व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

वल्हांडणाचा कोकरा निसान १४ ला दिवसाच्या कोणत्या वेळी कापायचा होता?

काही बायबल भाषांतरांत असे म्हणण्यात आले आहे की कोकऱ्याला “संधिप्रकाशाच्या वेळी,” “सांजवेळी,” “कातरवेळी” कापले जावे. याचा अर्थ कोकऱ्याला सूर्यास्त झाल्यानंतर पण अजूनही उजेड असताना कापायचे होते. (निर्ग. १२:६)—१२/१५, पृष्ठे १८-१९.

निवड करण्यासाठी तरुणांनी कोणत्या बायबल तत्त्वांचा उपयोग केला पाहिजे?

(१) पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा. (मत्त. ६:१९-३४) (२) इतरांची सेवा करण्यात आनंद मिळवा. (प्रे. कृत्ये २०:३५) (३) तारुण्यात यहोवाच्या सेवेत आनंद मिळवा. (उप. १२:१)—१/१५, पृष्ठे १९-२०.

प्रकटीकरणातील चार घोड्यांच्या रंगांवरून काय सूचित होते?

पहिला घोडा पांढरा शुभ्र आहे. तो ख्रिस्त येशूच्या नीतिमान युद्धाला सूचित करतो. लालभडक रंगाचा घोडा राष्ट्राराष्ट्रांत होणाऱ्या युद्धाला सूचित करतो. या घोड्याच्या पाठोपाठ संकटाला सूचित करणारा काळा घोडा येतो. तो दुष्काळाला चित्रित करतो. यानंतर दिसणारा “एक फिकट रंगाचा घोडा” मृत्यूला चित्रित करतो. (प्रक. ६:१-८)—१/१, पृष्ठ १५.

“कोकऱ्याचे लग्न” केव्हा होणार आहे? (प्रकटी. १९:७)

येशू ख्रिस्ताने अंतिम विजय मिळवल्यानंतर म्हणजे मोठ्या बाबेलचा नाश आणि हर्मगिदोनाची लढाई झाल्यानंतर “कोकऱ्याचे लग्न” होईल.—२/१५, पृष्ठ १०.

पहिल्या शतकातील यहुदी कोणत्या आधारावर मशीहाची “वाट पाहत” होते? (लूक ३:१५)

दानीएलाच्या पुस्तकात मशीहाबद्दल असलेली भविष्यवाणी जशी आपल्याला स्पष्टपणे समजली आहे, तशी ती पहिल्या शतकातील यहुद्यांना समजली असेल किंवा नाही हे आपण निश्‍चित सांगू शकत नाही. (दानी. ९:२४-२७) पण, देवदूतांनी मेंढपाळांना केलेल्या घोषणेविषयी किंवा संदेष्ट्री हन्ना हिने मंदिरात बाळ येशूला पाहिल्यानंतर जे म्हटले त्याविषयी त्यांनी कदाचित ऐकले असावे. तसेच, पूर्वेकडून मागी लोक जेरूसलेमेत येऊन विचारपूस करू लागले की, “यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे.” (मत्त. २:१, २) नंतर, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने असे सूचित केले की ख्रिस्त लवकरच प्रकट होईल.—२/१५, पृष्ठे २६-२७.

आपले बोलणे ‘होय आणि तरी नाही’ असे असू नये म्हणून आपण काय केले पाहिजे? (२ करिंथ. १:१८)

प्रत्येक वेळी आपली परिस्थिती सारखी नसते त्यामुळे दिलेला शब्द पाळणे कधीकधी आपल्याला शक्य होत नाही. पण, जेव्हा आपण कोणाला शब्द देतो तेव्हा तो पाळण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.—३/१५, पृष्ठे ३०-३२.

जेव्हा एखादी ख्रिस्ती व्यक्ती आपले कुटुंब सोडून पैसा कमवण्यासाठी दुसऱ्या देशात जाते तेव्हा कोणत्या समस्या येऊ शकतात?

जेव्हा पालक आपल्या कुटुंबाला सोडून परदेशी राहायला जातात तेव्हा मुलांचे भावनिक व नैतिक रीत्या नुकसान होऊ शकते. त्यांच्या मनात आईवडिलांविषयी राग निर्माण होऊ शकतो. जे ख्रिस्ती आपल्या जोडीदाराला सोडून परदेशी जातात त्यांच्यावर अनैतिक कृत्ये करण्याचा दबाव येऊ शकतो.—४/१५, पृष्ठे १९-२०.

सेवाकार्यात लोकांना भेट देताना आपण स्वतःला कोणते चार प्रश्न विचारले पाहिजे?

ते कोण आहेत? मी त्यांना कोठे भेटणार आहे? कोणत्या वेळी त्यांची भेट घेणे सर्वात उत्तम ठरेल? आणि, त्यांना भेट देताना मी कसे बोलले पाहिजे?—५/१५, पृष्ठे १२-१५.