टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०१३

आध्यात्मिक रीत्या आपली फसवणूक होण्याचे आपण कसे टाळू शकतो याच्या काही मार्गांची चर्चा या अंकात करण्यात आली आहे. तसेच, प्रभूच्या सांजभोजनाचा विधी केव्हा साजरा केला जावा आणि त्याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो हेदेखील या अंकात सांगितले आहे.

डोंगरांच्या सावलीत यहोवाने त्यांना सुरक्षित ठेवले

जर्मनीत जेव्हा नात्सी सरकारचे शासन होते तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना बायबलची प्रकाशने कशी पुरवण्यात आली? साक्षीदारांना कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागला?

सहजासहजी आपली विचारशक्‍ती व स्थैर्य गमावू नका

पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रांत कोणत्या आवश्‍यक सूचना सापडतात? आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?

आपण आपला वेळ, पैसा, शक्‍ती व कौशल्ये देवाच्या राज्याला हातभार लावण्याकरता कशी उपयोगात आणू शकतो हे जाणून घ्या.

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकाचे अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आठवणीत राहिल्या ते पाहा.

“हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा

ख्रिश्‍चनांनी वल्हांडणाविषयी काय जाणून घेणे गरजेचे आहे? प्रभूच्या सांजभोजनाचा आपल्या सर्वांकरता काय अर्थ होतो?

“माझ्या स्मरणार्थ हे करा”

प्रभूच्या सांजभोजनाचा विधी केव्हा साजरा केला जावा हे आपल्याला कसे कळते? भाकरी व द्राक्षारस कशास सूचित करतात?

आपल्या जोडीदाराला गमावण्याच्या दुःखाला सामोरे जाताना

आपल्या जोडीदाराला गमावण्याचे दुःख हे अतिशय तीव्र असते आणि दीर्घकाळ राहते. बायबलमध्ये देण्यात आलेल्या पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला कशा प्रकारे सांत्वन मिळते हे जाणून घ्या.

विषय सूची टेहळणी बुरूज २०१३

टेहळणी बुरूज २०१३ यात प्रकाशित झालेल्या सर्व लेखांची विषय सूची पाहा. लेखांची विषयवार सूची देण्यात आली आहे.