सैतानाविरुद्धच्या लढाईत तुम्ही विजयी होऊ शकता!
“त्याच्याविरुद्ध [सैतानाविरुद्ध] विश्वासात दृढ असे उभे राहा.”—१ पेत्र ५:९.
१. (क) सैतानाचा प्रतिकार करणं आजदेखील इतकं महत्त्वाचं का आहे? (ख) सैतानाविरुद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ शकतो हे कशावरून म्हणता येईल?
सैतान आजदेखील पृथ्वीवर जिवंत असलेल्या अभिषिक्तांच्या आणि ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ विरोधात लढत आहे. (योहा. १०:१६) सैतानाकडे अतिशय कमी वेळ उरला आहे. त्यामुळे, यहोवाच्या जास्तीतजास्त सेवकांना विश्वासातून पाडण्याची त्याची इच्छा आहे. (प्रकटीकरण १२:९, १२ वाचा.) असं असलं, तरी सैतानाविरुद्धच्या या लढाईत आपण यशस्वी होऊ शकतो. बायबल म्हणतं: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.”—याको. ४:७.
२, ३. (क) लोकांनी आपल्या अस्तित्वावर शंका घ्यावी असं सैतानाला का वाटतं? (ख) सैतान एक खरीखुरी व्यक्ती आहे हे तुम्ही कशावरून सांगू शकता?
२ सैतान आहे असं म्हणणं बऱ्याच लोकांसाठी चेषटेचा विषय आहे. त्यांच्या मते सैतान आणि दुरात्मे केवळ पुस्तकांतली, चित्रपटांतली आणि व्हिडिओ गेम्समधली काल्पनिक पात्रं आहेत. तसंच, सैतान आणि दुरात्म्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणं हे शहाणपणाचं नाही असंही त्यांना वाटतं. पण, त्यांच्या मानण्या न् मानण्यानं सैतानाला काही फरक पडतो का? मुळीच नाही. उलट, यामुळे अशा लोकांना फसवणं त्याला सोपं जातं. (२ करिंथ. ४:४) खरंतर, सैतानच लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा विचारसरणीला खतपाणी घालत असतो.
३ पण, यामुळे यहोवाच्या सेवकांची दिशाभूल होत नाही. कारण, सैतान एक खरीखुरी व्यक्ती आहे हे आपल्याला माहीत आहे. ते कसं? बायबलमध्ये उत्प. ३:१-५) तसंच, ईयोबाच्या हेतूंवर शंका घेऊन यहोवाशी बोलणाराही सैतानच होता. (ईयो. १:९-१२) सैतानानंच येशूला फसवण्याचा प्रयत्न केला होता. (मत्त. ४:१-१०) शिवाय, १९१४ साली येशू राजा झाला, तेव्हा सैतान पृथ्वीवर जिवंत असलेल्या अभिषिक्तांसोबत “लढाई करण्यास” निघाला, असंही बायबल आपल्याला सांगतं. (प्रकटी. १२:१७) त्याची ही लढाई अजूनही संपलेली नाही. आजही तो अभिषिक्तांना आणि दुसऱ्या मेंढरांना विश्वासातून पाडण्याचा प्रयत्न करतो. या लढाईत आपल्याला विजयी व्हायचं असेल, तर विश्वासात मजबूत राहून आपण त्याला लढा दिला पाहिजे. कोणत्या तीन मार्गांद्वारे आपण असं करू शकतो, याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
याविषयी अनेक पुरावे देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, हव्वेशी सापाद्वारे बोलणारा मुळात सैतान होता. (गर्विष्ठपणा टाळा
४. गर्विष्ठपणाच्या बाबतीत सैतान सर्वोत्तम उदाहरण कसा आहे?
४ सैतान अतिशय गर्विष्ठ व्यक्ती आहे. या दुष्ट देवदूतानं तर यहोवाच्या शासन करण्याच्या अधिकारालाच आव्हान देण्याचं धाडस केलं. आणि, लोकांना देवाऐवजी आपली उपासना करायला लावण्याचा प्रयत्नदेखील केला. गर्विष्ठपणा आणि घमेंडीपणा यांच्या बाबतीत सैतान तर सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामुळे, त्याच्याविरुद्ध असलेल्या लढाईत विजय मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे, गर्विष्ठपणा टाळून नम्रता दाखवणं. (१ पेत्र ५:५ वाचा.) पण, गर्विष्ठपणा म्हणजे नेमकं काय? आणि गर्व असणं हे नेहमीच चुकीचं असतं का?
५, ६. (क) गर्व करणं नेहमीच चुकीचं असतं का? स्पष्ट करा. (ख) कोणत्या प्रकारचा गर्व धोकादायक आहे, आणि बायबलमध्ये याविषयी कोणती उदाहरणं देण्यात आली आहेत?
५ एका शब्दकोशानुसार गर्व ही स्वतःविषयी असणाऱ्या आत्मविश्वासाची आणि अभिमानाची भावना आहे. शिवाय, गर्वामध्ये समाधानाच्या भावनेचाही समावेश होतो. हे समाधान आपल्याला आपण किंवा आपल्या जवळच्यांनी केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे, किंवा जवळ असलेल्या चांगल्या गोष्टींमुळे मिळू शकतं. अशा प्रकारच्या भावना बाळगण्यात काही चुकीचं नाही. थेस्सलनीका इथल्या बांधवांना प्रेषित पौलानं म्हटलं, “आम्हाला स्वतः देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळांत व तुम्ही सहन करत असलेले दुःख, त्याविषयीची तुमची सहनशीलता, सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.” (२ थेस्सलनी. १:४, ईझी-टू-रीड) तेव्हा, दुसऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल चांगलं वाटण्यात; आणि स्वतःबद्दल थोड्या प्रमाणात अभिमान बाळगण्यात काहीच चुकीचं नाही. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाबद्दल, संस्कृतीबद्दल, किंवा आपण जिथं लहानाचं मोठं झालो त्या ठिकाणाबद्दल लाज बाळगण्याची काही गरज नाही.—प्रे. कृत्ये २१:३९.
६ पण, गर्वाचा आणखी एक प्रकार आहे ज्यामुळे इतरांसोबतचं आणि खासकरून यहोवासोबतचं आपलं नातं तुटू शकतं. अशा प्रकारचा गर्व आपल्यात असेल तर ताडन मिळाल्यास आपल्याला राग येईल. इतकंच नव्हे, तर नम्रपणे ताडन स्वीकारण्याऐवजी कदाचित आपण ते थेटपणे नाकारू. (स्तो. १४१:५) या गर्वाचं वर्णन स्वतःला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणाऱ्या लोकांमध्ये असणारी वृत्ती; किंवा “आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असा फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या लोकांमध्ये झळकणारी मगरूरपणाची वृत्ती,” असं करता येईल. अशी मनोवृत्ती दाखवणारे लोक यहोवाला मुळीच आवडत नाही. (यहे. ३३:२८; आमो. ६:८) पण, जेव्हा लोक सैतानाच्या घमेंडी वृत्तीचं अनुकरण करतात आणि स्वतःबद्दल फुशारकी मारतात तेव्हा सैतानाला खूप आनंद होतो. निम्रोद, फारो आणि अबशालोम यांनी बढाई मारण्याद्वारे गर्व दाखवला, तेव्हा सैतानाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. (उत्प. १०:८, ९; निर्ग. ५:१, २; २ शमु. १५:४-६) काईनानं यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध गमावला तेव्हा त्याचं मूळ कारणसुद्धा गर्विष्ठपणाच होता. यहोवानं स्वतः काईनाला सुधारण्याचा प्रयत्न केला पण गर्विष्ठपणामुळे त्यानं यहोवाचं ऐकलं नाही. त्याच्या ताठ मनोवृत्तीमुळे यहोवाच्या इशाऱ्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं. आणि त्याहून वाईट म्हणजे यहोवाविरुद्ध पाप करण्यासही तो कचरला नाही.—उत्प. ४:६-८.
७, ८. (क) वांशिक भेदभाव काय आहे आणि याचा गर्वाशी कसा संबंध आहे? (ख) गर्वामुळे मंडळीची शांती कशी भंग होऊ शकते? स्पष्ट करा.
७ आजदेखील बऱ्याच वेळा लोक गर्वामुळे एकमेकांचं
नुकसान करतात. जगात दिसणाऱ्या वांशिक भेदभावामागं कुठं ना कुठं गर्व हा असतोच. एका शब्दकोशानुसार वांशिक भेदभाव करणं म्हणजे इतर वंशातील लोकांविषयी द्वेष बाळगणं. तसंच, यामध्ये “ठरावीक वंशाच्या लोकांमध्ये खास वैशिष्ट्ये किंवा क्षमता असतात, आणि अमुक वंशाचे लोक हे नेहमी इतरांपेक्षा वरचढ असतात अशा विचारसरणीचा; तसंच, काही वंशाच्या लोकांना तुच्छ लेखण्याच्या वृत्तीचादेखील” समावेश होतो. वांशिक भेदभावामुळे अनेक दंगली आणि युद्धं झाली आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात हत्याकांडदेखील झाले आहेत.८ हे खरं आहे की ख्रिस्ती मंडळींत असं व्हायला नको. पण तरी, गर्वामुळे बांधवांमध्ये मतभेद होऊ शकतात आणि नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सुरवातीच्या काही ख्रिश्चनांसोबत असं घडलं होतं. त्यामुळे याकोबानं त्यांना असा प्रश्न विचारला: “तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात?” (याको. ४:१) आपण जर स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजत असू आणि दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात द्वेष असेल, तर कदाचित आपण असं काही बोलू किंवा करू ज्यामुळे इतरांना वाईट वाटू शकेल. (नीति. १२:१८) तर मग हे स्पष्टच आहे की गर्वामुळे मंडळीची शांती भंग होऊ शकते.
९. वांशिक भेदभाव आणि गर्व टाळण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करते? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
९ स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजण्याची वृत्ती जर आपल्यात डोकावत असेल, तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा” यहोवाला वीट आहे. (नीति. १६:५) आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला विचारलं पाहिजे, ‘इतर वंशातील, देशातील किंवा संस्कृतीतील लोकांपेक्षा मी श्रेष्ठ आहे असं मला वाटतं का?’ असं वाटत असल्यास, आपण हे विसरत आहोत की देवानं “एकापासून माणसांची सर्व राषट्रे निर्माण” केली आहेत. (प्रे. कृत्ये १७:२६) खरं पाहता आपण सर्व एकाच वंशातले आहोत, कारण आपण सर्व जण आदामापासून आलो आहोत. त्यामुळे, देवानं काही वंशातील लोकांना इतरांपेक्षा श्रेष्ठ बनवलं आहे असं मानणं नक्कीच मूर्खपणाचं ठरेल. शिवाय, असा विचार केल्यामुळे आपण आपल्या ख्रिस्ती प्रेमाचा आणि एकतेचा भंग करण्याची संधी सैतानाला देत असतो. (योहा. १३:३५) तेव्हा, सैतानाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी आपण अयोग्य प्रकारचा गर्व टाळला पाहिजे.—नीति. १६:१८.
भौतिकवाद आणि जगातल्या गोष्टींचा मोह टाळा
१०, ११. (क) जगावर प्रेम करण्याचा मोह आपल्याला का होऊ शकतो? (ख) जगातील गोष्टींचं आकर्षण असल्यामुळे देमासनं काय केलं?
१० सैतान या “जगाचा अधिकारी” असल्यामुळे हे जग त्याच्या हातात आहे. (योहा. १२:३१; १ योहा. ५:१९) जगात ज्या गोष्टींना बढावा दिला जातो त्यांपैकी अनेक गोष्टी बायबलमधील स्तरांच्या विरोधात आहेत. अर्थात, जगातल्या सर्वच गोष्टी वाईट नाहीत. पण, एक गोष्ट मात्र खरी आहे की आपल्या इच्छांचा गैरफायदा घेऊन आपल्याला पापात पाडण्याकरता सैतान या जगाचा वापर करतो. शिवाय, यहोवाच्या उपासनेऐवजी जगाच्या गोष्टींकडे आपलं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्नही तो करतो.—१ योहान २:१५, १६ वाचा.
११ सुरवातीचे काही ख्रिश्चनसुद्धा जगातील गोष्टींकडे आकर्षित झाले होते. पौलानं लिहिलं, “देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून” निघून गेला. (२ तीम. ४:१०) जगातल्या नेमक्या कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होऊन देमास पौलाला सोडून गेला हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही. कदाचित, यहोवाच्या सेवेपेक्षा भौतिक गोष्टींवर तो जास्त प्रेम करू लागला असेल. आणि समजा या कारणामुळे जरी तो पौलाला सोडून गेला तरी त्याला याचा काही फायदा झाला का? नक्कीच नाही. देवाच्या सेवेत अनेक विशेषाधिकार मिळवण्याची संधी त्यानं गमावली. शिवाय, पौलाचा सहकारी म्हणून काम करत राहिल्यामुळे यहोवाकडून त्याला ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या असत्या, त्या गोष्टी या जगात त्याला कधीच मिळाल्या नसत्या!—नीति. १०:२२.
१२. सैतान “द्रव्याचा मोह” दाखवून आपल्याला कसा फसवू शकतो?
१२ आज आपल्याबाबतीतही असं घडू शकतं. आपलं कुटुंब आनंदी आणि सुखीसमाधानी राहावं अशी इच्छा बाळगणं साहजिक आहे. (१ तीम. ५:८) यहोवानं आदाम आणि हव्वेला एका सुंदर नंदनवनात ठेवलं होतं. यावरून, आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी यहोवाचीदेखील इच्छा आहे हे दिसून येतं. (उत्प. २:९) पण, “द्रव्याचा मोह” दाखवून सैतान आपल्या या इच्छेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. (मत्त. १३:२२) पैशामुळे किंवा भौतिक गोष्टींमुळे आपल्याला आनंदी व यशस्वी होता येईल, असं अनेकांना वाटतं. आपणही जर अशा प्रकारे विचार करू लागलो, तर यहोवासोबतचं आपलं मौल्यवान नातं आपण गमावून बसू. येशूनं अशी ताकीद दिली: “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्त. ६:२४) आपण जर केवळ भौतिक गोष्टींच्या मागं धावत राहिलो, तर यहोवाची सेवा करण्याचं आपण सोडून दिलं आहे, असा याचा अर्थ होईल. आणि हीच तर सैतानाची इच्छा आहे. त्यामुळे, पैशाला आणि पैशानं मिळणाऱ्या गोष्टींना यहोवासोबत असलेल्या आपल्या मैत्रीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. नाहीतर, यहोवासोबतची आपली मैत्री तुटू शकते. सैतानाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी आपण भौतिक गोष्टींविषयी योग्य दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे.—१ तीमथ्य ६:६-१० वाचा.
लैंगिक अनैतिकतेचा प्रतिकार करा
१३. विवाहाबद्दल जगाचा दृष्टिकोन काय आहे?
१३ सैतानाचा आणखी एक पाश म्हणजे लैंगिक अनैतिकता. आपल्या वैवाहिक सोबत्याला विश्वासू राहणं केवळ बोलायच्या गोष्टी आहेत आणि लग्न ही संकल्पनाच मुळात कालबाह्य झाली आहे, असं अनेकांना वाटतं. शिवाय, यामुळे आपल्याला स्वातंत्र्य राहत नाही, असंही त्यांना वाटतं. उदाहरणार्थ, एका अभिनेत्रीच्या मते केवळ एका व्यक्तीशी विश्वासू राहणं अशक्य गोष्ट आहे. ती म्हणते, “आपल्या सोबत्याला विश्वासू असलेली किंवा तसं राहण्याची इच्छा असलेली एकही व्यक्ती मी पाहिलेली नाही.” आणखी एका अभिनेत्यानं म्हटलं, “आयुष्यभर केवळ एकाशीच विश्वासू राहणं हा माणसाचा उपजत स्वभाव आहे, असं मला वाटतं नाही.” विवाहाच्या मौल्यवान देणगीवर जेव्हा प्रतिष्ठित लोक अशा प्रकारे टीका करतात, तेव्हा सैतानाला किती आनंद होत असेल याची कल्पना करा. सैतान विवाह व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि तो नेहमी ती मोडण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा, सैतानाविरुद्धच्या लढाईत आपल्याला विजयी व्हायचं असेल, तर विवाहाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे.
१४, १५. अनैतिक कृत्य करण्याचा मोह झाल्यास तुम्ही काय करू शकता?
१४ आपला विवाह झालेला असो किंवा नसो, आपण सर्व प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेचा प्रतिकार केला पाहिजे. पण, हे सोपं आहे का? नक्कीच नाही! उदाहरणार्थ, तुम्ही तरुण असाल तर तुम्ही तुमच्या वर्गसोबत्यांना असं म्हणताना ऐकलं असेल, की ‘मी हव्या त्या व्यक्तीसोबत संबंध ठेवू शकतो.’ कदाचित ते फोनवरून अश्लील मेसेजेस किंवा फोटो पाठवत असतील आणि याबद्दल इतरांना सांगत असतील. काही देशांत, अश्लील फोटो पाठवणं हा एक गंभीर गुन्हा आहे. बायबल म्हणतं, “जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.” (१ करिंथ. ६:१८) लैंगिक संबंधांतून होणाऱ्या भयंकर रोगांमुळे अनेकांना वेदना आणि मृत्यूचा सामना करावा लागला आहे. ज्या अविवाहित तरुणांनी लैंगिक संबंध ठेवले आहेत त्यांच्यापैकी बहुतेकांना नंतर याचा पस्तावा झाला आहे. ‘देवाचे नियम मोडल्यानं काही फरक पडत नाही’ असं मानण्याचं प्रोत्साहन आज टीव्ही, इंटरनेटद्वारे दिलं जातं. आपण जर अशा लबाडीवर विश्वास ठेवला तर आपली फसवणूक होऊन आपल्या हातून पाप घडू शकतं.—इब्री ३:१३.
१५ तुम्हाला अनैतिक कृत्य करण्याचा मोह झाल्यास, तुम्ही काय करू शकता? पापाकडे कल असल्यामुळे तुम्ही मोहात पडू शकता हे ओळखा. (रोम. ७:२२, २३) मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. (फिलिप्पै. ४:६, ७, १३) अनैतिक कृत्य करण्याचा मोह होईल अशी परिस्थिती टाळा. (नीति. २२:३) आणि, तुमच्यासमोर प्रलोभन आल्यास लगेच त्याचा प्रतिकार करा.—उत्प. ३९:१२.
१६. सैतानानं येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशू त्याला काय म्हणाला, आणि यावरून आपण काय शिकू शकतो?
१६ येशूचं आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण आहे. सैतानाच्या खोट्या अभिवचनांमुळे येशू फसला मत्तय ४:४-१० वाचा.) येशूला देवाच्या वचनाचं चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे, सैतानानं त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लगेच शास्त्रवचनांचा उल्लेख करून सैतानाला उत्तर देणं येशूला शक्य झालं. आज आपल्याला जर सैतानाविरुद्धच्या लढाईत विजयी व्हायचं असेल, तर अनैतिक कृत्य करण्याच्या मोहाला आपण कधीही बळी पडता कामा नये.—१ करिंथ. ६:९, १०.
नाही. त्याच्या बोलण्यावर येशूनं क्षणभरदेखील विचार केला नाही. उलट त्यानं लगेच सैतानाला म्हटलं: “असा शास्त्रलेख आहे.” (धीर दाखवा आणि विजयी व्हा
१७, १८. (क) सैतान आणखी कोणत्या पाशांचा वापर करतो, आणि हे अपेक्षित का आहे? (ख) सैतानाचं शेवटी काय होईल, आणि यामुळे तुम्हाला धीर दाखवण्याची प्रेरणा का मिळते?
१७ गर्व, भौतिकवाद आणि लैंगिक अनैतिकता हेच केवळ सैतानाचे पाश नाहीत, तर असे इतरही अनेक पाश आहेत. उदाहरणार्थ, काही साक्षीदारांचे सत्यात नसलेले नातेवाईक त्यांचा विरोध करतात. तर, काहींना शाळेतील सोबत्यांची थट्टा सहन करावी लागते. काही साक्षीदार अशा देशांत राहतात जिथं सरकार प्रचार कार्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करते. अशा समस्या अपेक्षितच आहेत. कारण, येशूनं स्वतः सांगितलं होतं, “माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.”—मत्त. १०:२२.
१८ सैतानाविरुद्धच्या लढाईत आपण विजयी कसं होऊ शकतो? येशूनं म्हटलं, “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.” (लूक २१:१९) हे लक्षात घ्या, देवासोबतची आपली मैत्री केवळ आपल्या आणि आपल्याच हातात आहे. त्यामुळे, कोणताही मानव आपलं कायमस्वरूपी नुकसान करू शकत नाही. (रोम. ८:३८, ३९) यहोवाच्या विश्वासू सेवकांचा मृत्यू जरी झाला तरी सैतान विजयी झाला आहे, असा याचा अर्थ होत नाही. कारण, यहोवा त्यांना पुन्हा जिवंत करेल. (योहा. ५:२८, २९) पण, सैतानाला मात्र भविष्याची काहीच आशा नाही. या दुष्ट जगाचा नाश झाल्यानंतर १,००० वर्षांसाठी त्याला अथांग डोहात टाकण्यात येईल. (प्रकटी. २०:१-३) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी सैतानाला पुन्हा “बंधमुक्त करण्यात येईल.” तेव्हा परिपूर्ण मानवांना भुलवण्याचा शेवटचा प्रयत्न तो करेल. आणि, त्यानंतर त्याचा कायमचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:७-१०) सैतानाला काही आशा नसली, तरी तुम्हाला आहे! तेव्हा, विश्वासात मजबूत राहा आणि सैतानाविरुद्ध लढाई लढत राहा. या लढाईत तुम्ही नक्की विजयी व्हाल!