टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१३
जीवन कथा
यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यानं अनेक आशीर्वाद लाभले
एलीझा पीचोली यांची जीवन कथा वाचा. तिला बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला, जीवनात अनेक त्याग करावे लागले आणि बरंच काही गमवावं लागलं, तरी तिनं सकारात्मक दृष्टिकोन बाळगला.
यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा
एखाद्याकडे निःसंकोचपणे जाणे आणि निःपक्षपाती असणे यांचा काय अर्थ होतो? यहोवा देवाच्या उदाहरणाचे परीक्षण केल्यास हे गुण दाखवण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.
यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा
उदारता व समंजसपणा दाखवण्याच्या बाबतीत यहोवा सर्वात उत्तम उदाहरण मांडतो. त्याच्या या उदाहरणाचे अनुकरण केल्याने आपणही आपल्या जीवनात ते गुण दाखवू शकतो.
यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा
एकनिष्ठा आणि क्षमाशीलता या प्रेमळ गुणांवरून खऱ्या मित्राला ओळखता येते. आपण यहोवाचे अनुकरण केल्यास हे महत्त्वाचे गुण विकसित करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.
वाचकांचे प्रश्न
बायबलमध्ये उल्लेख केलेले “देवपुत्र” आणि ‘तुरुंगातील आत्मे’ कोण होते?
यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्या
आपला महान “कुंभार” यहोवा याने लोकांना आणि राष्ट्रांना आकार दिला. यावरून आपण काय शिकू शकतो, आणि त्याच्या शिस्तीचा आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
वडिलांनो—तुम्ही “थकलेल्या जिवाला” उभारी द्याल का?
मंडळीचे वडील मेंढपाळ भेटीसाठी तयारी कशी करतात? “आध्यात्मिक कृपादान” देण्याद्वारे वडील थकलेल्या किंवा निराश झालेल्या एखाद्या बंधू किंवा भगिनीला प्रोत्साहन देऊ शकतात.
तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा.