व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

ख्रिश्चनांनी मृतदेह दहन करणे योग्य आहे का?

मृतदेह दहन करावा की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. याबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले नसले, तरी राजा शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांचे मृतदेह दफन करण्याआधी जाळण्यात आले होते ही गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. (१ शमु. ३१:२, ८-१३)—६/१५, पृष्ठ ७.

देव वाईट गोष्टी घडवून आणत नाही असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

देवाचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्वसनीय आणि खरा आहे. त्याचबरोबर, यहोवा कनवाळू आणि दयाळूदेखील आहे. (अनु. ३२:४; स्तो. १४५:१७; याको. ५:११)—७/१, पृष्ठ ४.

परदेशातील जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो?

पुढील तीन आव्हानांचा: (१) वेगळे राहणीमान, (२) घरच्यांची आठवण आणि (३) स्थानिक बांधवांसोबत मैत्री करणे. ज्यांनी या आव्हानांचा यशस्वी रीत्या सामना केला आहे त्यांना अनेक आशीर्वाद लाभले आहेत.—७/१५, पृष्ठे ४-५.

नवीन पत्रिका वापरायला सोप्या आणि प्रभावशाली का आहेत?

सर्व पत्रिकांची रचना एकसारखीच आहे. प्रत्येक पत्रिका घरमालकाला एक प्रश्न विचारण्यास आणि एक शास्त्रवचन वाचून दाखवण्यास आपल्याला मदत करते. त्याचे उत्तर काहीही असले तरीही, बायबल या प्रश्‍नाचे काय उत्तर देते हे तुम्ही आतील पानावर त्याला दाखवू शकता. तसेच, पुढच्या भेटीत तुम्ही कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहात तेदेखील दाखवू शकता.—८/१५, पृष्ठे १३-१४.

ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना मेंढपाळांप्रमाणे मदत कशी करू शकतात?

मुलांना जाणून घेण्यासाठी त्यांचे ऐकून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या आध्यात्मिक गरजा पुरवण्यासाठी मेहनत घ्या. मुलांना प्रेमळपणे मार्गदर्शन करा. उदाहरणार्थ, त्यांच्या मनात आपल्या विश्वासांबद्दल काही शंका निर्माण झाल्यास त्यांना प्रेमळपणे मदत करा.—९/१५, पृष्ठे १८-२१.

ख्रिस्तासोबत इतर जणही राज्य करतील याची खात्री कोणत्या कराराद्वारे देण्यात आली?

प्रभूच्या सांजभोजनाचा विधी स्थापन केल्यानंतर येशूने त्याच्या विश्वासू शिष्यांसोबत एक करार केला. या कराराला सहसा राज्याचा करार म्हटले जाते. (लूक २२:२८-३०) या करारामुळे येशूने शिष्यांना असे आश्वासन दिले, की ते त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करतील.—१०/१५, पृष्ठे १६-१७.

प्रेषितांची कृत्ये १५:१४ यात याकोबाने ‘देवाच्या नावाकरता काढून घेतलेले लोक’ असे कोणाविषयी म्हटले?

या निवडलेल्या लोकांमध्ये यहूदी आणि विदेशी ख्रिश्चनांचा समावेश होता. त्यांना देवाने ‘त्याचे अद्भुत गुण प्रसिद्ध’ करण्यासाठी निवडले होते. (१ पेत्र २:९, १०)—११/१५, पृष्ठे २४-२५.