टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१४

या अंकातील अभ्यास लेखांवर २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

जबाबदारी हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात का?

असे करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

आपल्याजवळ सत्य आहे याची तुम्हाला खात्री आहे का? जर आहे, तर का?

यहोवाच्या साक्षीदारांजवळ सत्य आहे असे अनेकांना का वाटते याबद्दल या लेखात चर्चा करण्यात येईल. तसेच, कोणत्या कारणांमुळे स्वतः यहोवाच्या साक्षीदारांना ही खात्री आहे की त्यांना सत्य मिळाले आहे हेही या लेखात सांगण्यात आले आहे.

पुष्कळ संकटे असूनही विश्वासात टिकून राहा

सैतानाच्या जगात राहत असताना प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. सैतान कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर हल्ले करतो? त्यांचा सामना करण्यासाठी आपण कशी तयारी करू शकतो?

पालकांनो—मेंढपाळांप्रमाणे आपल्या मुलांना मदत करा

आपल्या मुलांना यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याची जबाबदारी पालकांवर सोपवण्यात आली आहे. (इफिसकरांस ६:४) या लेखांत तीन मार्ग सांगण्यात आले आहेत ज्यांद्वारे पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात आणि यहोवावर प्रेम करण्यात प्रवृत्त करू शकतात.

वाचकांचे प्रश्न

स्तोत्र ३७:२५ यातील दाविदाच्या आणि मत्तय ६:३३ मधील येशूच्या शब्दांवरून असे सूचित होते का, की यहोवा त्याच्या उपासकांना कधीच उपाशी राहू देणार नाही?

शेवटला शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल

पाप आणि मृत्यू यांमुळे मानवांना खूप दुःखद परिणामांना तोंड द्यावे लागते. मानव का मरतात? आणि या शेवटल्या शत्रूला नाहीसे कसे केले जाईल? (१ करिंथकर १५:२६) या प्रश्नांच्या उत्तरांद्वारे यहोवाचे न्याय, त्याची बुद्धी आणि खासकरून त्याचे प्रेम कसे दिसून येते ते पाहा.

पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा

यहोवाचे बरेच सेवक पूर्णवेळेची सेवा करत आहेत. पूर्णवेळेचे सेवक ‘विश्वासाने व प्रीतीने जे श्रम’ घेत आहेत त्याची आपण कशी आठवण ठेवू शकतो?—१ थेस्सलनीकाकर १:३.