व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासाची व्याख्या काय?

विश्‍वासाची व्याख्या काय?

विश्‍वासाची व्याख्या काय?

विश्‍वासाची व्याख्या काय आहे? काही जणांच्या मते विश्‍वास म्हणजे अंधविश्‍वास. नामवंत अमेरिकन निबंधकार व पत्रकार एच. एल. मेन्कन यांनी विश्‍वासाची व्याख्या “घडण्यास असंभव असलेल्या गोष्टींवरचा तर्कसंगत नसलेला विश्‍वास” अशी केली.

परंतु, बायबलमध्ये विश्‍वासाची व्याख्या वेगळ्या प्रकारे दिली आहे. त्यात वर्णन केलेला विश्‍वास अंधविश्‍वास किंवा तर्कहीन नाही. उलट, “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टीबद्दलची खातरी आहे,” असे बायबल म्हणते.—इब्री लोकांस ११:१.

विश्‍वासाबद्दल लोकांची वेगवेगळी मते असल्यामुळे आपण खालील प्रश्‍नांची उत्तरे विचारात घेऊ या:

विश्‍वासाबद्दल बायबलमधील व्याख्या इतरांच्या मतापेक्षा वेगळी कशी आहे?

बायबल ज्या विश्‍वासाबद्दल सांगते तो विश्‍वास आपण विकसित करणे का आवश्‍यक आहे?

आपण आपला विश्‍वास मजबूत कसा करू शकतो?

हक्कलेख आणि भक्कम पुरावा

बायबलमधील इब्री लोकांस पत्र या पुस्तकाचे लिखाण झाले त्या काळात, “गोष्टीविषयीचा भरवसा” ही ग्रीक संज्ञा प्रचलित होती. व्यापारासंबंधीच्या कागदपत्रात ही संज्ञा वापरली जायची. या संज्ञेत भविष्यात मिळणाऱ्‍या एखाद्या वस्तूच्या मालकी हक्काची हमी, असा अर्थ समाविष्ट होता. त्यामुळे एक संदर्भ ग्रंथ असे सुचवतो की इब्री लोकांस ११:१ या वचनाचे भाषांतर: “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा हक्कलेख आहे,” अशा प्रकारे केले जाऊ शकते.

समजा तुम्ही एखाद्या नामांकित कंपनीची एखादी वस्तू विकत घेतली आहे व ती वस्तू घरी पोचायची तुम्ही वाट पाहताय, अशा वेळी तुम्ही दाखवत असलेला विश्‍वास, वर वर्णन करण्यात आलेल्या विश्‍वासासारखा आहे. कंपनीने दिलेल्या पावतीमुळे तुम्ही तिच्यावर भरवसा ठेवता. दुसऱ्‍या शब्दात ती पावती तुमचा हक्कलेख आहे, तुम्ही खरेदी केलेली वस्तू तुम्हाला नक्की मिळेल याची ती हमी आहे. जर तुमच्याकडून ती पावती हरवली असती किंवा तुम्ही ती चुकून फेकून दिली असती तर त्या वस्तूवरील तुमच्या मालकी हक्काचा पुरावाच नष्ट झाला असता. अशा प्रकारे देवाने दिलेली सर्व वचने तो पूर्ण करेल असा विश्‍वास बाळगणाऱ्‍या सर्वांना ते आशा करत असलेल्या गोष्टी मिळतील अशी खात्री देण्यात आली आहे. दुसरीकडे पाहता विश्‍वास न बाळगणारे किंवा ज्यांनी आपला विश्‍वास गमावला आहे असे लोक देवाने वचन दिलेल्या गोष्टी मिळण्याची आशा करू शकत नाहीत.—याकोब १:५-८.

इब्री लोकांस ११:१ येथे “गोष्टीबद्दलची खातरी” ही जी दुसरी संज्ञा वापरण्यात आली आहे तिच्यात एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या अगदी उलट पुरावा सादर करणे हा अर्थ समाविष्ट आहे. उदाहरणार्थ असे दिसते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे तो पूर्वेला उगवून पश्‍चिमेला जाऊन मावळतो. पण खगोलशास्त्रातील व गणितशास्त्रातील पुरावे दाखवतात की सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत नाही तर पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असते. हा पुरावा तुम्हाला समजला व तुम्ही तो खरा म्हणून स्वीकारला तर तुमच्या डोळ्यांना काहीही दिसत असले तरी वस्तुस्थितीवर तुम्ही विश्‍वास कराल. विश्‍वासाचा अर्थ एखादी गोष्ट समजून न घेता ती मानणे असा होत नाही तर ती गोष्ट प्रत्यक्षात जशी असते तशी समजणे, असा होतो.

मजबूत विश्‍वास महत्त्वाचा का आहे?

बायबल आपल्याला अशाच प्रकारचा विश्‍वास—भक्कम पुराव्यावर आधारित असलेला मजबूत विश्‍वास बाळगण्याचे प्रोत्साहन देते. यासाठी मानत असलेल्या गोष्टीत आपल्याला फेरबदल करावा लागला तरी असा मजबूत विश्‍वास आपण बाळगतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने यासंबंधी असे लिहिले: “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

मजबूत विश्‍वास विकसित करताना आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. पण पुढील पानांवर सांगितलेली चार पावले तुम्ही उचललीत तर या आव्हानांवर मात करू शकाल. (w०९ ५/१)