व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नरकाविषयीचे सत्य माहीत झाल्यावर तुमच्यावर काय परिणाम होतो?

नरकाविषयीचे सत्य माहीत झाल्यावर तुमच्यावर काय परिणाम होतो?

नरकाविषयीचे सत्य माहीत झाल्यावर तुमच्यावर काय परिणाम होतो?

नरक हे यातनेचे ठिकाण आहे अशी शिकवण देणारे लोक, यहोवा देवाचे नाव बदनाम करतात आणि त्याच्या गुणांविषयी चुकीची माहिती देतात. देव दुष्ट लोकांचा नाश करणार असल्याचे बायबलमध्ये म्हटले आहे, हे खरे आहे. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) पण धार्मिक कोप हा देवाचा प्रमुख गुण नाही.

देव कोणाबरोबरही द्वेषबुद्धीने किंवा सूडबुद्धीने वागत नाही. तो तर असेही विचारतो: “दुष्ट मेला तर काय मला आनंद होतो?” (यहेज्केल १८:२३) दुष्टाच्या मरणाने जर देवाला आनंद होत नाही, तर त्यांना चिरकाल यातनेत तडपताना पाहून त्याला आनंद होईल का?

देवाचा सर्वात प्रमुख गुण प्रीती आहे. (१ योहान ४:८) होय, “प्रभू सर्वांशी चांगला आहे. त्याने निर्मिलेल्या सर्वांवर त्याची दयादृष्टी असते.” (स्तोत्र १४५:९) तो आपल्यावर प्रेम करतो तर आपणही त्याच्यावर प्रेम करावे, अशी अपेक्षा तो करतो.—मत्तय २२:३५-३८.

देवाची इच्छा पूर्ण करण्यास तुम्हाला काय प्रेरित करते —नरकाचे भय की देवावरचे प्रेम?

लोक नरकात यातना भोगतात या शिकवणीमुळे आपल्या मनात देवाबद्दल विकृत भय उत्पन्‍न होते. पण, देवाविषयीचे सत्य शिकून घेणाऱ्‍या व देवावर प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात त्याच्याबद्दलचे हितकारक भय उत्पन्‍न होते. “प्रभूच्या भयानेच ज्ञानप्राप्तीला सुरुवात होते. त्याप्रमाणे वागणाऱ्‍या सर्वांना सुबुद्धी लाभते,” असे स्तोत्र १११:१० मध्ये म्हटले आहे. देवाबद्दल असलेले हे भय, दहशत उत्पन्‍न करणारे विकृत भय नाही, तर निर्माणकर्त्याबद्दल आपल्या मनात असलेले आदरयुक्‍त भय आहे. हे भय आपल्याला, त्याला नाराज करण्यापासून रोखते.

नरकाबद्दलचे सत्य समजल्यावर, ड्रग्ज घेणाऱ्‍या कॅथलिन नावाच्या एका ३२ वर्षीय स्त्रीवर काय परिणाम झाला ते पाहा. तिच्या जीवनात, पार्ट्‌या, हिंसाचार, अनैतिकता, स्वतःचा द्वेष करणे या गोष्टींव्यतिरिक्‍त दुसरे काहीही नव्हते. ती कबूल करते: “कधीकधी मी माझ्या एक वर्षाच्या मुलीकडं बघून विचार करायचे, ‘बघ, मी काय करतेय या लेकरासाठी. मी तर नक्कीच नरकात जाईन.’” कॅथलिनने ड्रग्ज घ्यायचे थांबवण्याचे प्रयत्न केले पण ते काही जास्त दिवस चालले नाहीत. ती पुढे म्हणते, “मला बदलायचं होतं पण माझी जीवनशैली आणि बाहेरचं जग भकास वाटत होतं. त्यामुळं मला वाटायचं ‘जाऊ देत, काय उपयोग आहे चांगलं होऊन!’”

यानंतर मग कॅथलिनची भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. ती म्हणते: “मला शास्त्रवचनांतून दाखवण्यात आलं, की नरक-बिरक काही नसतं, तेव्हा माझ्या मनावरचा ताण किती हलका झाला. शास्त्रवचनांतील कारणं मला लगेच पटली.” दुष्टाईपासून मुक्‍त झालेल्या एका स्वच्छ पृथ्वीवर मानव कायमचे राहतील, या देवाने दिलेल्या वचनाविषयी देखील तिला साक्षीदारांकडून शिकायला मिळाले. (स्तोत्र ३७:१०, ११, २९; लूक २३:४३) ती म्हणते: “आता मला एक खरी आशा मिळाली—नंदनवनात चिरकाल जगायची आशा!”

कॅथलिनच्या मनातून आता नरकाची भीती निघाली होती तरीही ती ड्रग्ज घ्यायचे थांबवू शकली का? ती म्हणते: “मला जेव्हा ड्रग्ज घ्यायची हुक्की यायची तेव्हा मी यहोवाला, मदतीसाठी कळकळीनं प्रार्थना करायचे. माझ्या सवयीचा यहोवाला वीट येतो, असा मी विचार करायचे आणि मला त्याला काहीही करून नाराज करायचं नव्हतं. तो मला बळ देऊन माझ्या प्रार्थनांचं उत्तर द्यायचा.” (२ करिंथकर ७:१) देवाबद्दल हितकारक भय बाळगल्यामुळे कॅथलिन ड्रग्जच्या विळख्यातून एकदाची सुटली.

नरकात यातना भोगण्याच्या भीतीने नव्हे तर देवावर प्रेम करून व त्याच्याबद्दल मनात आदरयुक्‍त भय बाळगून चिरकाल आनंद लुटण्याकरता आपण त्याची इच्छा पूर्ण करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “प्रभूचे भय बाळगणारा, त्याच्या इच्छेनुसार वागणारा धन्य!”—स्तोत्र १२८:१. (w०८ ११/१)

[९ पानांवरील चौकट/चित्रे]

नरकातून कोणाला बाहेर काढले जाईल?

मराठी बायबल भाषांतरांमध्ये, जिएन्‍नाहायडीस या दोन ग्रीक शब्दांचे भाषांतर, “नरक,” “मृत्यूलोक,” “अधोलोक” असे करण्यात आले आहे. मूळ ग्रीक बायबलमध्ये, जिएन्‍ना हा शब्द, समूळ विनाशाला, म्हणजे पुनरुत्थानाची कसलीही आशा नसण्याला सूचित करतो. पण, हायडीस किंवा हेडीसमध्ये असलेल्यांना पुनरुत्थानाची आशा आहे.

त्यामुळे येशूचा मृत्यू होऊन त्याला तिसऱ्‍या दिवशी पुन्हा उठवल्यानंतर प्रेषित पेत्राने आपल्या श्रोत्यांना अशी खात्री दिली, की येशूला ‘मृत्यूलोकी सोडून देण्यात आले नाही.’ (प्रेषितांची कृत्ये २:२७, ३१, ३२; स्तोत्र १६:१०) या वचनात, ‘मृत्यूलोक’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो मूळ ग्रीक शब्द आहे हायडीस. मृत्यू झाल्यावर येशू कुठल्याही यातना दिल्या जाणाऱ्‍या ठिकाणी गेला नव्हता. हेडीस किंवा ‘मृत्यूलोक’ म्हणजे मानवजातीची सर्वसाधारण कबर. पण फक्‍त येशूलाच देव हेडीसमधून बाहेर काढत नाही.

पुनरुत्थानाविषयी बायबल असे म्हणते: “मृत्यू आणि अधोलोक [नरक] यांनी आपल्यातील मृत माणसांना बाहेर सोडले.” (प्रकटीकरण २०:१३, १४) “अधोलोक” अर्थात नरक रिकामे करणे म्हणजे, देवाने ज्यांना पुनरुत्थान मिळण्यास पात्र ठरवले आहे अशांना पुन्हा जिवंत करणे. (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) आपल्यासमोर खरोखरच किती मोठी अद्‌भुत आशा आहे! आपल्या मृत प्रिय जनांना आपण पुन्हा भेटू शकू! असीम प्रीतीचा देव, यहोवा हा चमत्कार करणार आहे!