तुम्हाला हे माहीत होते का?
तुम्हाला हे माहीत होते का?
प्रार्थनेच्या शेवटी लोक “आमेन” का म्हणतात?
इंग्रजी व ग्रीक भाषेतील “आमेन” हा शब्द खरेतर इब्री शब्द आहे. एखादी प्रार्थना केल्यानंतर किंवा शपथ घेतल्यानंतर, आशीर्वाद किंवा शाप दिल्यानंतर उपस्थित असलेल्यांनी एका स्वरात उच्चारलेल्या आमेन या शब्दाचा अर्थ “असेच होवो” किंवा “तथास्तु” असा होतो. प्रार्थनेत व्यक्त करण्यात आलेले विचार व भावना आपल्याला मान्य आहेत हे आपण “आमेन” म्हणण्याद्वारे दाखवतो. एका संदर्भाग्रंथानुसार “आमेन या शब्दाच्या खात्री, खरेपणा, विश्वासूपणा व कसलीच शंका नसणे या अर्थछटा आहेत.” बायबल लिहिले गेले त्या काळात एखाद्या शपथेला किंवा कराराला “आमेन” म्हणण्याचा अर्थ तो करार किंवा ती शपथ आपल्याला कायदेशीर रीत्या मान्य आहे व तो करार किंवा ती शपथ मोडल्यास त्याचे दुष्परिणाम भोगण्यास आपण तयार आहोत असे समजले जायचे.—अनुवाद २७:१५-२६.
येशूने प्रचारकार्य व शिकवण्याचे कार्य करताना त्याच्या काही वाक्यांची सुरूवात “आमेन” असे बोलून केली. असे करण्याद्वारे त्याने, तो जे काही बोलणार आहे ते पूर्णपणे विश्वसनीय आहे यावर जोर दिला. याबाबतीत, आमेन या ग्रीक शब्दाचे भाषांतर “खचित” किंवा “खरंच” असे करण्यात आले आहे. (मत्तय ५:१८; ६:२, ५, किंग जेम्स व्हर्शन) संपूर्ण योहानाच्या शुभवर्तमानात येशूने “आमेन” [“खचित खचित”] हा शब्द दोनदा वापरला आहे. (योहान १:५१) अशा प्रकारे येशूने वापरलेला आमेन हा शब्द केवळ शुभवर्तमानातच आढळतो.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात येशूची साक्ष ‘विश्वसनीय व खरी’ आहे हे सूचित करण्यासाठी “आमेन” हा शब्द वापरण्यात आला आहे.—प्रकटीकरण ३:१४. (w०९ ६/१)
[१३ पानांवरील चित्र]
“आमेन,” प्रकटीकरण ३:१४. सा.यु. पाचव्या शतकातील द कोडेक्स ॲलेक्झॅन्ड्रीनस