व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

एक सुतार या नात्याने येशूने कोणत्या प्रकारचे काम केले असावे?

येशूचा दत्तक पिता योसेफ हा एक सुतार होता. येशू देखील सुतारकाम शिकला. त्याने आपले सेवाकार्य सुरू केले तेव्हा तो “सुमारे तीस” वर्षांचा होता. त्यावेळी, लोक त्याला केवळ “सुताराचा पुत्र” म्हणून ओळखत नव्हते, तर एक चांगला सुतार म्हणून त्याने नाव कमावले होते.—लूक ३:२३; मत्तय १३:५५; मार्क ६:३.

येशू जेथे राहायचा त्या नगरात, शेतीच्या अवजारांची नक्कीच मागणी असावी. उदाहरणार्थ, नांगर आणि जू. अशा प्रकारची अवजारे प्रामुख्याने लाकडाची बनवली जायची. शिवाय टेबल, खुर्च्या, स्टूल आणि खणांच्या मोठ्या पेट्या यांसारख्या नेहमीच्या वापरातल्या गोष्टी तसेच, दरवाजे, खिडक्या, लाकडी कुलपे, आणि तुळया यांसारख्या वस्तू देखील सुतार बनवत असावेत. खरेतर, सुतारकामात बांधकामाचाही समावेश होता.

एका दृष्टांतात, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने कुऱ्‍हाडीचा उल्लेख केला होता. येशू व इतर सुतार झाडे तोडण्यासाठी कदाचित या अवजाराचा वापर करत असावेत. त्यानंतर, ते तेथल्या तेथेच किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी नेऊन तोडलेल्या लाकडाच्या तुळया बनवायचे. हे अर्थातच खूप मेहनतीचे काम होते. (मत्तय ३:१०) यशयाने त्याच्या दिवसांत सुतार वापरत असलेल्या इतर अवजारांचा उल्लेख केला: “सुतार सूत धरितो; गेरूने आखणी करितो; तिच्यावर रंधा फिरवितो, व कैवाराने खुणा करितो.” (यशया ४४:१३) त्याकाळी धातूच्या आऱ्‍या, दगडी हातोड्या आणि पितळेचे खिळे वापरले जायचे हे उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून सिद्ध होते. (निर्गम २१:६; यशया १०:१५; यिर्मया १०:४) येशूने अशा प्रकारच्या हत्यारांचा आपल्या कामात वापर केला असावा असा आपण निष्कर्ष काढू शकतो. (w०८ १२/१)