व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूने स्वतःविषयी काय सांगितले

येशूने स्वतःविषयी काय सांगितले

येशूने स्वतःविषयी काय सांगितले

“आपण कोण आहोत, कोठून आलो आहोत, या जगात का आलो आहोत आणि पुढे आपले काय होणार आहे, याबद्दल येशूच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.”—लेखक हर्बट लॉक्यर.

येशूचा स्वीकार करून त्याने शिकवलेल्या गोष्टींवर विश्‍वास करण्याआधी आपण त्याच्याविषयीची माहिती घेतली पाहिजे. येशू नेमका कोण होता? तो कोठून आला होता? त्याच्या जीवनाचा काय उद्देश होता? मत्तय, मार्क, लूक व योहान या शुभवर्तमानांमध्ये येशूने स्वतःविषयी काय सांगितले ते आपण जणू त्याच्याच तोंडून ऐकू या.

पृथ्वीवर त्याचा जन्म होण्याआधी तो जिवंत होता येशूने एकदा असे म्हटले: “अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.” (योहान ८:५८) येशूचा जन्म होण्याआधी सुमारे २,००० वर्षांपूर्वी अब्राहाम हयात होता. पण या विश्‍वासू कुलपित्याच्याही आधी येशू जिवंत होता. कोठे? मी “स्वर्गातून उतरलो आहे,” असे त्याने म्हटले.—योहान ६:३८.

देवाचा पुत्र यहोवाचे अनेक पुत्र आहेत जे स्वर्गदूत आहेत. पण येशू यांच्यापेक्षा वेगळा आहे. मी ‘देवाचा एकुलता एक पुत्र’ आहे असे येशूने स्वतःविषयी म्हटले. (योहान ३:१८) एकुलता एक म्हणजे, खुद्द यहोवाने येशूला बनवले. आणि मग, या एकुलत्या एका पुत्रामार्फत म्हणजे येशू ख्रिस्तामार्फत यहोवाने बाकीच्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.—कलस्सैकर १:१६.

‘मनुष्याचा पुत्र’ स्वतःविषयीचा उल्लेख करताना येशूने हा वाक्यांश इतर कोणत्याही वाक्यांशापेक्षा जास्त वेळा वापरला आहे. (मत्तय ८:२०) त्यामुळे त्याने लोकांना हे दाखवून दिले की तो मानवशरीर धारण केलेला देवदूत नव्हता किंवा एक अवतारही नव्हता तर पूर्णपणे मानव होता. देवाने पवित्र आत्म्याच्यामार्फत त्याच्या पुत्राचे जीवन पृथ्वीवर असलेल्या मरीया नावाच्या एका कुमारिकेच्या गर्भात स्वर्गातून स्थलांतरीत केले होते. म्हणूनच येशूचा जन्म परिपूर्ण, दोषहीन मनुष्य असा झाला.—मत्तय १:१८; लूक १:३५; योहान ८:४६.

प्रतिज्ञात मशीहा “मशीहा, . . येणार आहे हे मला ठाऊक आहे,” असे एका शोमरोनी स्त्रीने येशूला म्हटले तेव्हा त्याने तिला उत्तर दिले ‘जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मीच आहे.’ (योहान ४:२५, २६) “ख्रिस्त” यासारखाच असलेल्या “मशीहा” या शब्दाचा अर्थ “अभिषिक्‍त जण” असा होतो. देवाने दिलेली अभिवचने पूर्ण करण्यात येशूने खास भूमिका बजावली; याकरता त्याला अभिषिक्‍त करण्यात आले होते किंवा देवाने त्याला नेमले होते.

पृथ्वीवर येण्याचे त्याचे प्रमुख कारण येशूने एकदा म्हटले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) त्याने गरजू लोकांसाठी बरीच चांगली कामे केली असली तरीसुद्धा देवाच्या राज्याची आनंदाची बातमी इतरांना सांगणे हेच त्याच्या जीवनात प्रथमस्थानी होते. या राज्याविषयी त्याने काय शिकवले याची चर्चा आपण नंतर करणार आहोत.

येशू एक सर्वसामान्य मनुष्य नव्हता, हे नक्कीच. * स्वर्गातील त्याच्या जीवनाविषयीची माहिती घेतल्यावर, पृथ्वीवर असताना त्याने काढलेले उद्‌गार आणखीनच अर्थपूर्ण कसे बनतात हे आपण पाहणार आहोत. म्हणूनच त्याने प्रचार केलेल्या संदेशाचा पृथ्वीवरील लाखो लोकांच्या जीवनावर जो प्रभाव पडला आहे याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. (w१०-E ०४/०१)

[तळटीप]

^ परि. 9 येशूविषयी आणि देवाच्या उद्देशातील त्याच्या भूमिकेविषयी अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ४ पाहा.