टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१४

या अंकातील अभ्यास लेखांवर २९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

तुम्हाला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळत आहे का?

आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी विश्वासू दासाद्वारे उपलब्ध करून दिली जाणारी सर्वच माहिती आपल्याजवळ असणे गरजेचे आहे का?

यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका

देवाविरुद्ध केलेल्या विद्रोहाचा स्त्रीपुरुषांवर कसा परिणाम झाला आहे याबद्दल जाणून घ्या. पुरातन काळात काही स्त्रियांनी कशा प्रकारे यहोवाची सेवा केली याची काही उदाहरणे विचारात घ्या. तसेच, आज देवाच्या कार्यात स्त्रिया कशा प्रकारे आपले योगदान देत आहेत हेही जाणून घ्या.

देवाचे वचन सजीव आहे—त्याचा उपयोग करा!

सर्वच यहोवाच्या साक्षीदारांना परिणामकारक रीत्या सेवाकार्य करण्याची इच्छा आहे. लोकांशी संवाद साधताना देवाच्या वचनाचा आणि नवीन पत्रिकांचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याबद्दल काही व्यावहारिक सल्ल्यांवर विचार करा.

यहोवा आपल्याला त्याच्या जवळ येण्यास कशी मदत करतो?

आपण यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडला पाहिजे. यहोवा खंडणीच्या तरतुदीद्वारे आणि बायबलद्वारे कशा प्रकारे आपल्याला त्याच्या जवळ येण्यास मदत करतो हे जाणून घ्या.

यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा

यहोवाच्या आवाजाकडे लक्ष देणे आणि सतत त्याला प्रार्थना करणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घ्या. सैतानामुळे किंवा आपल्या पापी प्रवृत्तींमुळे यहोवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ देण्याचे आपण कसे टाळू शकतो हे या लेखात सांगितले आहे.

बांधवांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही पुन्हा पुढे याल का?

पूर्वी वडील म्हणून सेवा करत असलेल्या एखाद्या बांधवाने ती जबाबदारी गमावली असेल, तर पुन्हा ती सांभाळण्यास ते पुढे येऊ शकतात का?

वाचकांचे प्रश्न

पुनरुत्थान झालेले “लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत” असे येशूने म्हटले तेव्हा तो पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल बोलत होता का?

आपल्या संग्रहातून

“युरेका ड्रामा”ने अनेकांना सत्याची ओळख करून दिली

“फोटो ड्रामा ऑफ क्रिएशनची संक्षिप्त आवृत्ती असलेला “युरेका ड्रामा,” विजेची सोय नसलेल्या दूरवरच्या भागांतही दाखवणे शक्य होते.