकसान भरून काढले जाण्याविषयी; आणि आदाम व हव्वेने पाप करण्याद्वारे जे काही गमावले होते ते मानवांना पुन्हा प्राप्त होण्याविषयी माहिती लिहिण्यास विश्‍वासू पुरुषांना प्रेरित केले.

२. (क) सुवार्ता घोषित करण्यासंबंधी देवदूत कोणती भूमिका पार पाडतात? (ख) येशूने सुवार्तिकांकरता कोणता आदर्श मांडला?

देवदूतदेखील सुवार्तिक आहेत. ते स्वतः सुवार्ता सांगतात आणि सुवार्तेचा प्रसार करण्याच्या कार्यात इतरांना मदत करतात. (लूक १:१९; २:१०; प्रे. कृत्ये ८:२६, २७, ३५; प्रकटी. १४:६) आद्यदेवदूत असलेल्या मीखाएलविषयी काय म्हणता येईल? तो येशू म्हणून पृथ्वीवर होता तेव्हा त्याने मानवी सुवार्तिकांकरता आदर्श मांडला. येशूचे संपूर्ण जीवनच सुवार्तेचा प्रसार करण्यावर केंद्रित होते!—लूक ४:१६-२१.

३. (क) आपण कोणत्या सुवार्तेचा प्रसार करतो? (ख) सुवार्तिक या नात्याने आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेऊ इच्छितो?

येशूने त्याच्या शिष्यांना सुवार्तिक म्हणून सेवा करण्याची आज्ञा दिली. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १:८) प्रेषित पौलाने त्याचा सहकारी तीमथ्य याला असे आर्जवले: “सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीम. ४:५) येशूचे अनुयायी या नात्याने आपण कोणत्या सुवार्तेचा प्रसार करतो? आपण ज्या सुवार्तेचा प्रसार करतो त्यात या आश्‍वासनदायक सत्याचा समावेश होतो, की आपला स्वर्गीय पिता यहोवा आपल्यावर प्रेम करतो. (योहा. ३:१६; १ पेत्र ५:७) यहोवा देव प्रामुख्याने त्याच्या राज्याच्या द्वारे आपल्याबद्दल असलेले त्याचे प्रेम व्यक्‍त करतो. म्हणून, आपण आनंदाने इतरांना सांगतो, की जे लोक त्याच्या राज्याच्या अधीन होतात, त्याच्या आज्ञांचे पालन करतात आणि नीतिमान कृत्ये करतात ते त्याचे मित्र या नात्याने त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतात. (स्तो. १५:१, २) खरेतर, सर्व अन्यायाचा समूळ नाश करणे हा यहोवाचा उद्देश आहे. गतकाळातील अन्यायाच्या स्मृतींमुळे होणाऱ्‍या वेदनाही तो नाहीशा करेल. किती अद्‌भुत सुवार्ता! (यश. ६५:१७) आपण सुवार्तिक असल्यामुळे, दोन महत्त्वाच्या प्रश्‍नांविषयी चर्चा करू या: आज लोकांनी सुवार्ता ऐकणे अत्यावश्‍यक का आहे? आणि सुवार्तिक या नात्याने आपण आपली भूमिका यशस्वी रीत्या कशा प्रकारे पूर्ण करू शकतो?

लोकांनी सुवार्ता ऐकणे का गरजेचे आहे?

परिणामकारक प्रश्‍नांमुळे लोक जे विश्‍वास करतात त्यांमागील कारणे शोधण्यास त्यांना मदत मिळते

४. लोकांनी देवाबद्दल कोणत्या खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत?

तुमच्या पित्याने तुमच्यासहित तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला आहे असे कोणीतरी तुम्हाला सांगतो अशी कल्पना करा. तुमच्या पित्याला ओळखण्याचा दावा करणारे तुम्हाला सांगतात की तो कोणाशीच संबंध न ठेवू इच्छिणारा, आतल्या गाठीचा आणि क्रूर मनुष्य होता. काही जण तर तुम्हाला असे मानायला लावतील की तुमच्या पित्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे, कारण तो आता जिवंत नाही. एका अर्थाने, अनेक लोकांनी देवाबद्दल अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांना असे शिकवण्यात आले आहे की देव रहस्यमयी आहे, त्याची ओळख करून घेणे अशक्य आहे, किंवा तो क्रूर आहे. उदाहरणार्थ, काही धर्मगुरू असा दावा करतात की देव वाईट लोकांना एका यातनामय ठिकाणी सदासर्वकाळ दंड देईल. इतर काही जण नैसर्गिक विपत्तींसाठी देवाला जबाबदार ठरवतात. नैसर्गिक विपत्तींमुळे चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे लोक मारले जात असले, तरी त्यांद्वारे देव लोकांना दंड देतो असे मानले जाते.

प्रश्‍नांमुळे सत्याचा स्वीकार करण्यासाठी लोकांचे मन व हृदय उघडले जाते

५, ६. उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताचा आणि देवाबद्दलच्या खोट्या शिकवणींचा लोकांवर कसा प्रभाव पडला आहे?

इतर जण दावा करतात की देव अस्तित्वात नाही. या संदर्भात उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताचा विचार करा. या सिद्धान्ताचे समर्थन करणारे अनेक जण असे सांगतात की कोणाही बुद्धिमान व्यक्‍तीच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन अस्तित्वात आले आहे. ते दावा करतात की कोणीच सृष्टिकर्ता नाही. काही जणांनी तर असेही म्हटले आहे की मानव म्हणजे एक पशूच आहे; म्हणून एक माणूस जर पशूतुल्य आचरण करत असेल, तर मग यात आश्‍चर्य ते काय? ते असा तर्क करतात की दुर्बळांवर अधिकार चालवणारे ताकदवान लोक खरेतर निसर्गाच्या नियमाला अनुसरून असे करत असतात. म्हणून जगात नेहमीच अन्याय होत राहील असे पुष्कळ लोक मानतात यात काहीच आश्‍चर्य नाही. त्यामुळे, उत्क्रांतिवादावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना कोणतीच आशा नसते.

उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तामुळे आणि देवाबद्दलच्या खोट्या शिकवणींमुळे या शेवटल्या दिवसांत मानवजातीच्या दुःखांत भर पडली आहे यात काहीच शंका नाही. (रोम. १:२८-३१; २ तीम. ३:१-५) या मानवी शिकवणींमुळे लोकांना कोणतीही खरी आणि कायमस्वरूपी सुवार्ता ऐकायला मिळालेली नाही. त्याऐवजी, प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, अशा शिकवणींमुळे “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे” आणि “ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.” (इफिस. ४:१७-१९) शिवाय, उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तामुळे आणि खोट्या शिकवणींमुळे, देवाने दिलेली सुवार्ता स्वीकारणे अनेकांना कठीण वाटते.—इफिसकर २:११-१३ वाचा.

प्रश्‍नांमुळे लोकांना तर्क करण्यास व योग्य निष्कर्षांवर पोहचण्यास साहाय्य मिळते

७, ८. लोक कोणत्या एकमेव मार्गाने सुवार्ता पूर्णपणे समजू शकतात?

देवासोबत चांगला संबंध जोडण्यासाठी, लोकांना सर्वात आधी या गोष्टीची खातरी पटली पाहिजे, की यहोवा अस्तित्वात आहे आणि त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याची अनेक चांगली कारणे आहेत. आपण त्यांना सृष्टीचे निरीक्षण करण्याचे प्रोत्साहन देण्याद्वारे हे ज्ञान घेण्यास मदत करू शकतो. लोक जेव्हा प्रामाणिक मनाने सृष्टीचे परीक्षण करतात तेव्हा ते देवाच्या बुद्धीविषयी आणि सामर्थ्याविषयी शिकतात. (रोम. १:१९, २०) आपल्या महान सृष्टिकर्त्याने बनवलेल्या सर्व गोष्टी किती विस्मयकारक आहेत याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आपण पुढील माहितीपत्रकाचा उपयोग करू शकतो: जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी. पण, केवळ सृष्टीच्या निरीक्षणातून शिकणाऱ्‍यांना जीवनातील अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळणार नाहीत. उदाहरणार्थ, देव दुःख का काढून टाकत नाही? पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश काय आहे? देव माझ्याबद्दल काळजी करतो का?

ज्या एकमेव मार्गाने लोक देवाबद्दलची आणि त्याच्या उद्देशाबद्दलची सुवार्ता पूर्णपणे समजू शकतात, तो म्हणजे बायबलचा अभ्यास करण्याद्वारे. लोकांना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला मदत करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! पण, आपल्या श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना केवळ तथ्यांची माहिती देणे पुरेसे नाही; आपण त्यांना खातरी पटवून दिली पाहिजे. (२ तीम. ३:१४) येशूचे अनुकरण केल्यास, खातरी पटवून देण्याच्या बाबतीत आपण जास्त परिणामकारक बनू शकतो. तो इतका यशस्वी का ठरला? याचे एक कारण म्हणजे त्याने प्रश्‍नांचा प्रभावीपणे उपयोग केला. तर मग, आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

यशस्वी सुवार्तिक प्रश्‍नांचा प्रभावीपणे उपयोग करतात

९. लोकांना आध्यात्मिक मदत द्यायची असल्यास आपण काय केले पाहिजे?

येशूप्रमाणेच आपणही सुवार्ता प्रसार करण्याच्या कार्यात प्रश्‍नांचा उपयोग का केला पाहिजे? त्यासाठी या परिस्थितीचा विचार करा: तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो की एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तो तुमचा आजार बरा करू शकतो. तुम्ही त्याच्यावर कदाचित विश्‍वास ठेवाल. पण, तुमच्या आरोग्याशी संबंधित एकही प्रश्‍न तुम्हाला विचारण्यापूर्वीच त्याने तसे आश्‍वासन दिल्यास काय? तसे असल्यास, तुम्ही त्याच्यावर साहजिकच भरवसा ठेवणार नाही. डॉक्टर कितीही प्रतिभावान असो, त्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करण्याआधी प्रश्‍न विचारून तुमच्या आजाराच्या लक्षणांविषयी ऐकून घेणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे, राज्याची सुवार्ता स्वीकारण्यास लोकांना मदत करायची असल्यास, त्यांच्या हृदयाचा ठाव घेणारे प्रश्‍न विचारण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. त्यांच्या आध्यात्मिक स्थितीची स्पष्ट माहिती मिळाल्यानंतरच आपण त्यांना मदत करू शकतो.

आपल्या श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचण्यासाठी आपण त्यांना खातरी पटवून दिली पाहिजे

१०, ११. येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अनुकरण करण्याद्वारे आपण काय साध्य करू शकतो?

१० येशूला माहीत होते, की जाणीवपूर्वक विचारलेल्या प्रश्‍नांमुळे केवळ विद्यार्थ्याविषयी माहितीच मिळत नाही, तर विद्यार्थ्याला चर्चेत सहभागी करून घेण्यास साहाय्य मिळते. उदाहरणार्थ, येशूला त्याच्या शिष्यांना नम्रतेविषयी शिकवायचे होते तेव्हा त्याने त्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्‍न विचारला. (मार्क ९:३३) तत्त्वांमागील कारण समजून घेण्यास कशा प्रकारे तर्क केला पाहिजे याविषयी पेत्राला शिकवण्यासाठी येशूने त्याला एक प्रश्‍न विचारला आणि त्याची दोन पर्यायी उत्तरे देऊन त्यांपैकी योग्य उत्तर निवडण्यास सांगितले. (मत्त. १७:२४-२६) दुसऱ्‍या एका प्रसंगी, येशूला त्याच्या शिष्यांच्या हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे होते तेव्हा त्याने त्यांना अभिप्राय व्यक्‍त करायला लावणारे अनेक प्रश्‍न विचारले. (मत्तय १६:१३-१७ वाचा.) प्रश्‍न विचारण्याद्वारे आणि विधाने करण्याद्वारे येशूने केवळ माहितीच पुरवली नाही; तर त्याच्या शिकवणी लोकांच्या हृदयापर्यंत पोहचतील याची त्याने खातरी केली आणि त्यांना सुवार्तेच्या अनुरूप कार्य करण्यास प्रवृत्त केले.

११ येशूचे अनुकरण करून आपण प्रश्‍नांचा परिणामकारक रीत्या उपयोग करतो तेव्हा आपण कमीत कमी तीन गोष्टी करत असतो. लोकांना सर्वोत्तम रीत्या कशा प्रकारे मदत करता येईल हे आपण जाणून घेतो, घरमालक संभाषणाला खीळ घालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या परिस्थितीवर आपण मात करतो, आणि सुवार्तेमुळे नम्र मनाच्या लोकांना कशा प्रकारे फायदा होईल हे आपण त्यांना शिकवतो. प्रश्‍नांचा परिणामकारक रीत्या कशा प्रकारे उपयोग करता येईल हे दाखवणाऱ्‍या तीन परिस्थितींचा आता आपण विचार करू या.

१२-१४. आत्मविश्‍वासाने सुवार्ता सांगण्यास तुम्ही तुमच्या मुलाला कशा प्रकारे मदत करू शकता? एक उदाहरण द्या.

१२ परिस्थिती १: समजा तुमच्या किशोरवयीन मुलाने त्याच्या वर्गसोबत्याशी बोलताना देवानेच सर्व काही निर्माण केले आहे या आपल्या विश्‍वासाबद्दल मला नीट सांगता आले नाही अशी खंत व्यक्‍त केली, तर पालक या नात्याने तुम्ही काय कराल? सुवार्ता सांगण्याकरता हवा असलेला आत्मविश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी तुम्ही आपल्या मुलाला मदत करू इच्छिता यात काहीच शंका नाही. तेव्हा, मुलाची टीका करण्याऐवजी किंवा लगेच सल्ला देण्याऐवजी तुम्ही येशूचे अनुकरण करून अभिप्राय व्यक्‍त करण्यास प्रोत्साहन देणारे प्रश्‍न विचारू शकता. हे तुम्हाला कसे करता येईल?

१३ तुमच्या मुलासोबत जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी या माहितीपत्रकातील काही भाग वाचल्यानंतर तुम्ही त्याला विचारू शकता की तेथे दिलेले कोणते युक्‍तिवाद त्याला जास्त लक्षवेधक वाटले. एक सृष्टिकर्ता आहे असे मानण्यास आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो स्वतः कोणत्या कारणांमुळे प्रवृत्त झाला आहे हे ओळखण्याचे त्याला प्रोत्साहन द्या. (रोम. १२:२) त्याची कारणे तुमच्या कारणांशी तंतोतंत जुळण्याची गरज नाही हे त्याला सांगा.

१४ तुमच्या मुलाला सांगा की त्याच्या वर्गसोबत्याशी बोलताना तो तुम्ही दाखवलेल्या पद्धतीचा वापर करू शकतो. म्हणजे, तो माहितीपत्रकातील काही गोष्टींची चर्चा करू शकतो आणि नंतर योग्य निष्कर्षावर पोहचण्यास साहाय्य करणारे किंवा अभिप्राय व्यक्‍त करण्यास प्रोत्साहन देणारे प्रश्‍न विचारू शकतो. उदाहरणार्थ, तो त्याच्या वर्गसोबत्याला जीवन की शुरूआत या माहितीपत्रकात पृष्ठ २१ वरील चौकटीत दिलेली माहिती वाचण्यास सांगू शकतो. त्यानंतर तो असे विचारू शकतो, “माहिती साठवण्याची जी क्षमता डीएनएमध्ये दिसून येते, तिची बरोबरी आजच्या कंप्युटरच्या जमान्यातील कोणतेही मानवनिर्मित साधन करू शकलेले नाही हे खरे आहे का?” वर्गसोबत्याचे उत्तर बहुधा हो असेच असेल. नंतर तुमचा मुलगा विचारू शकतो, “जर कंप्युटर तज्ज्ञसुद्धा अशा करामती करू शकत नाहीत, तर मग विचार करण्याची क्षमता नसलेले पदार्थ हे स्वतःहून कसे करू शकतात?” तुमच्या मुलाला इतरांसोबत आपल्या विश्‍वासांबद्दल बोलणे सोपे जावे म्हणून तुम्ही नियमितपणे अशी अभ्यास सत्रे घेऊ शकता. तुम्ही जर त्याला प्रश्‍नांचा परिणामकारक रीत्या उपयोग करण्याचे प्रशिक्षण द्याल, तर सुवार्तिक या नात्याने त्याची भूमिका पूर्ण करण्यास त्याला साहाय्य मिळेल.

१५. एका नास्तिक व्यक्‍तीला मदत करण्यासाठी आपण प्रश्‍नांचा कशा प्रकारे वापर करू शकतो?

१५ परिस्थिती २: आपल्या साक्षकार्यात आपल्याला असे लोक भेटतात जे देवाच्या अस्तित्वावर शंका घेतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती नास्तिक असल्याचे कदाचित आपल्याला सांगेल. तिने असे म्हटल्यामुळे संभाषण तेथेच संपवण्याऐवजी, तुम्ही किती काळापासून नास्तिक आहात आणि असा दृष्टिकोन बाळगण्याचे कारण काय हे आपण त्या व्यक्‍तीला आदरपूर्वक विचारू शकतो. तिची उत्तरे ऐकून घेतल्यावर आणि याविषयी गांभीर्याने विचार केल्याबद्दल तिची प्रशंसा केल्यावर आपण तिला असे विचारू शकतो, की सजीव सृष्टी निर्माण करण्यात आली आहे याविषयी पुरावे सादर करणारे साहित्य वाचणे तुम्हाला चुकीचे वाटते का? घरमालक खुल्या मनाने विचार करणारा माणूस असल्यास कदाचित तो म्हणेल की असे पुरावे वाचून पाहण्यात काहीच गैर नाही. मग आपण त्याला जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी हे माहितीपत्रक दाखवू शकतो. इतरांच्या भावनांचे भान ठेवून, प्रेमळपणे विचारलेले प्रश्‍न एखाद्या व्यक्‍तीच्या हृदयाची दारे उघडून तिला सुवार्ता स्वीकारण्यास प्रवृत्त करू शकतात.

१६. बायबल विद्यार्थी पुस्तकात छापलेल्या माहितीतून उत्तर वाचून दाखवत असल्यास आपण एवढ्यावरच समाधान का मानू नये?

१६ परिस्थिती ३: एखाद्या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करताना कदाचित आपण तिला पुस्तकात छापलेल्या माहितीतून उत्तरे द्यायला लावत असू. पण आपण असे केल्यास, ते विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक प्रगतीला मारक ठरू शकते. का? कारण एखादी व्यक्‍ती विचार न करता नुसतेच वाचून उत्तरे देत असल्यास ती आध्यात्मिक अर्थाने अशा झाडासारखी बनू शकणार नाही, ज्याची मुळे खोलवर पसरतात. विरोधाची झळ लागताच, अशी व्यक्‍ती लगेच कोमेजून जाणाऱ्‍या झाडासारखी ठरेल. (मत्त. १३:२०, २१) असे घडू नये म्हणून, विद्यार्थी जे काही शिकत आहे त्याविषयी त्याला कसे वाटते हे त्याला विचारण्याची गरज आहे. पुस्तकात दिलेल्या मुद्द्‌यांशी तो सहमत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. याहून महत्त्वाचे म्हणजे, तो का सहमत आहे किंवा का सहमत नाही हे व्यक्‍त करण्याचे त्याला प्रोत्साहन द्या. मग शास्त्रवचनांच्या साहाय्याने तर्क करण्यास त्याला साहाय्य करा. असे केल्यास, तो स्वतःहूनच योग्य निष्कर्षांवर पोहचू शकेल. (इब्री ५:१४) आपण प्रश्‍नांचा परिणामकारक रीत्या वापर केल्यास, ज्यांना आपण शिकवतो ते भक्कम विश्‍वास उत्पन्‍न करू शकतील आणि त्यांचा विरोध करण्याचा किंवा त्यांना बहकवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांचा ते यशस्वी रीत्या सामना करू शकतील. (कलस्सै. २:६-८) सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो?

यशस्वी सुवार्तिक एकमेकांना मदत करतात

१७, १८. सेवाकार्यात दुसऱ्‍या एखाद्या बंधुभगिनीसोबत गेल्यास आपण एकमेकांना सहकार्य कसे करू शकतो?

१७ शिष्यांना प्रचार कार्याला पाठवताना येशूने दोघादोघांना पाठवले. (मार्क ६:७; लूक १०:१) नंतर प्रेषित पौलाने काही बांधवांबद्दल उल्लेख करताना म्हटले की त्यांनी “माझ्याबरोबर . . . सुवार्तेच्या कामी श्रम केले” आणि अशा बांधवांना त्याने आपले “सहकारी” म्हटले. (फिलिप्पै. ४:३) शास्त्रवचनांतील या नमुन्याच्या आधारावर १९५३ साली राज्य प्रचारकांनी इतरांना सेवाकार्यात प्रशिक्षण देण्याचा एक कार्यक्रम सुरू केला.

१८ तुम्ही सेवाकार्यात दुसऱ्‍या एखाद्या बंधुभगिनीसोबत जाता तेव्हा तुम्ही एकमेकांना सहकार्य कसे करू शकता? (१ करिंथकर ३:६-९ वाचा.) तुमचा सोबती बायबलमधून वचने वाचून दाखवतो तेव्हा स्वतःच्या बायबलमध्ये वचने उघडून पाहा. तुमचा सोबती किंवा घरमालक बोलत असतो तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्यांचे बोलणे ऐका. चर्चेकडे नीट लक्ष द्या; असे केल्याने, घरमालक एखादा आक्षेप घेतो तेव्हा गरज पडल्यास तुम्हाला आपल्या सोबत्याला मदत करता येईल. (उप. ४:१२) पण, सावधगिरीचा एक इशारा: तुमचा सोबती घरमालकाशी युक्‍तिवाद करण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्याला मध्येच थांबवून स्वतः बोलण्याचा मोह आवरा. तुमच्या अतिआवेशामुळे तुमच्या सोबत्याचा उत्साह मंदावेल आणि घरमालक गोंधळून जाईल. केव्हाकेव्हा, चर्चेत सहभागी होणे उचित असू शकते. पण, तुम्ही बोलण्याचे ठरवता तेव्हा तुमचे बोलणे एक किंवा दोन संक्षिप्त टिप्पण्यांपुरतेच मर्यादित असले पाहिजे. त्यानंतर तुमच्या सोबत्याला चर्चेत पुढाकार घेऊ द्या.

१९. आपण काय लक्षात ठेवले पाहिजे, आणि का?

१९ एका घरातून दुसऱ्‍या घरी जाताना तुम्ही एकमेकांना कसे सहकार्य करू शकता? तुम्ही आपले सादरीकरण आणखी कसे सुधारू शकता याविषयी चर्चा करण्यासाठी या वेळेचा उपयोग का करू नये? तुमच्या क्षेत्रातील लोकांविषयी तुम्ही जे बोलता त्यामुळे तुमच्या सोबत्याचा धीर खचणार नाही याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे, इतर सुवार्तिक बंधुभगिनींच्या अवगुणांबद्दल सतत तक्रारीच्या सुरात बोलत राहण्याचा पाश टाळा. (याको. ४:११) आपण मातीच्या भांड्याप्रमाणे आहोत हे लक्षात असू द्या. यहोवाने आपल्यावर सुवार्तेचा प्रसार करण्याची अनमोल संपत्ती सोपवण्याद्वारे आपल्यावर अपार दया केली आहे. (२ करिंथकर ४:१,  वाचा.) तेव्हा, सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडण्यासाठी आपण होता होईल तितके करण्याद्वारे यहोवाने आपल्यावर सोपवलेल्या संपत्तीबद्दल कदर व्यक्‍त करू या.