तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?
“त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.”—लूक २४:४५.
१, २. येशूने आपल्या शिष्यांना कशा प्रकारे सांत्वन व धीर दिला?
येशूचे दोन शिष्य जेरूसलेमपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावी जायला निघाले होते. येशूचा मृत्यू झाल्यामुळे ते फार दुःखी होते. त्याचे पुनरुत्थान झाले आहे हे अजूनही त्यांना माहीत नव्हते. तेव्हा, अचानक येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि त्यांच्यासोबत चालू लागला. त्याने या शिष्यांचे सांत्वन केले. हे त्याने कसे केले? “त्याने मोशे व सर्व संदेषटे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.” (लूक २४:१३-१५, २७) येशूने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर त्यांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झाला कारण येशूने त्यांना शास्त्रवचनांचा “उलगडा” करून सांगितला, म्हणजेच त्यांचा अर्थ स्पष्ट करून त्यांना सांगितला.—लूक २४:३२.
२ त्याच दिवशी संध्याकाळी हे दोन शिष्य जेरूसलेमला परतले. तेथे त्यांची प्रेषितांशी भेट झाली तेव्हा त्यांनी घडलेली सगळी हकिगत त्यांना सांगितली. ते बोलत असतानाच येशू त्या सर्वांसमोर प्रकट झाला. पण त्याला पाहून प्रेषित घाबरले. त्यांच्या मनात अनेक शंका आल्या. मग, येशूने त्यांना कशा प्रकारे धीर दिला? “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.”—लूक २४:४५.
३. आपण कशामुळे निराश होऊ शकतो, पण आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
३ त्या शिष्यांप्रमाणेच कधीकधी आपणही निराश होतो. प्रचार कार्यात उत्साहाने सहभाग घेऊनही चांगले परिणाम दिसून येत नसल्यामुळे कदाचित आपण हताश झालो १ करिंथ. १५:५८) किंवा, आपण ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नसल्यामुळे कदाचित आपल्याला वाईट वाटत असेल. काहींनी तर यहोवाकडे पाठ फिरवली असेल. पण, अशा परिस्थितींतही सेवाकार्यातला आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? बायबलमध्ये दिलेल्या येशूच्या दाखल्यांचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे आपल्याला हा आनंद टिकवून ठेवणे शक्य होईल. तेव्हा, आपण येशूच्या तीन दाखल्यांचे परीक्षण करून त्यांतून आपल्याला काय शिकायला मिळते ते पाहू या.
असू. (बी पेरून झोपी जाणारा माणूस
४. बी पेरून झोपी जाणाऱ्या माणसाच्या दाखल्याचा काय अर्थ होतो?
४ मार्क ४:२६-२९ वाचा. बी पेरून झोपी जाणाऱ्या माणसाच्या दाखल्याचा काय अर्थ होतो? या दाखल्यातील माणूस राज्याच्या प्रचारकांना सूचित करतो. बी म्हणजेच चांगल्या मनाच्या लोकांना सांगितला जाणारा राज्याचा संदेश. चारचौघांप्रमाणेच बी पेरणाराही “रात्री झोपी जातो, दिवसा उठतो.” पण, पेरलेले बी लगेचच वाढत नाही. तर, ते पेरले जाते तेव्हापासून कापणीपर्यंत काही काळ जातो. या काळादरम्यान “ते बी रुजते व वाढते.” ही वाढ “आपोआप,” हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होते. त्याच प्रकारे आध्यात्मिक वाढसुद्धा हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होते. कारण, एखाद्या व्यक्तीच्या मनात यहोवाबद्दलचे प्रेम हे हळूहळू वाढत जाते. आणि शेवटी “पीक” फळाला येते त्याप्रमाणे, एक अशी वेळ येते जेव्हा ती व्यक्ती यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेते आणि आपले जीवन त्याला समर्पित करून बाप्तिस्मा घेते.
५. बी पेरून झोपी जाणाऱ्या माणसाचा दाखला येशूने का सांगितला?
५ येशूने हा दाखला का सांगितला? योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या मनात यहोवा स्वतः सत्याचे बी वाढवतो हे स्पष्ट करण्यासाठी येशूने हा दाखला सांगितला. (प्रे. कृत्ये १३:४८; १ करिंथ. ३:७) बी पेरण्याचे आणि पाणी घालण्याचे काम जरी आपण करत असलो, तरी वाढ घडवून आणणे आपल्या हातात नाही. आपण जबरदस्तीने ती घडवून आणू शकत नाही, किंवा ती लवकर घडावी यासाठीही काही करू शकत नाही. दाखल्यातील मनुष्याप्रमाणेच वाढ नेमकी कशी होते हे आपल्याला कळत नाही. आपण चारचौघांसारखीच आपली रोजची कामे करत असताना, ही वाढ केव्हा होते हे आपल्या लक्षातही येत नाही. पण, कालांतराने आपण पेरलेले बी फलदायी ठरू शकते. आणि जेव्हा असे घडते, तेव्हा तो नवा शिष्यदेखील आपल्यासोबत मिळून कापणीच्या कार्यात सहभागी होतो.—योहा. ४:३६-३८.
६. आध्यात्मिक वाढीसंबंधी आपण कोणती गोष्ट ओळखली पाहिजे?
६ या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे, कोणत्याही बायबल विद्यार्थ्याची आध्यात्मिक वाढ घडवून आणणे आपल्या हातात नाही हे आपण ओळखले पाहिजे. आपण नम्रपणे आपल्या मर्यादा ओळखल्यास, बायबल विद्यार्थ्यावर आपण कधीही बाप्तिस्मा घेण्याचा दबाव आणणार नाही किंवा बळजबरी करणार नाही. अर्थात, त्या व्यक्तीला मदत करण्याचा आपण जमेल तितका प्रयत्न करू शकतो; पण, समर्पण करण्याचा निर्णय त्या व्यक्तीचाच आहे हे आपण नम्रपणे ओळखले पाहिजे. यहोवाबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे आपले जीवन त्याला समर्पित करावे असे त्या व्यक्तीला स्वतःहून वाटले पाहिजे. आणि यहोवा केवळ अशाच प्रकारचे, मनापासून केलेले समर्पण स्वीकारतो.—स्तो. ५१:१२; ५४:६; ११०:३.
७, ८. (क) बी पेरून झोपी गेलेल्या माणसाच्या दाखल्यावरून आपण आणखी कोणत्या गोष्टी शिकतो? एक अनुभव सांगा. (ख) यहोवाबद्दल आणि येशूबद्दल या दाखल्यातून आपण काय शिकतो?
७ दुसरी गोष्ट म्हणजे, या दाखल्याचा अर्थ समजून घेतल्यास, प्रचार कार्यात सुरुवातीला चांगले परिणाम दिसून आले नाहीत तरीसुद्धा आपण निराश होणार नाही. उलट आपल्याला धीर धरण्यास मदत मिळेल. (याको. ५:७, ८) आपण पेरलेले बी नेहमीच फलदायी ठरेल असे नाही. पण त्या विद्यार्थ्याला मदत करण्याचा जमेल तितका प्रयत्न करूनही जर त्याने प्रगती केली नाही, तर याचा अर्थ आपणच कोठेतरी कमी पडलो असा होत नाही. यहोवा केवळ अशाच व्यक्तीच्या मनात सत्याचे बी वाढू देतो, जी नम्र असते आणि स्वतःमध्ये बदल करण्यास तयार असते. (मत्त. १३:२३) त्यामुळे, किती लोक सत्यात येतात याच्या आधारावर आपण आपल्या सेवाकार्याचे यश मोजू नये. यहोवादेखील बायबल विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर आपल्या सेवेचे यश मोजत नाही; तर, आपण विश्वासूपणे घेतलेल्या परिश्रमांची तो कदर करतो.—लूक १०:१७-२०; १ करिंथकर ३:८ वाचा.
८ या दाखल्यातून शिकण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे, एका व्यक्तीमध्ये कोणते बदल घडून येत आहेत हे नेहमीच आपल्या लक्षात येणार नाही. उदाहरणार्थ, एक मिशनरी बांधव एका जोडप्यासोबत बायबल अभ्यास करत होते. एकदा या जोडप्याने प्रचारक बनण्याची इच्छा बांधवाजवळ व्यक्त केली. बांधवाने त्यांना आठवण करून दिली, की प्रचारक बनण्यास पात्र ठरण्याकरता आधी त्यांना सिगारेट ओढण्याची सवय सोडावी लागेल. पण, ही सवय तर आपण कितीतरी महिन्यांआधीच सोडली आहे असे जोडप्याने सांगितले. हे ऐकून बांधवाला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी ही सवय का सोडली होती? आपण सिगारेट ओढतो तेव्हा यहोवा आपल्याला पाहू शकतो आणि त्याला ढोंगीपणा मुळीच आवडत नाही याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे, सिगारेट ओढायचीच असेल तर मिशनरी बांधवाच्या समोर ओढायची, नाहीतर ही सवय पूर्णपणे सोडूनच द्यायची असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी एवढा मोठा बदल केला आहे याची खरेतर मिशनरी बांधवाला जराही कल्पना नव्हती. पण, या जोडप्याच्या मनात यहोवाप्रती नुकत्याच अंकुरलेल्या प्रेमाने त्यांना हा योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त केले होते.
मासे धरण्याचे जाळे
९. मासे धरण्याच्या जाळ्याविषयी दिलेल्या दाखल्याचा काय अर्थ होतो?
९ मत्तय १३:४७-५० वाचा. मासे धरण्याच्या जाळ्याविषयी येशूने दिलेल्या दाखल्याचा काय अर्थ होतो? येशूने, सर्व मानवजातीला केल्या जात असलेल्या राज्य प्रचाराची तुलना एक मोठे जाळे समुद्रात टाकण्याशी केली. जाळ्यात जसे “सर्व प्रकारचे मासे” पकडले जातात तसेच आपल्या प्रचार कार्यामुळे सर्व प्रकारचे लाखो लोक सत्याकडे आकर्षित होतात. (यश. ६०:५) याचा पुरावा म्हणजे, दरवर्षी आपल्या अधिवेशनांना आणि स्मारकविधीला मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे लोक. जाळ्यात पकडलेल्या माशांपैकी काही “चांगले” मासे असतात आणि हे लोक ख्रिस्ती मंडळीचा भाग बनतात. पण, काही “वाईट” मासेदेखील जाळ्यात येतात आणि अशा लोकांचा यहोवा स्वीकार करत नाही.
१०. मासे धरण्याच्या जाळ्याचा दाखला येशूने का सांगितला?
१० येशूने हा दाखला का सांगितला? चांगल्या व वाईट माशांना वेगळे केले जाणे हे मोठ्या संकटादरम्यान होणाऱ्या अंतिम न्यायाला सूचित करत नाही. तर, या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात जे घडते त्यास ते सूचित करते. सत्याकडे आकर्षित होणारे सगळेच लोक सत्य स्वीकारणार नाहीत हे येशूने या दाखल्याद्वारे स्पष्ट केले. बरेच जण आपल्या सभांना येतात आणि काही जण बायबल अभ्यास करण्यासही तयार होतात. पण, ते पाऊल उचलत नाहीत. (१ राजे १८:२१) काही असेही लोक आहेत, जे पूर्वी मंडळीसोबत सहवास ठेवायचे पण आता त्यांनी मंडळीशी संबंध तोडून टाकला आहे. काही तरुणांचे ख्रिस्ती कुटुंबात संगोपन झालेले आहे, पण त्यांनी अजूनही यहोवाच्या नीतिमान स्तरांचा मनापासून स्वीकार केलेला नाही. एखादी व्यक्ती यांपैकी कोणत्याही परिस्थितीत असली, तरी तिने सत्य स्वीकारण्याचा वैयक्तिक निर्णय घेण्याची गरज आहे यावर येशूने भर दिला. जे लोक असा निर्णय घेतात ते त्याच्या नजरेत “सर्व राष्ट्रांतील” “निवडक” म्हणजेच मौल्यवान वसतूंसारखे ठरतात.—हाग्ग. २:७.
११, १२. (क) जाळ्याच्या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? (ख) या दाखल्यातून यहोवाबद्दल आणि येशूबद्दल आपण काय शिकतो?
११ जाळ्याच्या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? काही वेळा आपण अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही, आपला एखादा बायबल विद्यार्थी किंवा आपल्या मुलांपैकी एक जण सत्य स्वीकारत नाही. पण, या दाखल्यातून काय शिकायला मिळते यावर मनन केल्यास अशा परिस्थितीत अगदीच खचून न जाण्यास आपल्याला मदत मिळेल. एखादी व्यक्ती बायबल अभ्यास करायला तयार होते किंवा एखाद्या व्यक्तीचे ख्रिस्ती कुटुंबात संगोपन होते याचा अर्थ ती व्यक्ती आपोआपच यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडेल असा होत नाही. जे यहोवाच्या अधीन राहू इच्छित नाहीत त्यांना देवाच्या लोकांमधून वेगळे केले जाईल.
सत्याकडे आकर्षित झालेल्यांपैकी काही जण यहोवाची उपासना स्वीकारतील (परिच्छेद ९-१२ पाहा)
१२ पण, जे लोक सत्य सोडून गेले आहेत त्यांना मला. ३:७, ईझी-टू-रीड व्हर्शन) ही गोष्ट येशूने दिलेल्या आणखी एका दाखल्यातून, म्हणजेच उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून स्पष्ट होते.—लूक १५:११-३२ वाचा.
कधीच मंडळीत परत येऊ दिले जाणार नाही असा याचा अर्थ होतो का? किंवा, ज्याने अजूनही यहोवाला आपले जीवन समर्पित केलेले नाही त्याच्यासाठी आता काहीच आशा नाही असे आपण समजावे का? नाही. अशा व्यक्तींसाठी, यहोवाचे उपासक बनण्याची संधी मोठे संकट सुरू होईपर्यंत खुली राहील. यहोवा जणू या लोकांना असे म्हणत आहे: “माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन.” (उधळ्या पुत्र
१३. उधळ्या पुत्राच्या दाखल्याचा काय अर्थ होतो?
१३ उधळ्या पुत्राच्या दाखल्याचा काय अर्थ होतो? या दाखल्यातील दयाळू पिता स्वर्गातील आपला प्रेमळ पिता यहोवा याला चित्रित करतो. आपल्या वाट्याची मालमत्ता मागून, नंतर ती उडवून टाकणारा मुलगा हा मंडळीपासून दूर गेलेल्या लोकांना सूचित करतो. हे लोक यहोवापासून दुरावलेल्या सैतानाच्या जगात जाण्याद्वारे जणू एका “दूर देशी” निघून जातात. (इफिस. ४:१८; कलस्सै. १:२१) त्यांच्यापैकी काहींना नंतर आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते यहोवाच्या संघटनेकडे परत येतात. ख्रिस्ती मंडळीत परत येणे त्यांना सोपे जात नाही, पण तरीसुद्धा नम्र असल्यामुळे आणि त्यांना मनापासून पश्चात्ताप झाल्यामुळे ते असे करतात. आपला क्षमाशील पिता यहोवा अशा लोकांचा आनंदाने स्वीकार करतो.—यश. ४४:२२; १ पेत्र २:२५.
१४. येशूने उधळ्या पुत्राचा दाखला का सांगितला?
१४ येशूने हा दाखला का सांगितला? यहोवापासून दूर गेलेल्यांनी परत यावे असे त्याला मनापासून वाटते. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी येशूने हा हृदयाला भिडेल असा दाखला सांगितला. या दाखल्यातील पित्याने आपला मुलगा परत येईल ही आशा कधीही सोडली नाही. मुलगा परत आला, तेव्हा अजून तो घरापासून दूर असतानाच पित्याने धावत जाऊन त्याचे स्वागत केले. खरोखर, जे लोक सत्य सोडून गेले आहेत त्यांना लवकरात लवकर यहोवाकडे परत येण्याची किती जोरदार प्रेरणा या दाखल्यातून मिळते! आध्यात्मिक दृष्टीने कदाचित ते अगदी कमजोर झाले असतील. तसेच, सर्व जण आपल्याविषयी काय विचार करतील याची त्यांना चिंता वाटत असेल; शिवाय, मंडळीत परत येताना कदाचित त्यांच्या मार्गात बरेच अडथळेही असतील. पण, कितीही कठीण गेले तरीसुद्धा मंडळीत परत आल्याचा त्यांना कधीही पस्तावा होणार नाही. इतकेच काय, तर ते मंडळीत परतल्याबद्दल स्वर्गातही आनंद व्यक्त केला जाईल.—लूक १५:७.
१५, १६. (क) उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? काही उदाहरणे द्या. (ख) यावरून आपण यहोवाबद्दल व येशूबद्दल काय शिकू शकतो?
१५ उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? आपण यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण केले उप. ७:१६) या दाखल्यातून आपल्याला आणखी एक धडा शिकायला मिळतो. एखादी व्यक्ती मंडळीला सोडून जाते तेव्हा ती ‘हरवलेल्या मेंढरासारखी’ आहे असा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे; पण, ही व्यक्ती आता कधीच परत येऊ शकत नाही असा विचार आपण करू नये. (स्तो. ११९:१७६) मंडळीपासून दूर गेलेली एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यास, आपण तिला मंडळीत परत येण्यासाठी प्रेमळ साहाय्य आणि व्यावहारिक मदत देऊ का? वडिलांनी या व्यक्तीला आवश्यक ती मदत पुरवावी, म्हणून आपण लगेच तिच्याबद्दल वडिलांना माहिती देऊ का? उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून शिकलेल्या गोष्टींनुसार सुज्ञपणे वागल्यास आपण नक्कीच असे करू.
पाहिजे. एखादी व्यक्ती पश्चात्ताप करून मंडळीत परत येते तेव्हा आपण “फाजील धार्मिक” होण्याचे टाळले पाहिजे; उलट, आपण तिचे आनंदाने स्वागत केले पाहिजे. असे न केल्यास आध्यात्मिक रीत्या आपला “नाश” होऊ शकतो. (१६ ख्रिस्ती मंडळीत परत आलेल्या काहींनी यहोवाच्या दयेबद्दल आणि मंडळीकडून मिळालेल्या प्रेमळ साहाय्याबद्दल कशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या याकडे लक्ष द्या. एक बांधव, जे २५ वर्षांपासून बहिष्कृत होते त्यांनी म्हटले: “मला मंडळीत परत घेण्यात आलं तेव्हापासून मी यहोवाकडून ‘विश्रांतीचे समय’ अनुभवले आहेत आणि यामुळे माझा आनंद दिवसेंदिवस वाढतच गेला आहे. (प्रे. कृत्ये ३:१९) सर्व जण माझ्याशी प्रेमानं वागतात आणि खूप मदत करतात. आता मला एका सुंदर आध्यात्मिक कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं वाटतं.” यहोवाच्या संघटनेपासून दूर गेलेली एक तरुण बहीण पाच वर्षांनंतर मंडळीत परत येण्याविषयी असे म्हणते: “येशूनं ज्या प्रेमाबद्दल सांगितलं ते प्रत्यक्ष अनुभवताना मला कसं वाटलं हे मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. यहोवाच्या संघटनेत असण्याचा बहुमान कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मौल्यवान आहे.”
१७, १८. (क) या लेखात चर्चा केलेल्या तीन दाखल्यांतून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलो आहोत? (ख) आपण काय करण्याचा निश्चय केला पाहिजे?
१७ तर मग, या तीन दाखल्यांतून आपण व्यवहारात आणण्याजोग्या कोणकोणत्या गोष्टी शिकलो? पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक वाढ घडवून आणणे आपल्या हातात नाही, तर ती फक्त यहोवाच घडवून आणू शकतो हे आपण मान्य केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, सभांना येणारे आणि आपल्यासोबत बायबल अभ्यास करणारे सगळेच लोक सत्य स्वीकारतील अशी अपेक्षा आपण करू नये. आणि शेवटची गोष्ट म्हणजे, जरी काही जण सत्य सोडून गेले आणि जरी त्यांनी यहोवाकडे पाठ फिरवली, तरीसुद्धा ते परत येतील ही आशा आपण कधीही सोडू नये. आणि जेव्हा ते परत येतील तेव्हा यहोवाचे अनुकरण करून आपण त्यांचे आनंदाने स्वागत करू या.
१८ आपण सर्व जण ज्ञान, समज आणि बुद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत राहू या. येशूचे दाखले वाचताना, त्यांचा काय अर्थ होतो, बायबलमध्ये ते दाखले का दिलेले आहेत आणि त्यांतून आपण यहोवाबद्दल व येशूबद्दल काय शिकू शकतो हे स्वतःला विचारा. असे केल्यास, येशूच्या शब्दांचा अर्थ आपण खरोखरच समजून घेत आहोत हे आपण दाखवून देऊ.