“अशांचा मान राखा”
१९९२ पासून नियमन मंडळानं त्यांच्या वेगवेगळ्या समित्यांच्या कामकाजात हातभार लावण्यासाठी, काही अनुभवी आणि प्रौढ ख्रिस्ती वडिलांना साहाय्यक म्हणून नियुक्त केलं आहे. * ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असलेल्या या बांधवांची नियमन मंडळाला फार मोलाची मदत होते. (योहा. १०:१६) हे बांधव दर आठवडी होणाऱ्या त्यांच्या समितीच्या सभांसाठी उपस्थित असतात. नियमन मंडळाला हवी असलेली माहिती आणि काही पर्याय सुचवण्याचं काम हे बांधव करतात. पण, अंतिम निर्णय घेण्याचं काम मात्र नियमन मंडळ करतं. त्यानंतर घेतलेल्या निर्णयांप्रमाणे काम पूर्ण झालं आहे की नाही, याची खात्री हे बांधव करतात. या बांधवांना सोपवण्यात आलेली कोणतीही जबाबदारी ते अगदी आनंदानं पार पाडतात. ते नियमन मंडळाच्या सदस्यांसोबत खास आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांनाही उपस्थित राहतात. कधीकधी त्यांना मुख्यालयाचे प्रतिनिधी या नात्यानं शाखा कार्यालयांना भेटी देण्याची जबाबदारीही दिली जाते.
१९९२ पासून साहाय्यक या नात्यानं काम करणारे एक बांधव म्हणतात, “मला सोपवण्यात आलेली जबाबदारी मी जेव्हा काळजीपूर्वकपणे पार पाडतो, तेव्हा नियमन मंडळाच्या सदस्यांना आध्यात्मिक गोष्टींकडे आणखी जास्त लक्ष देणं शक्य होतं.” २० वर्षं नियमन मंडळाचा साहाय्यक म्हणून काम करणाऱ्या आणखी एका बांधवानं म्हटलं, “मला मिळालेला हा बहुमान माझ्या अपेक्षेपेक्षाही कैक पटीनं मोठा आहे.”
नियमन मंडळानं बऱ्याच जबाबदाऱ्या या बांधवांना सोपवल्या आहेत. मेहनत घेऊन काम करणाऱ्या या विश्वासू बांधवांची ते खूप कदर करतात. तेव्हा, “अशांचा मान राखण्याचा” आपणही नेहमी प्रयत्न करू या.—फिलिप्पै. २:२९.
^ परि. 2 नियमन मंडळाच्या सहा समित्यांच्या कामकाजाविषयी जास्त माहितीसाठी गॉड्स किंग्डम रूल्स या पुस्तकाच्या अध्याय १२ मधील “नियमन मंडळ राज्याशी संबंधित कार्याची कशी काळजी घेते?” असं शिर्षक असलेली चौकट आणि टेहळणी बुरूज १५ मे २००८ पृष्ठ २९ वर देण्यात आलीले माहिती पाहा.