व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वेच्छेने पुढे येणाऱ्यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो

स्वेच्छेने पुढे येणाऱ्यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो

आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला इच्छास्वातंत्र्याची अनमोल देणगी देऊन सन्मानित केले आहे. जे आपल्या इच्छास्वातंत्र्याचा उपयोग करून खऱ्या उपासनेच्या वाढीसाठी, देवाचे नाव पवित्र करण्यासाठी आणि त्याचा महान उद्देश पूर्ण करण्यासाठी हातभार लावतात त्यांना यहोवा विपुल प्रमाणात आशीर्वाद देतो. कोणी बळजबरी करत असल्यामुळे किंवा केवळ कर्तव्याच्या भावनेने आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करावे अशी तो अपेक्षा करत नाही. उलट, आपण त्याच्याबद्दल असणारे खरे प्रेम आणि कृतज्ञता यांमुळे प्रवृत्त होऊन त्याची मनापासून सेवा करतो, तेव्हा तो आपल्या सेवेची खूप कदर करतो.

उदाहरणार्थ, इस्राएली लोक जेव्हा सीनायच्या रानात होते तेव्हा यहोवाने त्यांना उपासनेसाठी एक निवासमंडप बांधण्यास सांगितले. तो त्यांना म्हणाला: “तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे.” (निर्ग. ३५:५) प्रत्येक इस्राएली त्याला शक्य होईल तितके दान देऊ शकत होता. त्यांनी कोणत्या वस्तू द्याव्यात आणि किती द्याव्यात हे सांगण्यात आले नव्हते. तर, ते मनापासून जे काही देतील त्याचा उपयोग देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाने केला जाणार होता. इस्राएली लोकांची काय प्रतिक्रिया होती?

“ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली,” त्यांनी स्वेच्छेने दान दिले. इस्राएली स्त्रीपुरुषांनी यहोवाच्या कामासाठी निरनिराळ्या वसतूंचे स्वेच्छेने दान दिले. त्यांनी नथा, कर्णफुले, अंगठ्या, बांगड्या, सोने, चांदी, पितळ, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व सील माशाची कातडी, बाभळीचे लाकूड, गोमेदमणी व इतर रत्ने आणि तेल अशा कितीतरी वस्तू आणल्या. शेवटी, “जी सर्व सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.”—निर्ग. ३५:२१-२४, २७-२९; ३६:७.

यहोवाला सर्वात जास्त आनंद, दान करण्यात आलेल्या या भौतिक वसतूंमुळे नव्हे तर इस्राएली लोकांनी स्वेच्छेने खऱ्या उपासनेला जो पाठिंबा दिला त्यामुळे झाला. त्याचबरोबर इस्राएली लोकांनी त्यांचा वेळ दिला आणि कामही केले. अहवालात असे म्हटले आहे: “ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या त्या सर्वांनी . . . सूत कातले.” तसेच, “ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.” त्याचबरोबर, बसालेल याला यहोवाने “बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले.” बसालेल आणि अहलियाब या दोघांना जी कामगिरी सोपवण्यात आली होती ती पूर्ण करण्यासाठी यहोवाने त्यांना कौशल्य दिले.—निर्ग. ३५:२५, २६, ३०-३५.

यहोवाने जेव्हा इस्राएली लोकांना दान देण्याविषयी सांगितले तेव्हा “मनापासून इच्छा” असलेला प्रत्येक जण खऱ्या उपासनेला पाठिंबा देईल याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती. स्वेच्छेने पुढे आलेल्या या लोकांना देवाने मार्गदर्शन देण्याद्वारे आणि भरपूर प्रमाणात आनंद देण्याद्वारे उदारपणे आशीर्वादित केले. अशा रीतीने, स्वेच्छेने पुढे येणाऱ्या आपल्या सेवकांना यहोवा कशा प्रकारे आशीर्वादित करतो हे त्याने दाखवून दिले. त्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता ज्या साधनसंपत्तीची किंवा ज्या खास कौशल्यांची गरज असते ती तो विपुल प्रमाणात पुरवतो. (स्तो. ३४:९) तुम्ही निःस्वार्थ वृत्तीने यहोवाची सेवा केल्यास तो नक्कीच तुम्हालाही आशीर्वादित करेल.

[तळटीपा]

^ परि. 9 भारतात हे “जेहोवाज विट्नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

^ परि. 24 भारतात, “तुमच्या मौल्यवान वसतूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.